Sunday, July 23, 2023

नगरपरिषद,नगरपंचायत,नगरपालीका,अ,ब,क,वर्गामध्ये हा भ्रष्टाचार घाेटाळा सण 2007 ते आजतागायत सुरूच -भाउसाहेब कांबळे.





मुख्यसंपादक -: अमित बगाडे 



पुरोगामी महाराष्ट्राला व माणुसकीला काळी मा फासणारा हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार घोटाळा राज्यातील एकूण 387 नगरपरिषद, नगरपंचायत, नगरपालिका अ,ब,क, वर्ग मध्ये हा भ्रष्टाचार घोटाळा सण 2007 ते आजतागायत बिन बोबट पणे चालू आहे

रोजंदारी-कंत्राटी मुजरांकडून सर्व विभागांमध्ये कामे करून घेतली जातात मजूर पुरवठा करणारे व करारानुसार काम करून देणारे हे सर्व ठेकेदार मक्तेदार अपात्र आहेत त्यांच्याकडे मनुष्यबळ पुरविण्याचा तसेच मनुष्यबळाकडून काम करून घेण्याचा संबंधित मा सहाय्यक कामगार आयुक्त साहेब यांचा परवाना, प्रमाणपत्र नाही.


  तरीदेखील या अपात्र ठेकेदार मक्तेदारांच्या नावे दरमहा लाखो रुपयांची बिले काढून हा हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार घोटाळा केलेला आहे हे अपात्र ठेकेदार मक्तेदार रोजंदारी-कंत्राटी मुजरांना अत्यंत अल्प तुटपुंजा पगार देऊन त्यांचे शोषण केलेले आहे व हे शोषण आजही चालू आहे.

 अकुशल कामगार-14500 परंतु हे ठेकेदार गटार नाली साफसफाई करणाऱ्या महिला मजुरांना रोज 230 रुपये प्रमाणे त्यांना 26 दिवसाचा पेमेंट 5980 रुपये देऊन त्यांच्या पगारातून8520 रुपये ठेकेदार व मुख्याधिकारी संबंधित विभाग प्रमुख यांनी हडप केले आहे तसेच पुरुष मजुरांना दरमहा 8000 रुपये पेमेंट देऊन त्यांच्याही पेमेंट मधून 6500 रुपये हडप केलेले आहेत.

 तसेच घंटागाडी ड्रायव्हर, संगणक चालक, वायरमन, यांना 9000 रुपये पेमेंट देऊन त्यांच्या पेमेंट मधून 7500 रुपये हडप केले आहे (16500 कुशल कामगार) तसेच सुपरवायझर अभियंता-अति कुशल कामगार-25000 रुपये यांना बारा ते पंधरा हजार रुपये पेमेंट देऊन त्यांच्या पगारातून दहा हजार ते 13000 पर्यंत रुपये हडप केले आहेत.

 याबाबत भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने मी स्वतः दिनांक 14/7/2023 रोजी मा शासन दरबारी सर्व संबंधितांना पुराव्यासह रजिस्टर पोस्टाने तक्रार पाठविली आहे तसेच सायंकाळी सहा वाजून सहा मिनिटांनी 36 जिल्ह्या च्या मा जिल्हाधिकारी साहेब व मा उपजिल्हाधिकारी साहेब तसेच शासन दरबारी ई-मेल आयडी द्वारे पुराव्यासह ऑनलाइन तक्रार दाखल केली आहे या पत्रासह भाउसाहेब कांबळे यांनी दाखल केलेली तक्रार पीडीएफ फाईल द्वारे आपणास पाठवीत आहे.

 हा सर्व भ्रष्टाचार गेले सोळा वर्षे झाले अदृश्य पणे चालू आहे हा संपूर्ण भ्रष्टाचार हा टारगेट भ्रष्टाचार असून हा भ्रष्टाचार मा प्रधान सचिव साहेब नगर विकास विभाग-2 मंत्रालय मुंबई व मा आयुक्त तथा संचालक साहेब नगरपरिषद प्रशासन संचालनालय बेलापूर नवी मुंबई यांचे हात भ्रष्टाचार घोटाळे केलेल्या मुख्याधिकाऱ्यांच्या डोक्यावर आहेत वास्तविक पाहता अधिकाऱ्यांना दीड दोन लाख रुपयेपगार असूनही गटार नाली साफ करणाऱ्या दलित बहुजन समाजातील माता बहिणीच्या व बांधवांच्या व शेतकऱ्यांच्या मुला मुलींच्या पेमेंट मधून 8500/6500/7500/13 रुपये हडप करणे ही माणुसकीला काळी मा फासणारी बाब आहे बेट बिगारांचे, रोजंदारी-कंत्राटी मजुरांचे पेमेंट हडप करणे व सरकारी पदाचा अधिकाराचा गैरवापर करून कष्टकरी मजुरांचे शोषण करणे हा फौजदारी स्वरूपाचा दखलपात्र गुन्हा आहे तो या भ्रष्ट साखळीने केलेला आहे

288 विधानसभा मतदारसंघात या 387 नगरपरिषदा आहेत परंतु याबाबत आजपर्यंत एकाही माननीय आमदार महोदय साहेबांनी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केलेला नाही म्हणून आजही मजुरांचे शोषण बेधडक चालू आहे संघटनेच्या वतीने मी आपणा सर्वांना विनंती करतो की ही शोषित मजुरांची ची व्यथा व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध करून हा संपूर्ण घोटाळा महाराष्ट्रातील तमाम जनतेसमोर मांडवा ही विनंती
ज्येष्ठ नागरिक तक्रारदार भाऊसाहेब रघुनाथ कांबळे तथा संस्थापक अध्यक्ष भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

बारामती लोकसभा निवडणूक 2024 पुरंदर इंदापूर तालुक्यामध्ये मुलगी व सून निवडून आणण्यासाठी केला जातोय का नोटांचा वर्षाव?

 बारामती -: बारामती लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे असू...