Tuesday, October 28, 2025

श्रीरंग एकनाथ चव्हाण यांची पुणे ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रभारी अध्यक्षपदी नियुक्ती



पुणे, दि. 29 ऑक्टोबर 2025 :महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने जाहीर केलेल्या आदेशानुसार श्री श्रीरंग एकनाथ चव्हाण (ता. हवेली, जि. पुणे) यांची पुणे ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रभारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

ही नियुक्ती मा. प्रदेशाध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार करण्यात आली असून, यासंदर्भातील अधिकृत पत्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष अ‍ॅड. गणेश पाटील यांनी जारी केले आहे.


पक्षाच्या ग्रामीण संघटन बळकटीकरणाच्या उद्देशाने करण्यात आलेली ही नियुक्ती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. नव्या जबाबदारीनंतर श्रीरंग चव्हाण यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या अपेक्षा पूर्ण करत संघटन अधिक सशक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

याप्रसंगी वरिष्ठ नेत्यांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
पक्षाच्या स्थानिक व जिल्हास्तरीय कार्यकर्त्यांमध्ये या निर्णयाचे स्वागत करण्यात आले असून, चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पुणे ग्रामीण काँग्रेसला नवे बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.



Saturday, October 25, 2025

चैतन्य हॉस्पिटलमध्ये वाढदिवस साजरा करत मानवतेचा उत्सव — डॉ. शशांक जळक, पत्रकार तैनुरभाई शेख आणि विपुल आण्णा ढवाण पाटील यांच्या वतीने कपडे व साड्यांचे वाटप


बारामती (प्रतिनिधी) — विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाच्या वतीने डॉ. शशांक जळक सर, पत्रकार तैनुरभाई शेख आणि विपुल आण्णा ढवाण पाटील यांचा वाढदिवस चैतन्य हॉस्पिटलमध्ये मोठ्या उत्साहात व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला.

या प्रसंगी हॉस्पिटलमधील महिला कर्मचाऱ्यांना साड्या, पुरुष कर्मचाऱ्यांना कपडे आणि मुलींना नवीन ड्रेसचे वाटप करण्यात आले. त्यानंतर वाढदिवसाचा केक कापून उपस्थित पाहुण्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यात आल्या.

कार्यक्रमाचे शुभहस्ते उद्‌घाटन बारामतीचे हृदय सम्राट ऍड. भार्गवदादा पाटसरक आणि विष्णुपंत चव्हाण मित्र परिवाराचे अध्यक्ष स्वप्निल विष्णुपंत चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नरेंद्र भाऊ मिसाळ यांनी भूषविले, तर प्रमुख उपस्थिती म्हणून भावी नगरसेवक विठ्ठल शेठ आगवणे, श्रीमंत पवन राजे बनसोडे, गरुड कमांडो नेताजी बुरुंगले पाटील (फौजी), सोमनाथ भाऊ रणदिवे, अजयभैय्या कदमविष्णुपंत चव्हाण उपस्थित होते.

वाढदिवसाच्या निमित्ताने डॉ. जळक, तैनुरभाई शेख व विपुल आण्णा यांनी आपल्या मनोगतात म्हटलं की —

“वाढदिवस हा केवळ साजरा करण्याचा नव्हे, तर समाजाशी जोडण्याचा आणि माणुसकी पेरण्याचा दिवस आहे. विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळ समाजासाठी जे काम करत आहे, ते प्रेरणादायी आहे.”

या प्रसंगी भार्गव दादा पाटसरक, स्वप्निल विष्णुपंत चव्हाण, आणि उपस्थित मान्यवरांनीही मंडळाच्या कार्याचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मंडळातील सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.



मुंबई च्या ड्रग्स प्रकरणातील आरोपी बारामती तालुका पोलिसांकडून अटक..'_५० लाखांच्या एम.डी. ड्रग्स प्रकरणातील फरार आरोपीला बारामती पोलिसांकडून बेड्या_


बारामती, दि.२५ -: बारामती तालुका पोलिसांनी  कारवाई करत तब्बल ५० लाखांच्या एम.डी. ड्रग्स प्रकरणातील फरार आरोपीला अखेर गजाआड केले आहे.

        पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुळींज पोलीस ठाणे, नालासोपारा (ईस्ट), मीरा-भाईंदर वसई-विरार आयुक्तालयात (दि.१४ सप्टेंबर) रोजी एनडीपीएस कायदा १९८५ अंतर्गत तसेच अन्य कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी नामे शहबाज हमीद शेख,  योगेश राजू राठोड, जफर आसिफ शेख, बाबू शेख आणि  समीर शेख यांच्याविरुद्ध कारवाई सुरू होती.यापैकी समीर उर्फ नूर मोहम्मद अस्लम शेख (वय २०, रा. वसई) हा फरार असून बारामती परिसरात असल्याची माहिती वसई विरार पोलीस आयुक्तालयातील पोलिसांनी बारामती तालुका पोलिसांना दिली होती.  पथकाने शोधमोहीम राबवत तो बारामती शहरात वास्तव्यास असून 'ब्रँड रिव्हर' या कपड्याच्या दुकानात काम करतो अशी खात्रीशीर माहिती मिळाली. 

यानंतर, पोलिसांनी हुशारीने आखलेल्या योजनेनुसार पथकाने पाहणी करत आरोपीची ओळख पटवली आणि क्षणाचाही विलंब न करता त्याला ताब्यात घेतले. बारामती पोलिस ठाण्यात चौकशीदरम्यान त्याने तुळींज पोलीस ठाण्यातील गुन्ह्यातील फरार आरोपी असल्याचे कबूल केले. तत्काळ मीरा-भाईंदर वसई विरार आयुक्तालयास माहिती देऊन आरोपीस त्यांच्या ताब्यात पुढील तपासासाठी सुपूर्द करण्यात आले.

      ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, स.पो.नि. विक्रम पवार, सहाय्यक फौजदार सुरेंद्र वाघ, सुरेश बडे, आणि पोलीस अंमलदार निलेश वाकळे राहुल लांडगे यांच्या पथकाने केली.
आरोपीस मीरा भाईंदर पोलीस, तुळींज पोलिस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक राख, पोलीस हवालदार कांबळे व पोलीस कॉन्स्टेबल सोनवणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

Friday, October 10, 2025

मराठी उन्नती सामाजिक संस्थेच्या वतीने तृतीय वर्धापन दिनानिमित्त मराठी नव उद्योजकांसाठी उपक्रम

मुंबई प्रतिनीधी: महेश कदम 


मराठी उन्नती सामाजिक संस्था, मुंबई  (मराठी उद्योग समाज) यांचा साठ्ये कॉलेज, विले पार्ले येथे नुकताच तिसरा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. करोना काळामध्ये छोट्या-मोठ्या मराठी व्यावसायिकांना विक्रीसाठी मदत व्हावी आणि त्यांच्या व्यावसायाला चालना मिळावी या उद्देशाने संस्थेचे अध्यक्ष श्री. सुहास तावडे, कार्याध्यक्ष श्री. सहदेव सांवत, सरचिटणीस श्री. विनायक सुर्वे,  तसेच समाजसेविका श्रीमती आशाताई परब  यांच्या संकल्पनेतून एक व्हाॅट्स ॲप ग्रुप चालू करण्यात आला होता, 

बघता बघता सर्व क्षेत्रातील आठशे ते नउशे लहान-मोठे व्यावसायिक त्या ग्रुप वर जोडले गेले, करोना काळ संपताच या समुहाद्वारे दिवाळी सणानिमित्ताने विरार येथे भव्य विक्री मेळावा देखील आयोजित केला, अंधेरी पुर्व रेल्वे हाॅलमध्ये गणपती सणानिमित्त विक्री मेळावा आयोजित करून व्यावसायिकांना मार्गदर्शन करण्यात आले असे बरेच लाहान मोठे उपक्रम राबविण्यात आले. ग्रुप च्या माध्यमातून व्यावसायिकांना मिळत असलेला लाभ आणि त्यांचा प्रतिसाद पाहून संस्था नोंदणीकृत करुन वर्धापन दिनानिमित्त नव व्यावसायिकांसाठी मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला. 

सदर कार्यक्रमात ज्येष्ठ उद्योजकांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले, विशेष अतिथी म्हणून लाभलेले लाॅजिस्टीक क्षेत्रात परदेशात देखील आपला व्यवसाय वाढविणारे जेष्ठ उद्योजक मा.श्री. सुरेश कदम, आयात-निर्यात उद्योजक श्री. दिपक परब, नामांकित बांधकाम उद्योजक श्री. जगन्नाथ मोरे, फार्मा उद्योजक श्री. संदीप तावडे, सी.ए. श्री. संतोष घाग, जनकल्याण सहकारी बँकेने अध्यक्ष श्री. संतोष केळकर, समाजसेविका उद्योजिका सौ. उल्का विश्वासराव या सर्व मान्यवरांनी उपस्थितीतांना त्यांच्या-त्यांच्या क्षेत्रातील अनुभव सांगुन मार्गदर्शन केले, विषेश करून तरुणांना व्यावसाय वाढीसाठी आपण निश्चितच सहकार्य करु असे आश्वासन देण्यात आले.

मा.श्री. प्रदिप सावंत जिल्हा प्रकल्प अधिकारी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) यांनी व्यावसाय संबधित महाराष्ट्र शासनाची धोरणे व योजनांची माहिती दिली तथा त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. सोबतच मुंबई जिल्हा सह. बॅकेंचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री. संदिप सुर्वे यांनी मुंबई बॅकेंच्या, व्यावसायिकांसाठी असलेल्या योजनांची माहिती देऊन सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. 

कार्यक्रमात नव व्यावसायिकांना देखील सन्मान चिन्ह देऊन प्रोत्साहित करण्यात आले. संस्थेचे सरचिटणीस श्री. विनायक सुर्वे यांनी प्रास्ताविक भाषणात संस्थेची ध्येय धोरणं सांगितली. कार्याध्यक्ष श्री. सहदेव सावंत यांनी व्यावसायिकांनी संस्थेचे सभासदत्व घेउन संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा लाभ घेऊन आपला व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करावेत. अध्यक्ष श्री. सुहास तावडे यांनी अनुकूल परिस्थिती मध्ये देखील आम्ही आमचा व्यवसाय कसा वाढविला याचे अनुभव सांगुन प्रोत्साहित केले.

 उपाध्यक्ष श्री. अनिल कदम यांनी मराठी तरुणांनी काॅर्परेट आणि इंडस्ट्रीयल क्षेत्रा संबंधित व्यावसाय करणे देखील आवश्यक आहे आणि त्यासाठी आपल्या मध्ये मार्केटिंग कला अवगत करणे महत्त्वाचे आहे आणि लवकरच संस्थेच्या वतीने त्या संबंधित मार्गदर्शन शिबिर आयोजित करणे, जिएसटी अधिकार्यांचे मार्गदर्शन कार्यक्रम त्याचबरोबर जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी संस्थेच्या वतीने उपक्रम राबविण्यात येणार असून व्यावसायिकांनी त्याचा लाभ घेऊन आपल्या व्यावसायाला चालना द्यावी असे संबोधले. 

संस्थेचे मार्गदर्शक/ पदाधिकारी श्री. सुभाष दरेकर साहेब हे भारतीय सेने मध्ये सुभेदार पदावर देशसेवा करुन निवृत्ती नंतर बँक आणि खाजगी कार्यालयात खाजगी सुरक्षा पुरविण्याचा यशस्वीपणे व्यावसाय देखील करत असल्याने आमच्या साठी ते नक्कीच प्रेरणादायी आहे म्हणून त्यांचे अभिनंदन करुन विशेष अतिथींचे आभार मानले.

 त्याचबरोबर सर्व व्यावसायिक उपस्थितांचे आभार मानुन राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सागंता करण्यात आली. संस्थेच्या सर्व पदाधिकार्यांनी विषेश करून श्री. विकास राणे, श्री. शैलेश माने, श्री. सुर्यकांत बावकर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यास मोलाचे सहकार्य केले.

शहरात १२ ऑक्टोबर रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम



बारामती, दि. 8: शहरामध्ये १२ ऑक्टोबर रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम आयोजन करण्यात येणार असून ०-५ वयोगटातील सर्व बालकांचे पोलिओ लसीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश जगताप यांनी दिली आहे. 

जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी, जिल्हा शल्यचीकीत्सक डॉ. नागनाथ यमपल्ले, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार गणेश शिंदे, नगरपालिका मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे.

शहरामध्ये एकूण ८ हजार ५०० बालकांना एकूण ५२ लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात येणार आहे. या मोहिमेकरिता एकूण दोनशे कर्मचारी, आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविकांचा सहभाग असणार आहे. त्यामुळे अधिकाधिक बालकांना लसीकरण करुन घ्यावे. लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांना १३ ते १८ ऑक्टोबर या कालावधीमध्ये घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात  येणार आहे, अशी माहिती डॉ. जगताप यांनी  प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

नागपूरच्या संविधान चौकात ओबीसी समाजाचा जन आक्रोश मोर्चा


 तालुका प्रतिनिधी/ सुभाष नाकतोडे 
 
ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी तालुक्यातील हजारो लोकांच्या उपस्थितीत नागपूरच्या संविधान चौकातील ओबीसी महामोर्चात समाजबांधवांनी प्रचंड संख्येने हजेरी लावून आपल्या हक्काच्या आरक्षणासाठी एकजूट दाखवली. 

मराठा समाजाकडून ओबीसी आरक्षणावर होत असलेला अन्यायकारक आक्रमण थांबवावे आणि २ सप्टेंबरचा ओबीसींना घातक ठरणारा काळा जीआर रद्द करावा, जातीय जनगणना झाली पाहिजे ज्याची जेवढी टक्केवारी तेवढी त्याची हिस्सेदारी  मिळाली पाहिजे या मागणीसाठी जनतेचा महासागर नागपुरात  उसळला.

या मोर्चात काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना अशा सर्व राजकीय पक्षांतील ओबीसी बांधवांनी कोणताही भेदभाव न करता एकत्र येत समाजहितासाठी ऐतिहासिक ऐक्य दाखवले आणि या महामोर्चाला प्रतिसाद दिला. 

जो पर्यंत २ सप्टेंबरला  काढलेला जीआर रद्द होत नाही व जातीय जनगणना होत नाही तोपर्यंत हा लढा असाच चालू राहील.

जनतेचा सवाल : बलात्कारी, सेटलमेंट बादशहा आणि मलिदा गॅंगशी संबंध असलेले उमेदवार पुन्हा बारामतीवर राज्य करणार का?


“बारामती नगरपरिषदेच्या रणधुमाळीत प्रश्न — नगराध्यक्ष ‘चारित्र्यहीन, जातीयवादी, घराणेशाहीचा’ असावा का?”


बारामती (प्रतिनिधी)बारामती नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. पण या वेळी जनतेच्या मनात एक वेगळाच प्रश्न घुमतोय — “नगराध्यक्ष कोण असावा?” आणि त्याहून मोठा प्रश्न — “कोण नसावा?”

बारामतीकर आता विचारत आहेत —
👉 नगराध्यक्ष चारित्र्यहीन, बलात्कारी किंवा गुन्हेगार वृत्तीचा असावा का?
👉 नगरसेवक जातीयवादी प्रवृत्तीचा, घराणेशाहीत अडकलेला किंवा मलिदा गॅंग-सेटलमेंट बादशहा गटाशी संबंधित असावा का?
👉 शोरूम-राजकारण, पैसा आणि दबाव यांच्या बळावर निवडून येणारे उमेदवारच पुन्हा हक्क सांगणार का?

की आता बारामतीकर म्हणणार — “आम्हाला हवेत ते जनतेच्या न्यायासाठी उभे राहणारे, गरीबांच्या पाठीशी खंबीर उभे राहणारे उमेदवार”?

बारामती शहरात नुकत्याच झालेल्या सामाजिक चर्चांमध्ये हा प्रश्न ठळकपणे समोर आला —
“नगराध्यक्ष असा असावा का की जो शनिवारवाड्याला मध्यरात्री गुप्त मिटिंग करून प्रकरण मिटवतो?”
“की असा असावा जो अन्यायग्रस्तांच्या हक्कासाठी उभा राहतो?”

शहरात सध्या या चर्चेला जोरदार उधाण आले आहे.
काही नागरिक विचारतात — “बारामतीला आता स्वच्छ, निडर आणि प्रामाणिक नेतृत्व मिळेल का?”
तर काही म्हणतात — “घराणेशाहीचा शेवट या निवडणुकीत होणार का?”

आगामी काही दिवसांत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होताच, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न बनला आहे —
या वेळी बारामतीच्या जनतेच्या भावना कोणत्या उमेदवारांवर उतरतील?
आणि अखेर बारामतीला “जनतेचा” नगराध्यक्ष मिळेल का?


💬 चर्चेतील प्रश्न:

  1. बारामतीला खऱ्या अर्थाने “जनतेचा” नगराध्यक्ष मिळणार का?
  2. पैसा, सेटलमेंट आणि घराणेशाही यांचा शेवट या निवडणुकीत होईल का?
  3. पात्र, प्रामाणिक आणि सामान्य जनतेच्या बाजूने उभा राहणारा उमेदवार कोण ठरणार?


"कोर्टाचा निकाल न लागता आरोपीला गुन्हेगार ठरवणे — ‘कायद्याचा अपमान’ की ‘प्रशासनाची हिंमत’?"


🟨 उपशीर्षक :

BNS 2023 नंतरही पोलीस व माध्यमांकडून आरोपींच्या दिंडी काढण्याची प्रथा — ‘न्याय मिळेपर्यंत निर्दोषत्व’ तत्त्वावर गंभीर प्रश्नचिन्ह


बारामती :१० ऑक्टोबर २०२५ — नवीन दंड संहिता Bharatiya Nyaya Sanhita (BNS) 2023 लागू होऊनही, काही ठिकाणी पोलीस प्रशासन आणि माध्यमांकडून आरोपींना “गुन्हेगार” म्हणून सादर करण्याचे प्रकार सुरूच आहेत.

कोर्टाने दोष सिद्ध करण्याआधीच आरोपींच्या दिंडी काढणे, नाव-छायाचित्र प्रसारित करणे आणि सार्वजनिक बदनामी करणे — हे केवळ अन्यायकारकच नव्हे तर संविधानाच्या आत्म्याविरुद्ध आहे, असा सवाल आता मानवाधिकार तज्ज्ञ उपस्थित करत आहेत.

न्याय मिळेपर्यंत निर्दोषत्व (Presumption of Innocence)” हा न्यायव्यवस्थेचा मूलाधार आहे. मात्र काही घटनांमध्ये हा तत्त्व दुर्लक्षित होताना दिसतो — आणि न्यायालयाऐवजी “जनतेचा न्याय” देण्याची प्रवृत्ती वाढताना दिसते.


⚖️ कायदेशीर पार्श्वभूमी :

  • BNS 2023 कलम 356 (Defamation) अंतर्गत, कोणत्याही व्यक्तीच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवणारा खोटा आरोप हा गुन्हा आहे.
  • संविधान कलम 14 (समतेचा हक्क) आणि कलम 21 (जीवन व व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्क) आरोपीला सन्मानाने न्यायप्रक्रिया मिळण्याची हमी देतात.
  • राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानुसार, “आरोपीला कोर्टात दोष सिद्ध होईपर्यंत गुन्हेगार म्हणून वागवणे हे मानवी प्रतिष्ठेचे उल्लंघन आहे.”

📍 उदाहरण :

नाशिक जिल्ह्यातील एका व्यापाऱ्यावर आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप झाला.
पोलिसांनी त्याला चौकात फिरवत “गुन्हेगार” अशी घोषणा देत दिंड काढली.
माध्यमांनी हे दृश्य थेट प्रक्षेपित केले.
काही महिन्यांनंतर न्यायालयाने त्या व्यापाऱ्याला निर्दोष ठरवले — मात्र त्याच्या प्रतिष्ठेवर झालेलं डाग पुन्हा कधीच पुसले गेले नाहीत.
नोकरीच्या संधी, सामाजिक मान-सन्मान, कुटुंबातील मानसिक ताण — हे सर्व त्या व्यक्तीच्या आयुष्याचा भाग बनले.

