Saturday, May 7, 2022

भारताचा हरित ऊर्जा उपक्रम साकार करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालय आणि भारतीय सौरउर्जा महामंडळ मर्यादीत यांच्यादरम्यान सामंजस्य करार

 




मुख्य संपादक - अमित बगाडे 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली, गृह मंत्रालयाने केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ) आणि राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (एनएसजी) यांच्या अखत्यारितील परिसरात सौर ऊर्जा पॅनेल बसवण्याचे ठरवले आहे. त्यानुसार, केंद्रीय गृह सचिव आणि नवीकरणीय उर्जा सचिव यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे गृह मंत्रालय (एमएचए) आणि भारतीय सौरउर्जा महामंडळ मर्यादीत (सीईसीआय) यांच्यात 6 मे रोजी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या सामंजस्य करारानुसार छतावरील सौर पॅनेल, पीव्ही पॉवर प्रकल्पांची दोन्ही मंत्रालये संयुक्तपणे उभारणी करतील.


कार्बन नियंत्रित अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करून अपारंपारीक ऊर्जेला चालना देण्याच्या केन्द्र सरकारच्या प्रयत्नांच्या दिशेने टाकलेले हे एक पाऊल आहे.


उपलब्ध माहीतीच्या आधारे भारतीय सौरउर्जा महामंडळ मर्यादीतने (सीईसीआय) उपलब्ध डेटाच्या आधारे, सीएपीएफ आणि एनएसजीच्या परीसरात एकूण 71.68 मेगावॅट क्षमतेची सौर ऊर्जा निर्माण करण्याच्या क्षमतेचा अंदाज बांधला आहे. सीईसीआय, सौर उर्जा प्रकल्पांच्या क्षेत्रात कौशल्य असलेले, थेट किंवा संस्थाद्वारे किंवा स्पर्धात्मक बोली प्रक्रियेद्वारे निवडलेल्या संस्थेद्वारे, छतावरील सौर पीव्ही ऊर्जा प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी गृहमंत्रालयाला सहकार्य करेल.



No comments:

Post a Comment

बारामती लोकसभा निवडणूक 2024 पुरंदर इंदापूर तालुक्यामध्ये मुलगी व सून निवडून आणण्यासाठी केला जातोय का नोटांचा वर्षाव?

 बारामती -: बारामती लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे असू...