Friday, November 7, 2025
गोसेवेच्या माध्यमातून वाढदिवस साजरा – वाशिम जिल्ह्यात राष्ट्रीय महाकाल सेनेचा आदर्श उपक्रम
Wednesday, November 5, 2025
बारामती नगरपालिका निवडणूक रंगात — प्रभाग क्रमांक १० मध्ये “सचिन जगदाळे” चर्चेच्या शिखरावर!
Saturday, November 1, 2025
रिल्ससाठी जाळ-धूर काढणाऱ्या चार बुलेट पोलिसांच्या ताब्यात - बारामती तालुका पोलिसांची कडक कारवाई
“एक्झिट पोलचा सरप्राईज पॅकेज — पोलिसाचा मुलगा सचिन जगदाळे जनतेच्या पसंतीस उतरला”
Tuesday, October 28, 2025
श्रीरंग एकनाथ चव्हाण यांची पुणे ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रभारी अध्यक्षपदी नियुक्ती
पुणे, दि. 29 ऑक्टोबर 2025 :महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने जाहीर केलेल्या आदेशानुसार श्री श्रीरंग एकनाथ चव्हाण (ता. हवेली, जि. पुणे) यांची पुणे ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रभारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती मा. प्रदेशाध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार करण्यात आली असून, यासंदर्भातील अधिकृत पत्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष अॅड. गणेश पाटील यांनी जारी केले आहे.
पक्षाच्या ग्रामीण संघटन बळकटीकरणाच्या उद्देशाने करण्यात आलेली ही नियुक्ती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. नव्या जबाबदारीनंतर श्रीरंग चव्हाण यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या अपेक्षा पूर्ण करत संघटन अधिक सशक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
याप्रसंगी वरिष्ठ नेत्यांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
पक्षाच्या स्थानिक व जिल्हास्तरीय कार्यकर्त्यांमध्ये या निर्णयाचे स्वागत करण्यात आले असून, चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पुणे ग्रामीण काँग्रेसला नवे बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Saturday, October 25, 2025
चैतन्य हॉस्पिटलमध्ये वाढदिवस साजरा करत मानवतेचा उत्सव — डॉ. शशांक जळक, पत्रकार तैनुरभाई शेख आणि विपुल आण्णा ढवाण पाटील यांच्या वतीने कपडे व साड्यांचे वाटप
बारामती (प्रतिनिधी) — विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाच्या वतीने डॉ. शशांक जळक सर, पत्रकार तैनुरभाई शेख आणि विपुल आण्णा ढवाण पाटील यांचा वाढदिवस चैतन्य हॉस्पिटलमध्ये मोठ्या उत्साहात व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला.
या प्रसंगी हॉस्पिटलमधील महिला कर्मचाऱ्यांना साड्या, पुरुष कर्मचाऱ्यांना कपडे आणि मुलींना नवीन ड्रेसचे वाटप करण्यात आले. त्यानंतर वाढदिवसाचा केक कापून उपस्थित पाहुण्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यात आल्या.
कार्यक्रमाचे शुभहस्ते उद्घाटन बारामतीचे हृदय सम्राट ऍड. भार्गवदादा पाटसरक आणि विष्णुपंत चव्हाण मित्र परिवाराचे अध्यक्ष स्वप्निल विष्णुपंत चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नरेंद्र भाऊ मिसाळ यांनी भूषविले, तर प्रमुख उपस्थिती म्हणून भावी नगरसेवक विठ्ठल शेठ आगवणे, श्रीमंत पवन राजे बनसोडे, गरुड कमांडो नेताजी बुरुंगले पाटील (फौजी), सोमनाथ भाऊ रणदिवे, अजयभैय्या कदम व विष्णुपंत चव्हाण उपस्थित होते.
वाढदिवसाच्या निमित्ताने डॉ. जळक, तैनुरभाई शेख व विपुल आण्णा यांनी आपल्या मनोगतात म्हटलं की —
“वाढदिवस हा केवळ साजरा करण्याचा नव्हे, तर समाजाशी जोडण्याचा आणि माणुसकी पेरण्याचा दिवस आहे. विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळ समाजासाठी जे काम करत आहे, ते प्रेरणादायी आहे.”
या प्रसंगी भार्गव दादा पाटसरक, स्वप्निल विष्णुपंत चव्हाण, आणि उपस्थित मान्यवरांनीही मंडळाच्या कार्याचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मंडळातील सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
मुंबई च्या ड्रग्स प्रकरणातील आरोपी बारामती तालुका पोलिसांकडून अटक..'_५० लाखांच्या एम.डी. ड्रग्स प्रकरणातील फरार आरोपीला बारामती पोलिसांकडून बेड्या_
🔴 ब्लॅकमेल व मानसिक छळातून तरुणाची आत्महत्या; खडकवासला येथील तिघांविरुद्ध गुन्हा, आरोपी तरुणीचे वडील API – अटकेबाबत चर्चेला उधाण
बारामती तालुक्यातील मौजे रुई बयाजीनगर येथे घडलेल्या धक्कादायक घटनेत 23 वर्षीय तरुणाने मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची...
-
बारामती -: प्रभाग क्रमांक दहा : एक्झिट पोलनंतर राजकीय वर्तुळात खळबळ बारामती शहरातील प्रभाग क्रमांक १० मध्ये घेतलेल्या पहिल्याच ए...
-
प्रतिनिधी-: भीमराव कांबळे बारामती — नगरपरिषद निवडणुकीत वातावरण तापले असले तरी प्रभाग 8 आणि 10 मधील आश्चर्यकारक शांतता ही एका नाव...
-
बारामती तालुक्यातील मौजे रुई बयाजीनगर येथे घडलेल्या धक्कादायक घटनेत 23 वर्षीय तरुणाने मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची...