बारामती -: बारामती लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे असून तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या उमेदवार सौ सुनेत्रा पवार या असून पूर्ण देशाचे लक्ष बारामती लोकसभा मतदार संघाकडे लागले असून दोन्ही पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी पदाधिकारी व पक्ष प्रमुखांनी कंबर खसली आहे.
सर्वसामान्य नागरिकांकडून दबक्या आवाजामध्ये अशी चर्चा होत आहे की जे कंपन्यांमध्ये बारामती एमआयडीसी मध्ये काही कामगार आहेत त्यांना दम देण्यात येत आहे आम्हाला जर मतदान दिले नाही तर तुम्हाला कामावरती ठेवले जाणार नाही अशी देखील चर्चा कामगारांच्या तोंडून ऐकायला मिळत आहे नेमकं सत्य काय?
तसेच पुरंदर,इंदापूर,दौंड,बारामती, भोर, खडकवासला या तालुक्यांमध्ये अमाप पैशाची देखील मंडळाचे अध्यक्ष प्रमुख यांना दिला जात आहे अशी देखील चर्चा सर्वसामान्यांमध्ये होत आहे. नेमकं यामागचं सत्य काय?
सर्वसामान्य नागरिकांचे मत हे नागरिक नेमका यांनी विकास काय केला या वरती विचार करून देणार आहे. अशी देखील चर्चा नागरिकांमध्ये होताना दिसत आहे.
या दोन्ही उमेदवारांपैकी कोणीही निवडून आला तरी नेमकं गरिबाचं जीवन बदलणार आहे का? हा देखील सर्वसामान्य गरीब विचार करत आहे.
मराठा समाजाचे आरक्षणाचा प्रश्न असो तसेच इतर प्रश्न असो कित्येकांना दिशाभूल करून आज पर्यंत असंच झुलवत ठेवले चा देखील चर्चा नागरिक दबक्या आवाजात करत आहे.
बारामती लोकसभा निवडणूक 2024 ते मतदारांनी मतदान करताना पूर्ण विचार करून मतदान आपल्याला उपयोगी हे दोन्ही उमेदवार पडणार नाहीत याचा विचार करून मतदान करावे.