Saturday, May 7, 2022

पर्यावरण रक्षणासाठी लोक चळवळ उभारण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन

 






कार्यकारी संपादक- मधुकर बनसोडे 

हवामान बदलाचा प्रभाव कमी करण्यासाठी सक्षम धोरणांच्या बरोबरीने  जनतेने सामूहिक कृती करण्याचे आवाहन उपराष्ट्रपती एम.वेंकय्या नायडू यांनी आज केले. पर्यावरण रक्षणासाठी लोकचळवळ उभारण्याची गरज आहे असे ते म्हणाले.


घटती जैवविविधता आणि वातावरणात वाढत्या प्रमाणातील घडत असलेल्या गंभीर घटना यांचे प्रमाण कमी करण्यासाठी गांभीर्यपूर्ण आत्मपरीक्षण आणि खंबीर कृती करण्याचे आवाहन करत नायडू म्हणाले, “आपला हा ग्रह वाचविणे ही केवळ सरकारची जबाबदारी नाही तर हे प्रत्येक नागरिकाचे आणि पृथ्वीवरील प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे.”


मोहाली येथील चंदीगड विद्यापीठात पर्यावरणीय विविधता आणि पर्यावरणीय न्यायशास्त्र या विषयांवरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करताना उपराष्ट्रपती बोलत होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी हवामानविषयक कृती करण्यात भारत नेहमीच जगात आघाडीवर असतो यावर भर दिला. ग्लासगो येथे नुकत्याच पार पडलेल्या कॉप 26 शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निश्चित केलेली महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय उद्दिष्ट्ये पूर्ण करण्याप्रती भारताच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला.


लहान वयापासूनच विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनशैलीच्या निवडीमुळे निर्माण होणारी कार्बन आणि पर्यावरणीय पदचिन्हे यांची जाणीव करून द्यायला हवी. पालक आणि शिक्षकांनी मुलांना त्यांच्या सभोवतालच्या भौतिक वातावरणासारखीच त्यांच्या नैसर्गिक #environmentची- त्यांच्या अवतीभवती असलेल्या पशु-पक्षी जगताची काळजी घेण्याची शिकवण द्यायला हवी. 


गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरणीय न्यायाची बाजू राखल्याबद्दल भारताच्या सर्वोच्च कायदाव्यवस्थेचे कौतुक करून उपराष्ट्रपती म्हणाले, “निम्न स्तरावरील न्यायालयांनी देखील पर्यावरणकेन्द्री दृष्टीकोन स्वीकारायला हवा आणि त्यांच्या न्यायदानात स्थानिक जनता आणि जैवविविधता यांचे हितरक्षण होईल याची काळजी घ्यावी.” पर्यावरण विषयक कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई आणि ‘प्रदूषण करणाऱ्याने  त्याची किंमत चुकवावायला हवी ’ या तत्वाची कडक अंमलबजावणी केली गेली पाहिजे असे ते म्हणाले.


चंदीगड विद्यापीठात पर्यावरणीय विविधता आणि पर्यावरणीय न्यायतत्वशास्त्र या विषयांवरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे आज उद्घाटन करताना उपराष्ट्रपती एम.वेंकय्या नायडू.









भारताचा हरित ऊर्जा उपक्रम साकार करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालय आणि भारतीय सौरउर्जा महामंडळ मर्यादीत यांच्यादरम्यान सामंजस्य करार

 




मुख्य संपादक - अमित बगाडे 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली, गृह मंत्रालयाने केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ) आणि राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (एनएसजी) यांच्या अखत्यारितील परिसरात सौर ऊर्जा पॅनेल बसवण्याचे ठरवले आहे. त्यानुसार, केंद्रीय गृह सचिव आणि नवीकरणीय उर्जा सचिव यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे गृह मंत्रालय (एमएचए) आणि भारतीय सौरउर्जा महामंडळ मर्यादीत (सीईसीआय) यांच्यात 6 मे रोजी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या सामंजस्य करारानुसार छतावरील सौर पॅनेल, पीव्ही पॉवर प्रकल्पांची दोन्ही मंत्रालये संयुक्तपणे उभारणी करतील.


