Wednesday, July 26, 2023

नगरपालिका पातळीवरील दक्षता समिती ब्रह्मपुरीच्या अध्यक्षपदी प्राचार्य सुयोग बाळबुधे यांची निवड





प्रतिनिधी -: सुभाष नागतोडे 



             सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत वितरण करण्यात येणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंवर देखरेख करण्याकरिता नगरपालिका पातळीवरील दक्षता समिती ब्रह्मपुरीच्या अध्यक्षपदी प्राचार्य सुयोग वामन बाळबुधे यांची निवड झालेली असून सदस्य पदी डॉ.हेमलता अरविंद नंदुरकर,मंजिरी मोहन राजनकर, रश्मी कैलास पेशने, नलिनी बगमारे, अरुण बनकर,अरविंद पंढरीनाथ कुंभारे, दिलीप शेंडे, साकेत भानारकर, रहेमान पठाण, अमित प्रभाकर रोकडे,मनोज राजेश्वर भोपाल इत्यादींची निवड महाराष्ट्र राज्याचे वने, सांस्कृतिक तथा मत्स्य व्यवसाय मंत्री मा.नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी  केलेली असून नवनियुक्त समिती पदाधिकाऱ्यांनी मा. नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार प्रा. अतुलभाऊ देशकर यांचे आभार मानले. 


 नवनयुक्त पदाधिकाऱ्यांचे प्राचार्य अरुण शेंडे तालुकाध्यक्ष भाजपा ब्रह्मपुरी, इंजिनियर अरविंद नंदुरकर शहराध्यक्ष भाजपा ब्रह्मपुरी शहर यांचे सह प्रा. रामलाल दोनाडकर, नामदेव लांजेवार महामंत्री,ज्ञानेश्वर दिवटे महामंत्री,प्रा डॉ. सालोटकर शहराध्यक्ष ओबीसी मोर्चा ब्रह्मपुरी,मनोज वटे नगरसेवक ब्रम्हपूरी,स्वप्नील अलगदेवे भाजयुमो शहर महामंत्री इ.नी अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment

🔴 ब्लॅकमेल व मानसिक छळातून तरुणाची आत्महत्या; खडकवासला येथील तिघांविरुद्ध गुन्हा, आरोपी तरुणीचे वडील API – अटकेबाबत चर्चेला उधाण

बारामती तालुक्यातील मौजे रुई बयाजीनगर येथे घडलेल्या धक्कादायक घटनेत 23 वर्षीय तरुणाने मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची...