मुख्यसंपादक -: अमित बगाडे
मंचर -: राज्याच्या मंत्री मंडळाचे खातेवाटप झाल्यानंतर सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील आंबेगाव तालुक्यात प्रथमच आले होते. नागरिकांना भेटण्यासाठी ते पारगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या अतिथीगृहात थांबले होते. यावेळी संपूर्ण आंबेगाव तालुका तसेच शिरूर तालुक्यातील असंख्य नागरिक तसेच कार्यकर्ते आपल्या कामांची निवेदन घेऊन वळसे पाटील यांना भेटण्यासाठी आले होते.
तर काहीजण वळसे पाटील यांची सहकारमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यासाठी आले होते
सर्वसामान्य नागरिकांना आपल्या भेटीसाठी बराच वेळ ताटकळत उभे राहावे लागले. त्या गर्दीत अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिला असल्याचे समजताच राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील हे स्वत : खुर्चीवरून उठून नागरिकांमध्ये येऊन उभे राहिले. त्यांनी नागरिकांचे प्रश्न समजून घेऊ लागल्याने उपस्थित सगळेजण आपला नेता आपल्यातच येऊन उभा राहिल्याचे पाहून भारावून गेले.
वळसे पाटील कार्यालयात बसून प्रत्येक नागरिकांचे व भेटीसाठी आलेल्या शिष्टमंडळाचे म्हणणे समजावून घेऊन जे काम फोनवर होत असेल तर लगेच स्वीय सहाय्यकाला संबधिताला फोन लावून लगेच प्रश्न मार्गी लावत होते तर काहींना पत्राची आवश्यकता आहे. त्यांच्यासाठी लगेच पत्र या वळसे पाटलांच्या वेगवान कामाच्या शैलीमुळे कृतीने भारावून गेले.
No comments:
Post a Comment