Monday, July 10, 2023

महावितरण कंपनीने चोवीस तासाच्या आत बसवला ट्रांसफार्मर


मुख्यसंपादक -: अमित बगाडे 


वागजवाडी गावच्या सरपंच निकिता आवळे यांच्या पाठपुराव्या मुळे जलद गतीने बसला  ट्रांसफार्मर

 भोर : भोर तालुक्यातील वागजवाडी गावांमधील ट्रांसफार्मर रविवारी सकाळी नऊ वाजता जळाला असल्यामुळे .वागजवाडी. राऊतवाडी. गावाचा वीजपुरवठा खंडित झाला होता.

पण वागजवाडी गावच्या जनतेतून निवड झालेल्या सरपंच निकिता आवाळे यांनी पाठपुरावा करून 24 तासाच्या आत ट्रांसफार्मर बसवून घेतला आहे.


जनतेमधून सरपंच निवडीचा फायद वागजवाडी गावाला झालेला पहायला मिळाला आहे .

भोर तालुक्यातील वागजवाडी . राऊतवाडी . व गाव कुसा बाहेर वसलेल्या वस्तीवरील लोक पाठीवर सकाळ डोकीवर दुपार आणि समोर संध्याकाळ असे काळ चक्र करून जीवन जगताना पाहायला मिळत होते .

मोसमी पाऊस जरी कमी प्रमाणात पडत असला तरी गावामधील नागरिक शेती मध्ये पेरणी करण्यासाठी मग्न झाले होते . त्यात रविवारी अचानक गावाला विध्युत पुरवठा करणारा ट्रान्सफर्मर जळाला असल्याने गावामधील विध्युत पुरावठा खंडित झाला होता.

या मुळे गावाला भर पाऊसात पिण्याच्या पाण्याचा तुटवडा होऊन गाव अंधारात राहणार असा संपूर्ण गावातील जनतेचा ठाम विचार झाला होता .

पण गावच्या नवनिर्वाचित जनतेतून निवडून आलेल्या सरपंच निकिता आवाळे यांनी किकवी एम एस ई बी कार्यालयातील लायन मन कपील येवले वायरमन अमोल पाटणे यांच्या सहकार्यातून एम एस ई बी कार्यालय सासवड येथील कुलकर्णी साहेब भागवत साहेब यांच्या कडे जलद गतीने ट्रान्सफर्मर बसवण्याची मागणी केली.
आणि या मागणीला चोवीस तासाच्या आत एम एस ई बी कंपनीने ट्रान्सफर्मर बसवून गावचा विध्युत पुरवठा पूर्ववत केला.

या मुळे गावातील नागरिक सरपंच निकिता आवाळे यांचे कौतुक करत असून महावितरण कंपनीचे आभार मानले आहे.

No comments:

Post a Comment

बारामती लोकसभा निवडणूक 2024 पुरंदर इंदापूर तालुक्यामध्ये मुलगी व सून निवडून आणण्यासाठी केला जातोय का नोटांचा वर्षाव?

 बारामती -: बारामती लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे असू...