Friday, November 14, 2025

बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीत रंगत; उमेदवारीवर ‘पवार विरुद्ध पवार’ गटातील अनिश्चितता – निष्ठावंत कार्यकर्त्यांचे भविष्य काय?


मुख्य प्रश्न – बारामतीकरांच्या मनातले:

निष्ठावंतांवर अन्याय की नवे नेतृत्व? स्वतःचा विकास की नागरिकांचा? गुन्हेगारी छायेतले चेहरे की स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार?

बारामती -: बारामती नगरपालिकेची निवडणूक दिवसेंदिवस रंगत वाढत चालली आहे. शहरात उमेदवारी अर्ज भरण्याची लगबग सुरू झाली असताना, शरद पवार गटाकडून अद्याप अधिकृत उमेदवार जाहीर न झाल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून पक्षासाठी पायताण उचलत, निष्ठेच्या बॅनरखाली काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना एकच प्रश्न छळतो आहे — “आम्हाला नेमकी संधी केव्हा मिळणार?”

🔹 निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होणार का?

बारामतीत चर्चा अशी आहे की, अनेक वर्षे पक्षाला वाहिलेले निष्ठावंत कार्यकर्ते पुन्हा एकदा केवळ "चादर उचलण्याचे" कामच करणार का? निर्णय प्रक्रियेत त्यांना संधी मिळेल का नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

🔹 स्वत:चा विकास की नागरिकांचा?

बारामतीकरांमध्ये असा प्रश्नही डोके वर काढत आहे की, "नेते स्वतःचा विकास पाहतात की सामान्य नागरिकांचा?"

🔹 अजित पवार गट नवीन चेहऱ्याला संधी देणार का?

दुसरीकडे, अजित पवार गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी नवीन चेहरा दिला जाणार का? की गेल्या काळात वादग्रस्त निर्णय, नागरिकांवरील अन्याय, अतिक्रमण, बँकिंग अनियमितता, हायवा-डंपर प्रकरणांवरील चर्चा, या सर्व छायेत राहिलेले जुने चेहरेच पुढे आणले जाणार — हा मोठा प्रश्न आहे.

🔹 वादग्रस्त आरोपांवर जनतेचे प्रश्न

शहरात जनतेमध्ये खालील प्रश्न मोठ्या प्रमाणावर चर्चिले जात आहेत —

गुन्हेगारी छायेत राहिलेल्या नावांना पुन्हा संधी दिली जाणार का?

नागरिकांना त्रास देणाऱ्या वाहनधारकांना संरक्षण देणाऱ्यांना पुन्हा पद देणार का?

अतिक्रमण करून व्यावसायिक स्थळे उभारणाऱ्यांना नगराध्यक्ष पद मिळणार का?

बँक व्यवहारांमधील घोटाळ्यांवरून चर्चेत आलेल्या काही व्यक्तींना पुन्हा निवडणुकीत पुढे केले जाणार का?

गोरगरीब पतविक्रेत्यांवर कारवाई करून त्यांना उपासमारीला लावणाऱ्यांना पक्ष पुन्हा पाठबळ देणार का?

हे प्रश्न सध्या बारामतीकरांच्या चर्चेचा मुख्य विषय बनले आहेत.

🔹 शेवटचा आणि सर्वात मोठा प्रश्न

“बारामतीला नेमके कसे नेतृत्व हवे आहे — विकासाभिमुख की वादग्रस्त?”

शरद पवार गट निष्ठावंतांना संधी देणार का?

अजित पवार गट नवीन चेहरा आणणार की जुन्यांनाच संधी?

नगरपालिकेला स्वच्छ प्रतिमेचे नेतृत्व हवे की वादग्रस्त अनुभव असलेले?

स्वत:चा विकास करणाऱ्यांवर जनता खुश आहे का?

नागरिकांची सुरक्षा आणि विकास हे खरोखर प्राधान्य आहे का?

हायवा-डंपर प्रकरणातील नावांवर निर्णय प्रक्रिया होणार का?

अतिक्रमण करणाऱ्यांना नगराध्यक्ष पद देणे योग्य का?

बँक घोटाळा चर्चेत असलेल्या व्यक्तींची निवडणूक पात्रता काय?

गरीब पतविक्रेत्यांची समस्या हाताळणारा नेता कोण?

बारामतीला खरे नेतृत्व कोण देणार?


