बारामती (प्रतिनिधी) — विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाच्या वतीने डॉ. शशांक जळक सर, पत्रकार तैनुरभाई शेख आणि विपुल आण्णा ढवाण पाटील यांचा वाढदिवस चैतन्य हॉस्पिटलमध्ये मोठ्या उत्साहात व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला.
या प्रसंगी हॉस्पिटलमधील महिला कर्मचाऱ्यांना साड्या, पुरुष कर्मचाऱ्यांना कपडे आणि मुलींना नवीन ड्रेसचे वाटप करण्यात आले. त्यानंतर वाढदिवसाचा केक कापून उपस्थित पाहुण्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यात आल्या.
कार्यक्रमाचे शुभहस्ते उद्घाटन बारामतीचे हृदय सम्राट ऍड. भार्गवदादा पाटसरक आणि विष्णुपंत चव्हाण मित्र परिवाराचे अध्यक्ष स्वप्निल विष्णुपंत चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नरेंद्र भाऊ मिसाळ यांनी भूषविले, तर प्रमुख उपस्थिती म्हणून भावी नगरसेवक विठ्ठल शेठ आगवणे, श्रीमंत पवन राजे बनसोडे, गरुड कमांडो नेताजी बुरुंगले पाटील (फौजी), सोमनाथ भाऊ रणदिवे, अजयभैय्या कदम व विष्णुपंत चव्हाण उपस्थित होते.
वाढदिवसाच्या निमित्ताने डॉ. जळक, तैनुरभाई शेख व विपुल आण्णा यांनी आपल्या मनोगतात म्हटलं की —
“वाढदिवस हा केवळ साजरा करण्याचा नव्हे, तर समाजाशी जोडण्याचा आणि माणुसकी पेरण्याचा दिवस आहे. विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळ समाजासाठी जे काम करत आहे, ते प्रेरणादायी आहे.”
या प्रसंगी भार्गव दादा पाटसरक, स्वप्निल विष्णुपंत चव्हाण, आणि उपस्थित मान्यवरांनीही मंडळाच्या कार्याचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मंडळातील सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment