मुख्यसंपादक -: अमित बगाडे
- बारामती लाईव्ह -
बारामती -: प्रियंका बाळासाहेब देवकाते मौजे निरावागज येथील रहिवासी असून त्यांनी दिनांक २४/८/२०२३ रोजी ग्रामपंचायत निरावागज तसेच गटविकास अधिकारी पंचायत समिती बारामती यांना लेखी पत्र दिले होते की, २५/८/२०२३ रोजी होणारे ग्रामसभा बेकायदेशीर असून ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम (७ )नुसार ग्रामसभा ही किमान सात दिवस अगोदर गावामध्ये दवंडी देऊन तसेच नोटीस बोर्ड वरती जाहिरात प्रसिद्ध करून तसेच ग्रामसभे अगोदर वार्ड सभा महिला सभा घेण्यात यावेत.
तसेच ग्रामपंचायतच्या नोटीस बोर्डवर ग्रामपंचायतचा अजेंडा काय आहे तसेच ग्रामपंचायत मार्फत कोणकोणते ठराव घेतले जाणार आहेत याची माहिती प्रसारित केली जाईल. तसेच ऐन वेळेस येणारे विषय मांडण्यासाठी किमान दोन दिवस अगोदर ग्रामसेवक तसेच सरपंचांकडे अर्ज सादर करावी लागतील.
अशी नियमानुसार तरतूद असताना, कोणताही ग्रामपंचायत अधिनियमचा वापर न करता बेकायदेशीर सभा त्या ठिकाणी घेतली जात होती. म्हणून त्यांनी त्याचा निषेध करत ग्रामसभेत कोणीही सहभागी होऊ नये व नियमानुसार सभा घेण्यात यावी अशी मागणी केली होती.
परंतु ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांनी भ्रष्ट कारभार करत ग्रामपंचायत ग्रामसभा बोगसपणे आटपण्याची तयारी केलेली. ती बोगस ग्रामसभा थांबविण्यासाठी त्यांनी पुन्हा 24/8/2023 रोजी सहा वाजता लेखी पत्राने सभा ग्रामपंचायत अधिनियम नुसार घेण्यात यावी अन्यथा 25 /8 /2023 रोजी तहसील कार्यालय बारामती येथे उपोषणास बसणार आहे असे असे कळवले होते.
परंतु पदाचा गैरवापर करत ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांनी ग्रामसभा बेकायदेशीर रित्या घेतल्याने प्रियांका देवकाते यांना उपोषणास बसावे लागले.
उपोषणाच्या दुसऱ्याच दिवशी वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हा पूर्व जिल्हाध्यक्ष राज कुमार साहेब यांनी प्रशासनाला जाब विचारत आंदोलनाची दाखल घेण्यास भाग पाडले. तसेच पुणे जिल्हा महासचिव मंगलदास निकाळजे, संपर्क प्रमुख ऍड वैभव कांबळे, ऍड संतोष कांबळे, शहर सचिव विनय दामोदरे तसेच नालंदा विपश्यना प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मण(तात्या) भोसले तसेच आबासो भोसले , काशिनाथ भोसले यांनी उपोषणाची तात्काळ दखल घेत दिनांक 26/8/2023 रोजी स्थानिक प्रशासनाला धारेवर धरत गंभीर दखल घेण्यास भाग पाडत त्यांच्या मागण्या मान्य करून त्यांचे उपोषण सोडण्याचे काम केले.
यामध्ये त्यांचे वडील बाळासो आप्पाजी देवकाते, चुलते यशवंत अप्पाजी देवकाते, शिवाजी देवकते व फक्कड आप्पाजी देवकाते तसेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते दत्तात्रय शिवाजी भोसले, श्री रविदास प्रतिष्ठान निरावागजचे सचिव मा.संदीप भोसले तसेच इतर ग्रामस्थ निरावागज यांनी उपोषणाला पाठिंबा देत प्रशासनावर दबाव निर्माण करत मागण्या मान्य करण्यास भाग पाडले.
प्रशासनाने झालेल्या ग्रामसभेची चौकशी करुन विशेष ग्रामसभा घेणार असल्याचे लेखी दिले. त्यावेळी देवकाते यांनी सर्वांचे आभार मानले व उपोषण मागे घेतले.
No comments:
Post a Comment