Friday, July 7, 2023

बारामती शहर व एमआयडीसी परिसरामध्ये कमिशन एजंट चा सुळसुळाट !


 बारामती -: बारामती शहर व एमआयडीसी परिसरात शिक्षणासाठी तसेच नोकरीसाठी बारामती मध्ये वास्तव्य करण्यासाठी येतात त्या अनुषंगाने त्यांना राहण्यासाठी1bhk,2bhk, तसेच बंगलो, रोहाऊस रेंट वर  पाहिजे असता त्यांच्या या अडचणीचा फायदा घेत कमिशन एजंट त्या ग्राहकांची लूटमार करीत आहे ते फ्लॅट तर देतात परंतु पहिले भाडे पूर्ण कमिशन म्हणून घेतात.


त्या ग्राहकांचे असे म्हणणे आहे की तुम्ही तुमची एक रजिस्टर फी घ्या. या कमिशन एजंट चे कुठे रजिस्टर असते  का? आपण हॉटेलमध्ये गेलो तर जीएसटी भरतो यांना जीएसटी बसतो का? यांची कुठे नोंदणी आहे का?  परंतु अशाप्रकारे अडवणूक करतात  व ग्राहकांची लुटमार  होत आहे परंतु कमिशन एजंट हे जबरदस्ती त्यांच्याकडून पहिले भाडे घेतात अशा प्रकारच्या एक ना अनेक तक्रारी ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती यांना प्राप्त झालेला असून.ही ग्राहकांची लुटमार थांबवण्यासाठी संबंधित बारामती शहर पोलीस स्टेशन तसेच बारामती तालुका पोलीस स्टेशन तसेच पुणे ग्रामीण पोलीस कार्यालयास बारामती शहरातील व एमआयडीसी भागातील कमिशन एजंट वरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी  करण्यात आलेले असून  तसेच ऑनलाईन मेलद्वारे तक्रार दाखल केली आहे .

ज्या ग्राहकांची अशाप्रकारे कमिशन एजंट लूटमार करत असेल तर ती लुटमार थांबवण्यासाठी ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीशी संपर्क 7888127878 या नंबर वर संपर्क साधा असे आव्हान ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे पश्चिम महाराष्ट्र सचिव यांनी केले आहे. बारामती शहरात ग्राहकांची लूटमार होत असेल तर त्यांची लुटमार थांबवण्यासाठी ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती कटिबद्ध आहे.

No comments:

Post a Comment

बारामती लोकसभा निवडणूक 2024 पुरंदर इंदापूर तालुक्यामध्ये मुलगी व सून निवडून आणण्यासाठी केला जातोय का नोटांचा वर्षाव?

 बारामती -: बारामती लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे असू...