Tuesday, July 25, 2023

पुणे महानगरपालिका समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून महिलांना योजनांची माहिती



मुख्यसंपादक -: अमित बगाडे 


कोंढवा खुर्द -: महानगरपालिकेच्या योजना या बहुतांश लोकांना माहिती नसतात. या योजना लोकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून दिया फाउंडेशनच्या कार्यालयात महिलांना सर्व योजनांची माहिती देण्यात आली.


यावेळी शैक्षणिक अर्थसहाय्य योजना,  अपंग अर्थसहाय्य योजना, विधवा महिलांसाठी योजना, पेन्शन योजना, महिला सक्षमीकरण याबाबतीत पुणे महानगपालिकेच्या समाज कल्याण विभागाच्या पूजा अहिराव, समुपदेशक व मनीषा धावरे, समूह संघटिका यांनी सर्व महिलांना मार्गदर्शन केले. व सर्व उपस्थित महिलांच्या अडचणी देखील समजून घेतल्या व त्यावर मार्गही काढून दिले. 
 महिलांना यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.

समाज कल्याण विभाग, वानवडी क्षेत्रीय कार्यालय यांनी दिया फाउंडेशन वर विश्वास दाखवून योजना संबंधी महत्वाची मीटिंग घेतल्याबद्दल आणि मार्गदर्शन केल्याबद्दल महिला भगिनी अम्मी नसिम शेख यांचेआभार  मानले

दिया फाऊंडेशनच्या वतिने समाज कल्याणविभागाच्या विविध योजनांच्या माहिती प्रसंगी उपस्थित महिला* (छाया:संदिप डोके कोंढवा खुर्द)

No comments:

Post a Comment

बारामती लोकसभा निवडणूक 2024 पुरंदर इंदापूर तालुक्यामध्ये मुलगी व सून निवडून आणण्यासाठी केला जातोय का नोटांचा वर्षाव?

 बारामती -: बारामती लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे असू...