Wednesday, November 12, 2025

जेलमधून सुटताच सांगवीत पुन्हा सक्रिय झाला गांजा विक्रेता — पोलीस पुन्हा कारवाई करतील का?


बारामती तालुक्यातील सांगवी परिसरात पुन्हा एकदा गांजाविक्रीचे सावट निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी गांजा विक्रीप्रकरणी अटक होऊन जेलमध्ये गेलेला आरोपी सुटताच पुन्हा सक्रिय झाल्याची माहिती समोर आली आहे.

यामुळे नागरिकांमध्ये प्रश्न निर्माण झाला आहे की —
“गुन्हेगार जेलमधून सुटताच पुन्हा बेकायदेशीर धंद्यात कसा उतरतो?”
“पोलीस यावर नियंत्रण आणणार का?”

स्थानिक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीने अलीकडच्या काळात गुपचूपपणे गांजा विक्रीचे व्यवहार सुरू केले आहेत. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे व नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या काही महिन्यांपूर्वी याच व्यक्तीविरुद्ध बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन अटक करण्यात आली होती. मात्र, न्यायालयातून सुटल्यानंतर त्याने पुन्हा अवैध धंद्याचा मार्ग पकडल्याचे बोलले जात आहे.

यामुळे गावकऱ्यांकडून प्रश्न उपस्थित केला जातोय की,
“अशा गुन्हेगारांवर देखरेख का ठेवली जात नाही?”
“पोलीस प्रशासन यावेळी ठोस कारवाई करेल का?”

दरम्यान, स्थानिक पोलिसांकडून या प्रकरणी प्राथमिक तपास सुरू असल्याचे समजते. लवकरच पुन्हा कठोर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Saturday, November 8, 2025

काळखैरेवाडी ग्रामपंचायतीचे ४.५ वर्षांचे अभिलेख ‘गायब’! फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी..


बारामती: ता.८–संविधानाच्या ७३व्या घटनादुरुस्तीमुळे ग्रामसभा आणि मासिक सभा या ग्रामविकासाच्या प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाच्या कड्या ठरतात.गावचा विकास आराखडा,सभांचे निर्णय,तसेच आर्थिक हिशेब यांसारखी सर्व संवेदनशील व अधिकृत माहिती ग्रामपंचायतीच्या प्रोसिडिंग नोंदवहीत नोंदली जाते.

मात्र मौजे काळखैरेवाडी (ता. बारामती) येथील ग्रामपंचायत कार्यालयातून १ एप्रिल २०२० ते ३० सप्टेंबर २०२४ या कालावधीतल्या ग्रामसभा व मासिक सभांच्या नोंदवह्या अभिलेखातून पूर्णपणे गायब असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.ही माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते युवराज पोटे यांच्या अर्जावरून उघड झाली.

शासनाच्या परिपत्रकानुसार ग्रामपंचायतीचे दप्तर हस्तांतरण पार न पाडता नवीन ठिकाणी रुजू होणाऱ्या व जिल्हा परिषद सेवेतून सेवानिवृत्त होणाऱ्या ग्रामपंचायत अधिकारी यांच्याविरुद्ध अशा कसुरी बाबत नियुक्ती प्राधिकारी म्हणून प्रादत्त अधिकारात मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दक्षतापूर्वक कार्यवाही करणे अपेक्षित आहे.
गटविकास अधिकारी यांनी देखील ग्रामपंचायतचे दप्तर हस्तांतरण कार्यपद्धती अवलंबने क्रमप्राप्त आहे. याकडे विस्तार अधिकारी (पंचायत) व गटविकास अधिकारी पंचायत समिती बारामती यांनी देखील दुर्लक्ष करत कर्तव्यात कसुरी केल्याचा आरोप युवराज पोटे यांनी केला आहे.

राज्य माहिती आयोग देखील अभिलेख गहाळ प्रकरणाकडे गंभीरतेने पाहतो.त्यामुळे अनेक प्रकरणात  जबाबदारी निश्चित करून कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत आदेश देखील देण्यात आलेले आहेत.
काळखैरेवाडीतील ग्रामपंचायतीत अभिलेख गहाळ होण्यामागील गुन्हेगारी हेतू नेमका कोणाचा आणि किती मोठा आहे याची उत्तरे तपासानंतरच मिळणार आहेत. पण गावच्या विकास आराखड्याशी संबंधित महत्त्वाच्या दस्तऐवजांचा असा लुप्त होणे हा गंभीर प्रशासकीय घोटाळा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

"शासकीय लोकसेवकांच्या ताब्यातील अभिलेख गहाळ होणे हा दखलपात्र गुन्हा आहे महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख व्यवस्थापन अधिनियम २००५ नुसार संबंधित आरोपी अधिकाऱ्यावर तातडीने फौजदारी गुन्हा दाखल व्हावा तसेच मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराची ही शक्यता वाटत आहे म्हणून संपूर्ण दप्तराची सखोल चौकशी झाली पाहिजे" युवराज पोटे माहिती अधिकार कार्यकर्ता तथा प्रशिक्षक.