कार्बन नियंत्रित अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करून अपारंपारीक ऊर्जेला चालना देण्याच्या केन्द्र सरकारच्या प्रयत्नांच्या दिशेने टाकलेले हे एक पाऊल आहे.


उपलब्ध माहीतीच्या आधारे भारतीय सौरउर्जा महामंडळ मर्यादीतने (सीईसीआय) उपलब्ध डेटाच्या आधारे, सीएपीएफ आणि एनएसजीच्या परीसरात एकूण 71.68 मेगावॅट क्षमतेची सौर ऊर्जा निर्माण करण्याच्या क्षमतेचा अंदाज बांधला आहे. सीईसीआय, सौर उर्जा प्रकल्पांच्या क्षेत्रात कौशल्य असलेले, थेट किंवा संस्थाद्वारे किंवा स्पर्धात्मक बोली प्रक्रियेद्वारे निवडलेल्या संस्थेद्वारे, छतावरील सौर पीव्ही ऊर्जा प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी गृहमंत्रालयाला सहकार्य करेल.



Friday, May 6, 2022

भारतात 100 व्या युनिकॉर्नचा उदय


 


मुख्य संपादक - अमित बगाडे

  भारतातील 100 युनिकॉर्नचे एकूण मूल्य 332.7 अब्ज अमेरिकी डॉलर्स

वर्ष 2022 च्या पहिल्या चार महिन्यांत भारतात 14 युनिकॉर्न उद्योगांचा उदय झाला



भारतातील युनिकॉर्न उद्योगांची लाट नव्या उंचीवर पोहोचली असून, 2 मे 2022 रोजी देशात 100 व्या युनिकॉर्नने जन्म घेतला आहे. आज जागतिक पातळीवरील दर 10 युनिकॉर्न उद्योगांपैकी 1 उद्योग भारतात जन्मलेला आहे.


केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी भारताची ही कामगिरी त्यांच्या ट्विटमधून ठळकपणे सर्वांसमोर ठेवली आहे.


भारतातील स्टार्ट अप परिसंस्था म्हणजे युनिकॉर्नच्या संख्येच्या बाबतीत जगात तिसऱ्या क्रमांकावर असणारी परिसंस्था ही 5 मे 2022 रोजी प्राप्त माहितीनुसार एकूण 332.7 अब्ज अमेरिकी डॉलर्स मूल्याच्या 100 युनिकॉर्न उद्योगांची जननी आहे अशी माहिती त्यांनी दिली.


केंद्रीय मंत्री गोयल म्हणाले की, वर्ष 2021 मध्ये भारतातील युनिकॉर्न उद्योगांच्या संख्येत मोठी उसळी दिसून आली. या वर्षभरात एकंदर 93 अब्ज अमेरिकी डॉलर्स मूल्याच्या एकूण 44 स्टार्ट अप उद्योगांनी युनिकॉर्न प्रकारात स्थान मिळविले.


वर्ष 2022 च्या पहिल्या चार महिन्यांत भारतात 18.9 अब्ज मूल्य असलेल्या 14 युनिकॉर्न उद्योगांचा उदय झाला आहे.


भारतातील युनिकॉर्न उद्योगांच्या संख्येने शतकाचा मोठा पल्ला ओलांडलेला असतानाच, देशांतर्गत स्टार्ट अप परिसंस्थेने  स्वावलंबन आणि स्वत्व टिकविण्याच्या दिशेने प्रगती करण्याची मोहीम पूर्वीप्रमाणेच पुढे सुरु ठेवली आहे. आत्मनिर्भर भारताची संकल्पना स्टार्ट अप परिसंस्थेमध्ये खोलवर रुजली असून येत्या काळात ती आपली वाटचाल अशीच पुढे सुरु ठेवेल असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला.

 



बारामती लोकसभा निवडणूक 2024 पुरंदर इंदापूर तालुक्यामध्ये मुलगी व सून निवडून आणण्यासाठी केला जातोय का नोटांचा वर्षाव?

 बारामती -: बारामती लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे असू...