Monday, July 17, 2023

पदाचा दिलेला राजिनामा नामंजूर करण्यात येत आहे!

मुख्यसंपादक -: अमित बगाडे 



  बारामती -: रोहित जी बनकर यांनीं प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजिनामा ओबीसी विभाग प्रदेश कार्यालयाकडे पाठवला होता परंतू सदर राजिनामा बाबत ओबीसी विभाग प्रदेश अध्यक्ष श्री.भानुदासजी माळी साहेब यांनी प्रांताध्यक्ष आ. श्री.नानाभाऊ पटोले यांच्याशी चर्चा केली.आपण बारामती सारख्या शहरात उत्तम प्रकारे काँग्रेस पक्षाचे काम करीत आहात.

त्या कामाची दखल घेऊन प्रांताध्यक्ष आ.श्री.नानाभाऊ पटोले यांनी राजिनामा नामंजूर करण्यात यावा असे आदेश श्री.भानुदासजी माळी साहेब यांना दिले.

नानाभाऊ पटोले यांनी दिलेल्या आदेशाची श्री.भानुदासजी माळी साहेब यांनी अंमलबजावणी केली असून आपला राजिनामा नामंजूर करण्यात येत आहे याची नोंद घेऊन आपण पुन्हा एकदा ओबीसींना न्याय देण्यासाठी व काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करण्याकरिता पुन्हा एकदा जोमाने काम कराल हीच अपेक्षा !

*श्री.धैर्यशील सुपले - प्रदेश सरचिटणीस*
*महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग*

*श्री.शैलेश राऊत - प्रदेश प्रसिध्दी प्रमुख*
*महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग*

No comments:

Post a Comment

*नगरपालिका निवडणूक : पक्ष हरला, व्यक्ती जिंकली?*

 * बारामतीत पवारांच्या सत्तेला पहिली ठेच लागली का?*   * प्रतिनिधी-: भीमराव कांबळे*  बारामती -: लोकजागृती भूमी दि-:२५डिसेंबर २५-:...