संपादक -:नितल शितोळे
नसरापूर :-आपण पाहतोय आता वरून राजाचे आगमन झाले आहे. सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. नदी, ओढे वाहू लागले आहेत. शेतकरी राजा आपल्या काळ्या आई च्या मशागतीच्या कामाला लागला आहे. पण हा काळ म्हणजे साप व अंड्यातून त्याची पिल्ले बाहेर येण्याचा काळ असतो.
त्यामुळे सर्पदंशाचे प्रमाणही या दिवसांत जास्त असते . या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा वन्यप्राणी व सर्परक्षक असोसिएशन ची टीम पुणे जिल्ह्यात व तालुक्यातील विविध शाळा, कॉलेज, महाविद्यालय, अनाथ आश्रम, दुर्गम भागातील वाड्या वस्था अशा गावांत सर्प जनजागृती कार्यशाळा घेण्यात येत आहेत .
पुणे जिल्ह्यातील व तालुक्यातील डोंगराळ तालुक्यात तसेच की वेल्हे, भोर, पुरंदर, मुळशी, व हवेली तालुक्यातील काही भाग तसेच , दुर्गम वाड्या , वस्त्या , धनगरवाडे आदिवासी वाडे, कातकरी वस्थ्या याच्या भोवतली जंगल खूप प्रमाणात आहे. तसेच या ठिकाणी सर्पदंशाचे प्रमाण जास्त असते .
पानशेत , मढेघाट या भागा कडील त्यात पुरेशी माहिती नसल्याने बरेच सर्पदंश झालेले रुग्ण दगावतात व त्या भागात लगेच उपचार सोय लगेच मिळत नसल्याने माणूस दगावत आहे . रात्रदिवस रानात राबणाऱ्या शेतकरी कष्टकऱ्यांसाठी साप व सर्पदंश हे फार गंभीर विषय बनलेले असतात . बऱ्याच ठिकाणी माहिती अभावी व अज्ञानामुळे बिनविषारी साप चावला तरी फक्त भीतीने ती व्यक्ती दगावते जरी विषारी साप चावला तर गावातील मांत्रिक किव्हा साधू बाबा कडे जाऊन आपला जीव गमावत आहेत.
यासाठी महाराष्ट्र, पुणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यान मध्ये व शाळे मध्ये,गावात कार्यशाळेद्वारे जनजागृती सुरू आहे . सर्प जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्यासाठी ग्रामपंचायत , शाळा , विविध संघटना, रोटरी क्लब, कंम्पनी यांनी पुढाकार घ्यावा व वन्यजीवरक्षक किव्हा सर्पमित्रांना संपर्क करावा .
पुणे जिल्हा वन्यप्राणी व सर्परक्षक असोसिएशन ची टीम प्रत्यक्ष येऊन कार्यशाळा घेईल , असे आवाहन पुणे जिल्हा वन्यप्राणी व सर्परक्षक असोसिएशन चे संस्थापक अध्यक्ष सुशील विभुते , उपअध्यक्ष शंकर वाडकर, सर्पमित्र विशाल शिंदे , रघुनाथ वाडकर, विलास धोंगडे, श्रीकांत खेडकर, सनी कडके, विनायक मोहिते, संतोष पाटील, दीपक जाधव यांनी केले आहे . कार्यशाळा घेण्या साठी संपर्क 94232 13283
No comments:
Post a Comment