हा प्रकार फक्त एका व्यापाऱ्याचा नाही, तर “न्यायालयाआधीच शिक्षा देण्याची नवी विकृती” ठरत आहे.


🧾 मानवाधिकार आणि सामाजिक परिणाम :

मानवाधिकार तज्ज्ञांच्या मते, “दोष सिद्ध न होता आरोपीची सार्वजनिक दिंड काढणे म्हणजे कायद्यावर आणि मानवतेवर अन्याय.”
पोलीस किंवा मीडिया एखाद्याला “गुन्हेगार” म्हणतात, तेव्हा समाज त्याला दोषी समजतो — आणि कोर्टाचा निकाल नंतर जरी निर्दोष ठरवला, तरी त्या व्यक्तीचं जीवन पुन्हा पूर्ववत होत नाही.

ही कृती न्यायव्यवस्थेवरील लोकांचा विश्वास ढासळवते आणि “कायद्याच्या समतेचा पाया कमजोर करते.


💬 स्पष्ट प्रश्न समाजासमोर :

  • न्यायालयाऐवजी “जनमत न्यायालय” चालवणं — हे संविधानावरील विश्वासाला धक्का नाही का?
  • आरोपीच्या हक्कांवर पोलीस वा मीडिया पाय ठेवत आहेत का?
  • मानहानी’ आणि ‘मानवाधिकार उल्लंघन’ यांच्या मधली ही बारीक पण धोकादायक रेषा कोण पाळणार?
  • आणि अखेर — दोषी ठरवण्याचा अधिकार पोलिसांना आहे का, की फक्त न्यायालयालाच?

🚨 अतिरिक्त संवेदनशील मुद्दा :

काही पोलीस कर्मचारी स्वतः लाचखोरी, महिला सहकाऱ्यांचा विनयभंग, व अन्य अनैतिक कृत्यांमध्ये सापडतात.
अशा प्रसंगी त्यांच्या “दिंडी” काढली जाते का?
त्यांच्या छायाचित्रांसह “गुन्हेगार” म्हणून मिरवणूक काढली जाते का?
जर नाही, तर मग ही “दिंड परंपरा फक्त सामान्य नागरिकांपुरतीच का राखली जाते?” — असा प्रश्न आता जनतेतून जोरदारपणे उपस्थित केला जात आहे.

मानवतेच्या आणि कायद्याच्या दृष्टीने हे दुहेरी मापदंड थांबवणे आवश्यक आहे.
“मानवी अधिकार कायदा अस्तित्वात आहे का आणि प्रशासन त्याचे पालन करणार का?” — हा प्रश्न आजच्या परिस्थितीत अधिक ज्वलंत बनला आहे.


🧭 निष्कर्ष :

नवीन BNS 2023 लागू झाल्यानंतर, कायद्याने स्पष्ट सांगितले आहे की प्रत्येक व्यक्तीला न्यायप्रक्रियेनंतरच दोषी ठरवले जाऊ शकते.
म्हणूनच, न्यायालयाचा निकाल लागण्याआधी आरोपीला “गुन्हेगार” ठरवणं — हे कायद्याचं उल्लंघन, मानवी प्रतिष्ठेचा अपमान आणि लोकशाहीवरील विश्वासाचा घात आहे.

🔹 समाजाने आणि माध्यमांनी लक्षात ठेवावे — 👉
“कोर्टाने दोष सिद्ध करण्याआधी कोणीही गुन्हेगार नाही.”



Thursday, October 9, 2025

मोबाईल टॉवरच्या केबल चोरी करणारी टोळी शिताफीने गजाआड! सुपा पोलिसांची दमदार कामगिरी

मोबाईल टॉवरवरील केबल चोरी करणाऱ्या टोळीचा सुपा पोलिसांनी पर्दाफाश करत चार आरोपींना गजाआड केले आहे. त्यांच्या ताब्यातून तब्बल अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पोलिसांनी दाखविलेली तत्परता व शिताफीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दि. ८ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री रात्रगस्तीदरम्यान पो.हवा. राहुल भाग्यवंत यांना गुप्त बातमी मिळाली की, बारामती तालुक्यातील तरडोली गावात एका पत्र्याच्या शेडमध्ये काही व्यक्ती चोरीच्या मोबाईल टॉवर केबलमधून तांब्याच्या तारा वेगळ्या करत आहेत. ही माहिती सुपा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी स.पो.नि. मनोजकुमार नवसरे यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने पहाटे ३ वाजताच्या सुमारास छापा टाकून चार संशयितांना रंगेहाथ पकडले.


