Monday, July 10, 2023

पालखी मार्गावरील रोटी घाट येथे विठलं रूकमाई आणि न्यानोबा तुकोबांचे भव्य दिव्य शिल्प उभारावे, -: मोरे महाराज.




संपादक -: नितल शितोळे 


दौंड --- जगदगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा मार्गावर एकमेव रोटी घाट असून या  ठिकाणी विठलं रूकमाई आणि न्यानोबा - तुकोबा यांचे भव्य दिव्य शिल्प उभारावे . अशी मागणी संत तुकाराम पालखी सोहळा प्रमुख आणि देहू संस्थानचे विस्वस्त भानुदास  महाराज मोरे यांनी पत्रकार यांचेशी बोलतांना केली आहे.

एकादशी पंढरपूर येथील कार्यक्रम उरकून पालखी सोहळा 3 जुलै रोजी देहूकडे परतीच्या प्रवासात निघाला आहे,

हिंगणी गाडा येथे पालखी सोहळा मुक्कामी आला असता पत्रकारांशी मोरे महाराज बोलत होते,
मोरे महाराज पुढे म्हणाले, शासनाने पालखी सोहळा मार्ग चार पदरी प्रशस्त व चांगले बांधले  असून
यामुळे पालखी सोहळ्याचे प्रवास सुखकर होत आहे,

परन्तु रस्ते  बनविताना  या प्रशस्त रस्त्याचे दोन्ही कडेने झाडी लावण्याचे राहूनगेले आहे .यावर्षी पालखी सोहळा वाटचाल करताना प्रचंड उष्णता असल्याने वारकरी  बांधवांना थांबण्यासाठी व सावली साठी रस्त्याच्या कडेला झाडे नसल्याने वारकरी बांधवांचे खूपच हाल झाले आहेत,

शासनाने पालखी मार्गाच्या  दुतर्फा झाडे त्वरित लावावीत, त्याचे चांगले संगोपन करावे, आणि झाडे  वाढववीत,यासह या मार्गावर एकमेव रोटी घाट  आहे,
या ठिकाणी विठलं रूकमाई , आणि न्यानोबा  तुकोबा यांची शिल्प उभारावीत, या शिल्पा भोवतीचा परिसर प्रशस्त व सूंदर बनवावा , येथे वारकऱ्यांन बसण्यासाठी बाक व कट्टे यांची सोय करावी, अशी मागणीही मोरे महाराज यांनी केली आहे,

सदर मागण्याचे लेखी निवेदन शासनाकडे पाठवले असून पुढील पालखी सोहळ्याचे पूर्वी शासनरोटी  घाटात शिल्प उभा रून सोई सुविधा करतील , असा विश्वास मोरे महाराज यांनी व्यक्त केला आहे,

नवीन मार्गावर झाडे का लावली नाहीत?  शासनाने कोट्यवधी रुपये खर्चून पालखी मार्ग  चारपदरी व चांगल्या प्रकारे बांधले आहेत, या मार्गाने कामसुरु करताना या मार्गा कडेला असणारी झाडी तोडण्यात आली. परन्तु मार्ग बनवून आज किमान 10 ते 15 वर्षे झालीत,

यामार्गावर झाडे लावलीच गेली नाहीत मग या रस्याच्या आराखड्यात नवीन झाडे लावण्याचे प्रयोजन  नव्हते काय? असा सवाल या  मार्गावरून दैनं दिन प्रवास करणारे लोक गेल्या अनेक वर्षा पासून उपस्थित करीत आहेत, शासनाने याची त्वरित दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे

No comments:

Post a Comment

बारामती लोकसभा निवडणूक 2024 पुरंदर इंदापूर तालुक्यामध्ये मुलगी व सून निवडून आणण्यासाठी केला जातोय का नोटांचा वर्षाव?

 बारामती -: बारामती लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे असू...