मुख्यसंपादक -: अमित बगाडे
दौंड - यवत ता दौंड येथील, ग्रामस्थांनी पूर्वकालीन परंपरा जपण्याचा प्रयत्न केला, आखाड सप्ताहात पहिल्या रविवारी वन भोजनाचा पारंपारिक कार्यक्रम करण्यात आला होता,
या निमित्ताने गावातील सर्व ग्रामस्थ कुटुंबासह वन भोजनासाठी गावाबाहेर नैसर्गिक स्थळी जाऊन वन भोजन करण्याची परंपरा आज ही कायम आहे, रविवार ९जुलै रोजी वन भोजन कार्यक्रम करण्यात आला होता,
या निमित्ताने यवत गावातील ग्रामस्थांच्या उपस्थितीत ग्रामदैवत लक्ष्मी आई देवीचा पोतराज गोंधळी यांच्या पारंपरिक वाद्यांच्या गजरात ग्रामदैवत लक्ष्मी आई देवीचा छबिना गाव प्रदक्षिणा करत देव पुजा आरती करुन, मोठ्या उत्साहात काढण्यात आला,
वन भोजनाच्या निमित्ताने संपूर्ण गावातील ग्रामस्थ कुटुंबासह घराला कुलूप लावून, सकाळीच घराबाहेर जाऊन दुपारचे भोजन नैसर्गिक स्थळी घेण्याचा आनंद व्यक्त केला, तसेच गावातील सर्व व्यापारी वर्ग वन भोजनाच्या निमित्ताने उद्योग व्यवसाय दुकानदारी बंद करून पूर्वकालीन परंपरा जपण्याचा प्रयत्न केला,
वन भोजनाच्या दिवशी गावातील बाजार पेठ व येशी मध्ये कोणतेही वाहन सायकल टु व्हीलर फोर व्हीलर फीरु नये याची दक्षता घेण्यात आली होती, यवत गावात पुर्वी मरीआईचा गाडा गावातुन फिरविण्याची परंपरा होती,असे बोलले जात आहे,
त्यामुळे गावातील रोग राई दुर करण्यासाठी व विविध आजार व असलेल्या लोक कल्याणकारी सत्कर्म जोपासण्याचे अतिशय महत्त्वाची भूमिका घेऊन परंपरा कायम रुजविण्याचा पाईडा यवत गावातील नागरिक जपत आहे प्रसंगी श्री काळभैरवनाथ देवस्थान कमिटीचे अध्यक्ष मा सतीश दोरगे, यवत ग्रामपंचायतीचे मा उपसरपंच व विद्यमान सदस्य सदानंद दोरगे, कमिटीचे सदस्य कैलास आबा दोरगे, दत्तात्रय दोरगे, वि का सो मा चेअरमन आण्णा दोरगे, श्रीपतीराव दोरगे, कोंडीबा दोरगे, काळुराम शेंडगे, सागर शेंडगे, आदी मान्यवर उपस्थित होते,
No comments:
Post a Comment