पकडलेले आरोपी असे :
१) ओम राजेंद्र कासवदे (१९),
२) संतोष सतिश गायकवाड (१९),
३) करण भाऊसाहेब आरखडे (१९), तिघेही रा. मोरगाव, ता. बारामती, जि. पुणे,
४) आण्णा आंबादास कोकाटे (२९), रा. कुंभेजा, ता. परांडा, जि. धाराशीव.

त्यांच्याकडून ३ केबल कटर, टॉवर केबल आणि सोललेल्या तांब्याच्या तारा मिळाल्या. पोलिसांनी चौकशीअंती समजले की, या टोळीने ३ ते ६ ऑक्टोबरदरम्यान तरडोली, बाबुर्डी आणि कुतवळवाडी येथील मोबाईल टॉवरमधील केबल चोरी केल्या होत्या. या प्रकरणी मोबाईल टॉवर व्यवस्थापकाच्या फिर्यादीवरून सुपा पोलीस स्टेशनमध्ये तीन स्वतंत्र गुन्हे (क्र. १७८/२०२५, १७९/२०२५, १८०/२०२५) नोंदविण्यात आले आहेत.

आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिली आहे. त्यांच्या कडून सुमारे ₹२.५० लाखांचा मुद्देमाल व दोन मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

सदर प्रकरणाचा पुढील तपास सहा. फौजदार वाघोले आणि पो.हवा. गजरे करीत आहेत. पोलिसांना आणखी काही चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता असल्याचे समजते.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. मनोजकुमार नवसरे, पोसई कोळी, मोहरकर, जयंत ताकवणे, सहा. फौजदार वाघोले, पो.हवा. राहुल भाग्यवंत, विशाल गजरे, रुपेश साळुंके, संदिप लोंढे, अनिल दणाने, पो.कॉ. अमोल चिरमे, किसन ताडगे, महादेव साळुंके, निहाल वणवे, सागर वाघमोडे आणि सचिन दरेकर यांच्या पथकाने केली.

सुपा पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे परिसरातील मोबाईल टॉवर चोरीच्या घटनांवर आळा बसण्याची शक्यता आहे.

Wednesday, October 8, 2025

आमदार बंटी भांगडीया यांच्या उपस्थितीत प्रमुख काॅग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते चा भाजपा मध्ये प्रवेश


 तालुका प्रतिनिधी /सुभाष नाकतोडे 

 ब्रह्मपुरी : चिमुर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार श्री किर्तीकुमार उर्फ बंटीभाऊ भांगडीया ७.१०. २०२५   हे ब्रम्हपुरी येथे दौऱ्यावर असताना ब्रम्हपुरी तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्या काॅग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी सौ. स्मीताताई राजेश पारधी व श्री राजेश पारधी यांच्या सह त्यांच्या सह अनेक लोकांनी भाजपामध्ये पक्ष प्रवेश केला  .

राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस श्री. रविंद्रजी चव्हाण भाजपा प्रदेशाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनात कार्य करणारे कार्यसम्राट आमदार बंटी भांगडीया यांच्या कार्यशैलीने प्रभावीत होऊन शासकीय विश्रामगृह ब्रम्हपुरी येथे भारतीय जनता पार्टीत रितसर प्रवेश घेतला.

