संपादक -: नितल शितोळे
प्रशासनाचे दुर्लक्ष , ग्रामपंचायत सदस्य आहे रेती तस्कर..
गडचिरोली :- गडचिरोली जिल्ह्यातील एट्टापल्ली तालुक्यातील जारावंडी साजा अंतर्गत अवैध्य रेतीची तस्करी गेली अनेक दिवसापासून सुरु असून ग्रामपंचायत कार्यालय चे सदस्य हेच रेती उत्खनन करून शासनाची परवानगी न घेता , अवैध्य रेतीची उत्खनन , वाहतूक करून शासनाची दिशाभूल केली आहे असा आरोप योगेश कुमरे यांनी जिल्हाधिकारी , उपविभागीय अधिकारी,यांना निवेदन देऊन हे आरोप केला आहे.
सदर ग्रामपंचायत कार्यालय जारावंडी येथील ग्रामपंचायतीचे सदस्य असलेले दिलीप जीवन दास हे गेली अनेक दिवसापासून जारावंडी साजा अंतर्गत येत असलेल्या सारखेडा - भापळा येथील बांडिया नदिमधून रेतीची अवैध्य वाहतूक करून शासनाची दिशाभूल करत होते. त्यामुळे सदर तक्रारकर्ते यांनी मोका चौकशी करून या विषयाची माहिती महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले त्याप्रमाणे त्यांच्यावर थातुर - मातुर कारवाही करून प्रकरण बंद करण्यात आला .
याचाच फायदा घेत ग्राम. पंचायत सदस्य दिलीप जीवन दास यांनी पुन्हा एकदा रेती उत्खनन करून तस्करी सुरु केली त्यामुळे तक्रार दार योगेश कुमरे यांनी दिनांक ६/७/२०२३ ला बांडिया नदीवर जाऊन चौकशी केली असता त्यामध्ये गाडी मध्ये रेती उत्खनन करून भरताना रंगेहाथ पकडले.
सदर प्रकरण गडचिरोली जिल्ह्यातील एट्टापल्ली तालुक्यातील जारावंडी येथील असून रेतीची वाहतूक करून शासनाची परवानगी न घेता , शासनाचा महसूल बुळवणाऱ्या , अवैध्य रेतीची वाहतूक करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्य दिलीप जीवन दास यांच्यावर योग्य कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी योगेश बाजीराव कुमरे यांनी जिल्हाधिकारी संजय मीना यांच्या कडे करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment