- बारामती लाईव्ह -
संपादक -: नितल शितोळे
गडचिरोली :- तालुक्यातील मौजा पोरला येथे अवैध्य दारू विक्रीला उत आला असून पोलिस प्रशासन जागे व्हा अशी म्हणायची वेळ आली आहे..
मागील काही वर्षांपासून गावात दारू बंद करून गावकऱ्यांनी दारू मुक्त गाव अशी ओळख निर्माण केली होती. परंतु काही आंबट शौकीन दारू विक्री करून गावात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु गावातील सामजिक कार्यकर्ते , नवजवान ,आणि उत्साही मंडळ मिळून गावातील दारू विकणाऱ्या विरुध्द रान उठवून दारू बंद करण्यात आली होती.
परंतु काही दिवस बंद असलेली दारू पुन्हा एकदा जोरात सुरु झाली आहे त्यामुळे गावातील शांतता भंग होण्याच्या मार्गावर आहे असा प्रश्न पडला आहे , त्यामुळे या दारू विक्री विरोधात पोलिस प्रशासन जागे व्हा अशी म्हणायची वेळ आली आहे.
पोरला येथील सुरू झालेली दारू विक्री बंद करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र सेलोटे , गावातील प्रतिष्ठित नागरिक यांनी पोलीस प्रशासनाला केली आहे.
No comments:
Post a Comment