यावेळी श्री कृष्णा सहारे,  श्री दिपक उराडे, श्री विलास विखार, श्री सुधीर दोनाडकर, श्री विलास उरकुडे, श्री रवि मेश्राम, श्री सुरेश दर्वे, श्री गणेश  तर्वेकर, श्री अवेश पठाण व श्री संजय गजपुरे हे प्रमुख भाजपा पदाधिकारी व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Monday, October 6, 2025

कै नामदेवराव नालंदे प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद - अप्पर पोलीस अधीक्षक श्री गणेश बिरादार


प्रतिनिधी - बारामती येथील ज्येष्ठ नागरिक संघ येथे दिनांक 5 ऑक्टोबर रोजी कै नामदेवराव नालंदे यांच्या आठव्या स्मृतीदिनानिमित्त प्रतिष्ठान तर्फे बारामती व पंचक्रोशीतील पत्रकार बांधवांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी श्री गणेश इंगळे पोलीस उपयुक्त पुणे, श्री गणेश बिरादार अप्पर पोलीस अधीक्षक, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव तसेच दीपक वाबळे, माधव जोशी व सर्व पत्रकार बांधव व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

   यावेळी बोलताना योगेश नालंदे यांनी प्रतिष्ठानच्या कार्याबद्दल माहिती पत्रकार बांधवांना दिली, यानंतर बारामती मधील पत्रकार क्षेत्रातील मानाचा पुरस्कार समजला जाणारा "कै नामदेवराव नालंदे जीवनगौरव पुरस्कार", मरणोत्तर कै द.रा. पवार यांना तसेच पळशी येथील पत्रकार श्री काशिनाथ पिंगळे यांना देण्यात आला. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने पत्रकार बांधवांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना गणेश इंगळे सर व गणेश बिरादार सर यांनी पत्रकार बांधवांना शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले.

श्री बिरादार म्हणाले की, डिजिटल काळातील पत्रकारितेमधील बदल स्वीकारून पत्रकारांनी अपडेट राहिले पाहिजे. बऱ्याच घटना या पत्रकारांच्या सतर्कतेमुळे उघड होतात. खरी पत्रकारिता करून हा लोकशाहीचा स्तंभ मजबूत करण्याचे काम पत्रकार बांधव करत आहेत.

या कार्यक्रमासाठी नानासाहेब साळवे, प्रशांत नालंदे, मेघराज नालंदे, किरण हिवरे, प्रदीप ढुके व सहकाऱ्यांनी सहकार्य केले. चंदूकाका सराफ यांच्या वतीने कार्यक्रमासाठी ट्रॉफी सौजन्य दिले होते.

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल्याच्या प्रयत्नाचा तीव्र निषेध — हा राष्ट्रद्रोह ठरवावा : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले


मुंबई, दि. ६ ऑक्टोबर : भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाचा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

ना. आठवले म्हणाले की, “सरन्यायाधीशांवरील हल्ला हा केवळ एका व्यक्तीवरील नव्हे तर भारताच्या संविधानावर आणि लोकशाहीच्या आत्म्यावर झालेला हल्ला आहे. न्यायप्रिय प्रत्येक नागरिकावरील हा प्रहार आहे.”

त्यांनी मागणी केली की, “हल्लेखोरावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी.”
आठवले यांनी स्पष्ट केले की, न्यायपालिका ही लोकशाहीचा “प्राण” आहे आणि सरन्यायाधीशांवरील हल्ला म्हणजे संविधान, न्यायव्यवस्था आणि समतेच्या मूल्यांवर आघात होय.

ना. आठवले म्हणाले की, “महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चातुर्वर्णातून आलेला जातीभेद, वर्णभेद आणि सामाजिक असमानता संविधानातून नष्ट केली. परंतु काहींच्या मनातून आजही जातीभेद व भेदभाव गेलेले नाहीत. त्याच जातीवादी विचारसरणीतून हा निंदनीय हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे.”

शेवटी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारला आवाहन केले की, “सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा प्रयत्न हा राष्ट्रद्रोह ठरवून आरोपींवर तातडीने कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी.”

🔴 ब्लॅकमेल व मानसिक छळातून तरुणाची आत्महत्या; खडकवासला येथील तिघांविरुद्ध गुन्हा, आरोपी तरुणीचे वडील API – अटकेबाबत चर्चेला उधाण

बारामती तालुक्यातील मौजे रुई बयाजीनगर येथे घडलेल्या धक्कादायक घटनेत 23 वर्षीय तरुणाने मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची...