माळेगाव -: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती तालुक्यातील माळेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत महिलांची सुरक्षा पूर्णतः धोक्यात आली आहे का? गुन्हेगारी प्रवृत्ती आणि अवैध धंद्यांचा सुळसुळाट सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचा मुद्दा बनला आहे का? विशेष म्हणजे, या हद्दीत असे प्रकार घडत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असल्याचे चित्र आहे का?
महिलांवरील अत्याचार आणि असुरक्षितता?
नुकत्याच घडलेल्या घटनेत एका जिम ट्रेनर महिलेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला? तिला लज्जास्पद वागणूक देण्यात आली का? या घटनेने माळेगावसह बारामती तालुक्यात खळबळ उडाली आहे का? महिलांसाठी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या या भागातील वाढते गुन्हेगारी प्रकार चिंतेची बाब बनली आहे का?
अवैध धंद्यांचे साम्राज्य?
दारू, गांजा, मटका, जुगार, तसेच ताडीचे अवैध धंदे माळेगावात खुलेआम चालू आहेत का? हे धंदे पोलिसांच्या अभयामुळे अधिक फोफावत असल्याचा आरोप खरा आहे का? नागरिकांच्या म्हणण्यानुसार, डीबी टीम आणि उपनिरीक्षक देवांचा दास हे हप्ते घेऊन या गुन्हेगारीला खतपाणी घालत आहेत का? या प्रकारांमुळे माळेगाव गुन्हेगारी केंद्र बनले आहे का?
पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर संशय?
नागरिकांच्या मते, माळेगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी अवैध धंद्यांपासून हप्ते घेत आहेत का? त्यामुळे त्यांना अभय मिळत आहे का? नवीन सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी या प्रकारांकडे दुर्लक्ष केले आहे का? की त्यांची देखील भूमिका संशयास्पद आहे?
बारामतीची प्रतिमा डागाळली आहे का?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या बारामती तालुक्यात महिलांवरील हल्ले, गुन्हेगारीचे प्रमाण वाढणे, तसेच खुलेआम अवैध व्यवसाय चालणे, यामुळे बारामतीची प्रतिमा डागाळली आहे का?
नागरिकांची मागणी?
नागरिकांनी या प्रकरणाची तात्काळ सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे का? महिलांच्या सुरक्षेसाठी कडक उपाययोजना राबवणे, तसेच अवैध धंद्यांवर कायमस्वरूपी बंदी घालणे, ही प्रमुख मागणी आहे का?
वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि स्थानिक प्रशासनाने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून त्वरित पावले उचलली नाहीत, तर नागरिकांचा उद्रेक होऊ शकतो का?
No comments:
Post a Comment