Wednesday, July 12, 2023

भुंकणाऱ्या प्रत्येकाला दगड मारण्यात वेळ वाया नका घालवू .काहींना बिस्कीट देऊन पुढे चालायला शिका ......



मुख्यसंपादक -: अमित बगाडे 

आयुष्याची काही गणित आहेत,ज्याला ती सोडवता आली तो खरा यशस्वी. पण मग सगळीच गणित सोडवायची असतातच का ? तर त्यावर मी तर असेच सांगेल की काही गणित सोडून द्या मग ती आपोआप सुटतात व मनाचा गुंता ही वाढत नाही. आपल्या जन्मापासून अगदी मृत्यू पर्यत प्रत्येकजन हा स्पर्धेतच वाढत असतो. स्पर्धा असते शिक्षणाची, स्पर्धा असते नोकरीची,स्पर्धा असते व्यवहारांची ,स्पर्धा असते विचारांची,स्पर्धा असते सुखाची,सर्वच क्षेत्रात स्पर्धा अटळ आहे.


अशा स्पर्धेच्या युगात जेवढी लोक साथ  देतात तेवढीच लोक आपल्याला मागे खेचायला तयार असतात, मग खचून नाही जायचं आपण आपल्या वेगाने चालत राहायचं. दुःख याच नसते की परक्यांनी मागे खेचायचा प्रयत्न केलाय, दुःख याच जास्त होत की यामध्ये आपल्या जवळच किंवा ज्याला आपण खूप जवळचा मानतो त्याने खेचण्यासाठी प्रयत्न केलेला असतो.

 मित्रहो इतिहास साक्षी आहे की गद्दारी अथवा धोका हा नेहमी जवळचे करतात. पण असे असले तरी याला काही जवळचे अपवाद ही आहेत.मग विश्वास ठेवायचा नक्की कोणावर हा तर सगळ्या जगाला पडणारा प्रश्न आहे.

जीवनाच्या प्रवासात असंख्य प्रकारची  लोक तुम्हाला भेटतील, काही ओरडतील,काही धावतील,काही मारतील,काही सोबत तर काही विरोधी असतील पण यातून एक धडा नक्की घ्या प्रत्येकला उत्तर देण्यात वेळ वाया नका घालवू . काहींना बरोबर घ्या, काहींना हिशोबात ठेवा, काहींना बरोबर ठेवून दूर ठेवा, तर काहींना काहीही झालं तरी बरोबर घेऊ नका. आता माणसांचा अभ्यास करण्याची वेळ अली आहे.चेहरे पर मत जावो अपनी अकल लगावो.

 मनुष्य प्राणी जरी भावनांनी भरलेला  असेल तरी आता मात्र प्रॅक्टिकल राहून विचार करण्याची वेळ अली आहे. 
म्हणूनच भुंकनाऱ्या प्रत्येकाला दगड मारत बसलात तर मुक्कामी कधीच पोहचणार नाही, म्हणून काहींना द्या की बिस्कीट खायला आणि आपला जीवन प्रवास चालू ठेवा ...... 
बरोबर ना ?????????????

No comments:

Post a Comment

बारामती लोकसभा निवडणूक 2024 पुरंदर इंदापूर तालुक्यामध्ये मुलगी व सून निवडून आणण्यासाठी केला जातोय का नोटांचा वर्षाव?

 बारामती -: बारामती लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे असू...