मुख्यसंपादक -: अमित बगाडे
मा.किरणदादा गुजर साहेब यांच्या हस्ते व मा.गणेश इंगळे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी आणि मा.दिनेश तायडे पोलीस निरीक्षक बारामती शहर यांच्या प्रमुख उपस्तिथीत पार पडले.
बारामती : दिनांक २१ जुलै २०२३
सन २०२२ मध्ये आदरणीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोहेल शेख आणि शाहीन सोहेल शेख यांनी बारामती मध्ये गिरीराज हॉस्पिटल येथे एक मा.किरणदादा गुजर साहेब आणि आमदार मा.अमोल जी मिटकरी साहेब यांच्या हस्ते ५०० श्रावणयंत्रणा व ईसीजी मशीन वाटप केले होते.
ह्या यशस्वी उपक्रमाला पुढच्या पातळीवर घेऊन आज बारामती मध्ये नटराज नाट्य कला मंदिर येथे मा.ना.अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती मध्ये पहिल्यांदाच लहान मुलांचे / बाळांचे तपासणी व उपचार शिबीर मा.किरणदादा गुजर साहेब यांच्या शुभहस्ते व मा.गणेश इंगळे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी आणि मा.दिनेश तायडे पोलीस निरीक्षक बारामती शहर, मा.धनंजय जामदार चेअरमन एमआयडीसी, मा.तैनुरभाई शेख - पत्रकार, मा.शहानूर भाई शेख वकील साहेब, मा.कामरुद्दीनभाई सय्यद - जेष्ठ समाजकर्ते, मा.असलम सय्यद उद्योजक माळेगाव,मा.इफतहेखार शेख (नटराज चिकन), मा.सलीमभाई दस्तगीर बागवान उद्योजक,मा.रोझम बागवान, मा.अली बागवान, मा.मुस्तकीम बागवान यांच्या उपस्तिथीत पार पडले.
मा.किरणदादा गुजर साहेब आणि मा.गणेश इंगळे साहेब यांनी मुलांना आणि इतर उपस्थित सर्वांना मार्गदर्शन दिले.
ह्या उपक्रमामध्ये बारामती मधील नामांकित चिरायु हॉस्पिटल - साई इंपिरियल, मार्केट यार्ड रोड,बारामती चे बाळ रोग तज्ञ् डॉ.अनुप धोभाडा, डॉ.अमित कोकरे, डॉ. धनंजय धायगुडे, डॉ.शैलेश दोषी, डॉ. गणेश श्रीरामे, डॉ. तात्यासाहेब कोकरे, डॉ.संकेत नाळे व त्यांचे सर्व सहकारी (स्टाफ)यांनी उपक्रमाचा लाभ घेण्याकरिता आलेल्या सर्व लहान मुलांचे / बाळांचे उपचार व तपासणी केले.
चिरायु हॉस्पिटल हे एक मल्टीस्पेसिऍलिस्ट हॉस्पिटल असून येथे लहान मुलांसाठी अतिदक्षता विभाग आणि हृदयाचा आजारावरील विभाग २४ तास सुरु असते. उपक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात बारामती नगर परिषद शाळा क्रमांक १ ते ८ व इतर नागरिकांनी लाभ घेतला.
उपक्रमामध्ये १२८१ लहान बाळांची / मुलांची तपासणी करण्यात आली व इतर २२ सेन्सेटिव्ह केसेस च्या मुलांना देखील पुढील मोफत उपचारासाठी बोलावले गेले आहे.
बाकी उपक्रमामध्ये आलेले काही मुले व त्यांच्या पालकांना ज्यांना अडचणीमुळे थांबता आले नाही असे ४१४ लोकांना देखील त्यांच्या लहान मुलांसाठी / बाळांसाठी मोफत तपासणीचे (मोफत ओपीडी चे ) कुपन दिले गेले आहे व कधी अडचणीच्या काळात जर लहान मुले ऍडमिट झाली तर त्यांना देखील बीला मध्ये सवलतीचे कुपन देण्यात आले.
मागच्या वर्षा सारखा हा उपक्रम देखील मोठ्याप्रमाणात यशस्विरित्याने पार पडला व मोठ्याप्रमाणात शिक्षकांकडून व पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. शाहीन सोहेल शेख आणि सोहेल शेख म्हणाले - " भविष्यात देखील आदरणीय किरणदादा गुजर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली असेच उपक्रम लोकांच्या हितासाठी घेत राहणार व बारामती मधील नागरिकांना असेच आरोग्यच्या दृष्टीने लाभ द्याचा प्रयत्न करत राहू आणि आजच्या ह्या उपक्रमाला यशस्वी बनवण्याकरिता आमच्या विनंती ला मान दिल्याबद्दल चिरायु हॉस्पिटल चे सर्व डॉक्टर्स आणि त्यांच्या स्टाफ चे आभार.
No comments:
Post a Comment