संपादक -: नितल शितोळे
दौंड - हवेली दौंड आणि पुढे इंदापूर ला जाणारा मुळा मुठा उजवा कालवा गेला एक महिना पूर्णपणे बंद असल्याने या कालव्यावर आधारित पिण्याच्या पाणी योजना अडचणीत आल्या आहेत,
किमान पिण्याच्या पाण्यासाठी तरी मुळा मुठा उजव्या कालव्यास पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी गावो गावचे नागरिक करू लागले आहे,
दरवषी 7 जूनला सुरू होणार पावसाळा लांबला आहे, आज 15 जून जवळजवळ सव्वा महिना पाऊस अजिबातच झाला नाही ,त्यातच मुळा मुठा कालवा 15 जूनला बंद करण्यात आला आहे, अद्याप पाऊस न झाल्याने आणि कालवा बंद असल्याने या कालव्यावर अवलंबून असणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या योजना या बंदपडण्याच्या मार्गावर आल्या आहेत ,यामुळे लोकांना पाणी प्रश्न भेडसावू लागला आहे,
मुळा मुठा नव्या कालव्यावर लोणी काळभोर, उरुळी कांचन , यवत , केडगाव पाट्स आणि दौंड या मोठया गावा सह अनेक लहान लहान गावाच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना अवलंबून आहेत,
कला कालवा बंद झाल्यास आठ पंधरा दिवस पिण्याच्या पाण्याच्या योजना चालतात, नंतर कालव्या लगत असणाऱ्या योजनांच्या विहिरी तळ गाठू लागतात,तर काही पूर्णपणे आटतात, सध्या पूर्णपणे एक महिना पाऊसही नाही आणि कालवा महिनाभरबंद यामुळे पाणी टंचाईचे भीषण संकट पुढे आले आहे,
संबधीत खाते आणि शासनाने याबाबत दखल घेऊन जनतेच्याया पिण्याच्या पाण्यासाठी तरी मुळा मुठा कालव्यास अंशतः तरी पाणी सोडावे, अशी मागणी कालवा लगत पाणी योजनांचे ग्रामस्थ, कार्यकर्ते आणि सरपंच मंडळी करू लागली आहेत,
No comments:
Post a Comment