Monday, August 28, 2023

अ. ब. ब चक्क उपमुख्यमंत्री यांच्या गावातील ग्रामस्थांचा आवाज का दाबला जातोय?







मुख्यसंपादक -: अमित बगाडे 

बारामती लाईव्ह 



बारामती -: बारामती तालुक्यातील कन्हेरी येथे 15 ऑगस्ट 23 रोजी ग्रामसभेत विविध विषय लोकांच्या अडचणी तसेच विविध योजनेपासून वंचित असलेल्या नागरिकांनी आवाज उठवला ग्रामदैवत मारुती मंदिर याचा ट्रस्ट चा विषय तसेच दानपेटीतील दान हे  कोणालाही विचारात न  घेता ग्रामस्थांचे  असे म्हणणे आहे

 ते दान घराणेशाही हुकूमशाही असणाऱ्या राजकीय मोठ्या कुटुंबाचे व्यक्ती घेऊन जातात तसेच त्या दान पेठी मधील दान नेमक जाते कुठे? त्याचा कुठला हिशोब देखील नाही? एक ना अनेक समस्या तेथील नागरिकांना येत असून त्या समस्यांना सामोरे जावे लागते.


परंतु ग्रामस्थांचा आवाज दाबण्याच्या हेतूने त्यांच्यावरती खोटे केसेस देखील केलेले आहे. आज दिनांक 28 ऑगस्ट 23रोजी ग्रामपंचायत  कन्हेरी येथे ग्रामस्थ कंटाळून आंदोलन उपोषणाला बसले होते. त्या ठिकाणी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी विभाग  रोहित बनकर यांना बोलवण्यात आले. तसेच भाजप बारामती तालुका अध्यक्ष पांडुरंग कचरे हे देखील उपस्थित होते.

काँग्रेस  महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी विभाग रोहित बनकर आल्यानंतर  त्यांनी ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या तात्काळ बारामती पंचायत समितीचे बीडिओ यांना त्या ठिकाणी बोलावले तसेच तात्काळ बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षण त्या ठिकाणी आले. त्यांनी ठराविक नागरिकांशी चर्चा केली व आम्ही सर्व विषय मार्गी लावू.

हा वाद  मिटून ग्रामस्थांना न्याय मिळवून देऊ असे आश्वासन दिले. ग्रामस्थांना समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. कान्हेरी गावातील ग्रामस्थांनी   असे सांगितले आहे की येणाऱ्या चार दिवसात आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही उपोषण करणार आहोत.

तसेच ज्या अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केली आहे त्या अधिकाऱ्यांनी जर दिशाभूल केल्यास त्यांच्यावर देखील कारवाईची मागणी करणार आहे. हा वाद गाव पातळीवर ती मिटेल का? लवकरच नवीन अपडेट बारामती लाईव्ह जनतेसमोर घेऊन येणार आहे.


No comments:

Post a Comment

बारामती लोकसभा निवडणूक 2024 पुरंदर इंदापूर तालुक्यामध्ये मुलगी व सून निवडून आणण्यासाठी केला जातोय का नोटांचा वर्षाव?

 बारामती -: बारामती लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे असू...