Friday, November 7, 2025

गोसेवेच्या माध्यमातून वाढदिवस साजरा – वाशिम जिल्ह्यात राष्ट्रीय महाकाल सेनेचा आदर्श उपक्रम


वाशिम :राष्ट्रीय महाकाल सेनेच्या वाशिम जिल्ह्याच्या वतीने जिल्हा अध्यक्ष मा. केदार जोशी यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली एक सामाजिक व धार्मिक उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमाअंतर्गत राष्ट्रीय महाकाल सेनेचे संस्थापक परम पूज्य श्री श्री 1008 दिगंबर कुशाल भारती जी बापू तसेच राष्ट्रीय महाकाल सेनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष गुरुवर्य प्रकाश भाऊ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने वाशिम येथील गोशाळेमध्ये जाऊन गोमातेला चारा वाटप कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने पार पडला.

या पवित्र प्रसंगी गोलू भोंडणे, अभी अवचार, तन्मय मते, काना खत्री, प्रथमेश भगत, ऋतुराज खडसे यांसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व श्रद्धावान उपस्थित होते.

गोसेवा हा भारतीय संस्कृतीचा आत्मा असल्याचे प्रतिपादन करत उपस्थित मान्यवरांनी बापूंच्या व शिंदे गुरुवर्यांच्या वाढदिवसानिमित्त अशा सामाजिक उपक्रमांद्वारे समाजसेवेचा संदेश देण्याचे आवाहन केले.

या उपक्रमाचे आयोजन व यशस्वी नियोजन राष्ट्रीय महाकाल सेना वाशिम जिल्हा टीमने केले.

Wednesday, November 5, 2025

बारामती नगरपालिका निवडणूक रंगात — प्रभाग क्रमांक १० मध्ये “सचिन जगदाळे” चर्चेच्या शिखरावर!


बारामती | बारामती ही राजकारणाची पंढरी अशी ओळखले जाते आणि हे राजकारणात सध्या निवडणुकीच्या रणधुमाळीला जोर आला असून, कालच निवडणूक आयोगाने नगरपालिका, महानगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. यानंतर बारामतीत राजकारणात अक्षरशः भूकंप झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण, अ दर्जाच्या बारामती नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ची सत्ता असली, तरी तिकीटासाठी आतून ‘चोरस’ एवढी तीव्र आहे की, कार्यकर्तेपासून नगरसेवकांपर्यंत सगळ्यांचे धडधड वाढल्या आहेत.

पण या सगळ्यात सगळ्यांचे लक्ष केंद्रित झाले आहे ते प्रभाग क्रमांक १० वर! कारण हा प्रभाग सध्या राजकीय चर्चेचा आणि भावनांचा केंद्रबिंदू ठरला आहे.

स्थानिक पोर्टलने काही दिवसांपूर्वी एक एक्झिट पोल घेतला — आणि हाच एक्झिट पोल बारामतीत खळबळ माजवून गेला आहे. कारण हा सर्वेक्षण कोणी लावला, कशासाठी लावला, आणि कोणाच्या सूचनेवर लावला — हा प्रश्नच सध्या चर्चेत आहे.

त्या एक्झिट पोलमध्ये काय घडलं?
माजी नगरसेवक, सामाजिक कार्यात सक्रिय असलेला एनजीओ कार्यकर्ता, आणि स्थानिक प्रभावशाली व्यक्ती — या सगळ्यांना मागे टाकत एक सर्वसामान्य कुटुंबातील पोलिस कर्मचाऱ्यांचा मुलगा सचिन जगदाळे यांनी आघाडी घेतली आहे!

जनतेचा कल स्पष्ट — “युवकांचा चेहरा हवा!”
सचिन जगदाळे यांनी आतापर्यंत न शोबेबाजी केली, न बॅनरबाजी. कोणतंही फोटोसेशन नाही, कोणतेही दिखाऊ कार्यक्रम नाही — फक्त आणि फक्त सामाजिक कामाच्या जोरावर त्यांनी लोकांच्या मनात स्थान निर्माण केलं. आणि त्याचं प्रत्यंतर या एक्झिट पोलमध्ये स्पष्टपणे दिसलं.

यामुळे नागरिकांमध्ये चर्चा सुरू — “हे खरे एक्झिट पोलचे यश नाही, तर लोकांच्या भावनेचा स्फोट आहे!”

स्थानिक राजकारणात मोठ्या नेत्यांचे कार्यकर्ते, माजी नगरसेवक, आणि एनजीओ गट मागे पडले, तर एक सर्वसामान्य घरातून आलेला तरुण आघाडीवर — हेच आज चर्चेचं केंद्र.
जनतेतून आवाज उठतोय —

> “हा तर खरा लोकांचा उमेदवार! सचिन जगदाळेचं नाव टिकटासाठी निश्चित करावं!”

आता सगळ्यांच्या नजरा एका प्रश्नावर —
अजितदादा पवार या जनतेच्या एक्झिट पोलचा विचार करतील का?
सर्वसामान्य कुटुंबातील, पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलाला राष्ट्रवादीचं तिकीट देऊन ‘युवा नेतृत्वा’ला संधी देतील का?

बारामतीत सध्या एकच चर्चा घुमतेय —

> “प्रभाग क्रमांक १० मध्ये फिक्स नगरसेवक — सचिन जगदाळे!”

आणि या चर्चेमुळे बारामतीचं राजकारण नव्या समीकरणांकडे झुकताना स्पष्टपणे दिसतंय.

Saturday, November 1, 2025

रिल्ससाठी जाळ-धूर काढणाऱ्या चार बुलेट पोलिसांच्या ताब्यात - बारामती तालुका पोलिसांची कडक कारवाई


बारामती दि. ०१  सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी आणि शहरात दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या चार बुलेटस्वारांवर बारामती तालुका पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. या तरुणांनी कटफळ पालखी मार्गावरील ब्रिजखाली मोठ्या आवाजात बुलेट चालवत जाळ आणि धूर काढत रेसिंग करत रील्स बनवली होती. ही व्हिडिओ क्लिप दि. २० रोजी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.
    सदर रील्समध्ये वापरलेल्या बुलेट मोटरसायकलींचे क्रमांक  एम.एच ४२ बी एच ७४०४, एम.एच १२ पी एल ७६३७, एम.एच १२ के एम ८५९२, एम.एच ४२ बी.ए ५५५३ असे आहेत.
या चारही मोटरसायकली पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून, संबंधित चालकांविरुद्ध वाहतूक नियमांचे उल्लंघन, ध्वनी प्रदूषण आणि सार्वजनिक शांतता भंग केल्याबद्दल कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. ही वाहने १५ दिवसांसाठी डिटेन करण्यात आली आहेत. शहरात वेगाने वाढणाऱ्या 'व्हायरल होण्याच्या' स्पर्धेमुळे युवकांमध्ये रेसिंग, धूर काढणे आणि आवाज वाढवणे या प्रकारात वाढ होत आहे. यामुळे केवळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत नाही, तर वाहतुकीलाही मोठा धोका निर्माण होतो, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.



पेन्सिल चौक, एमआयडीसी परिसर या ठिकाणी कोणीही अतिवेगाने मोठ्या आवाजात वाहने चालविणे अथवा इतर प्रकार करून वाहतूक नियमांचे उल्लंघन केलेले मिळून आल्यास तत्काळ कळवावे त्यावर कठोर कारवाई केली जाईल. 

    ~चंद्रशेखर यादव, बारामती तालुका पोलीस ठाणे

“एक्झिट पोलचा सरप्राईज पॅकेज — पोलिसाचा मुलगा सचिन जगदाळे जनतेच्या पसंतीस उतरला”

बारामती -: प्रभाग क्रमांक दहा : एक्झिट पोलनंतर राजकीय वर्तुळात खळबळ बारामती शहरातील प्रभाग क्रमांक १० मध्ये घेतलेल्या पहिल्याच एक्झिट पोल नंतर स्थानिक राजकारणात एकप्रकारे भूकंप झाल्याची चर्चा सुरू आहे. या एक्झिट पोलमध्ये नागरिकांनी दिलेल्या मतांनुसार, समाजकार्यात गाजलेले माजी नगरसेवक अमर धुमाळ आणि संभाजी माने यांना मागे टाकत एक सर्वसामान्य, नवा चेहरा — सचिन जगदाळे — याने पहिलं स्थान मिळवलं आहे.

हा निकाल केवळ आकड्यांचा नाही तर जनतेच्या मानसिकतेतील मोठा बदल दाखवणारा असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

साधा कार्यकर्ता ठरला पहिल्या पसंतीचा चेहरा

सचिन जगदाळे यांचे वैशिष्ट्य म्हणजे — कोणतीही मोठी जाहिरात नाही, कोणतेही होर्डिंग्ज नाहीत, सोशल मीडियावर गाजावाजा नाही, तरीही लोकांच्या मनात जागा निर्माण करण्यात ते यशस्वी ठरले.

पाटस रोड परिसरातील एक पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा, साधं आयुष्य जगत समाजकार्यात शांतपणे योगदान देणारा, आणि फोटोसेशनपासून दूर राहणारा हा तरुण आज प्रभाग क्रमांक दहामधील लोकांचा ‘नवा पर्याय’ म्हणून उदयास येत आहे.

स्थानिक लोकांच्या मते, “आमच्यासोबत काम करणारा माणूसच आमचा खरा प्रतिनिधी असावा,” या विचारावरूनच जगदाळे यांना एवढा प्रतिसाद मिळाला असावा.

संभाजी माने व अमर धुमाळ यांनाही आव्हान

या एक्झिट पोलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर संभाजी माने असून, माजी नगरसेवक अमर धुमाळ तिसऱ्या क्रमांकावर गेल्याचे निकाल दर्शवतात.
संभाजी माने यांनी एनजीओमार्फत चांगले समाजकार्य केले असले तरी, जनतेचा कल जगदाळे यांच्या बाजूने झुकलेला स्पष्ट दिसतो.

नगरसेवक म्हणून कामकाज पाहिलेल्या अमर धुमाळ यांना या निकालाने विचार करायला भाग पाडले आहे. स्थानिक नागरिक म्हणतात — “जे वर्षानुवर्ष काम करतात, त्यांनाही आज नवा कार्यकर्ता मागे टाकतो आहे, हेच जनतेच्या विचारातील बदलाचं लक्षण आहे.”

नागरिकांमध्ये रंगलेली चर्चा

बारामतीतील नागरिकांमध्ये सध्या या निकालावरून मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे.
"सचिन जगदाळे खरोखरच प्रभाग क्रमांक दहाचा प्रबळ दावेदार ठरणार का?"
"सामान्य कुटुंबातून आलेला, पोलिसाचा मुलगा असलेला हा युवक पुढील निवडणुकीत धमाका करेल का?"
या आणि अशा अनेक प्रश्नांनी स्थानिक राजकीय चर्चेला चैतन्य दिले आहे.

लोकप्रियतेच्या या पहिल्याच चाचणीत जगदाळे यांनी मिळवलेले जवळपास हजाराहून अधिक मते हा आकडा सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

जनतेचा कल बदलतोय का?

या एक्झिट पोलच्या माध्यमातून स्पष्ट झाले आहे की, आता जनता फक्त प्रसिद्ध चेहरे किंवा जुन्या नगरसेवकांवर विसंबून राहत नाही.
नवा विचार, नवा चेहरा आणि काम करणाऱ्यांवर विश्वास — अशी नवी लाट या प्रभागात उठलेली दिसते.

राजकीय समीक्षकांच्या मते, जर हेच जनमत प्रत्यक्ष निवडणुकीत उतरले, तर प्रभाग क्रमांक दहामध्ये सचिन जगदाळे आणि संभाजी माने यांच्यातील लढत अत्यंत चुरशीची ठरण्याची शक्यता आहे.

अंतिम निष्कर्ष

एक्झिट पोल हा निवडणुकीपूर्व जनतेचा आरसा असतो, आणि या आरशात यावेळी जो चेहरा स्पष्ट दिसला — तो म्हणजे सचिन जगदाळे.
जनतेच्या मनातील बदलाचा हा संकेत आहे की केवळ नाव नाही तर काम आणि विश्वास यावर लोक मतदान करायला तयार आहेत.

प्रभाग क्रमांक दहाचा निकाल काहीही असो, पण या एक्झिट पोलमुळे स्थानिक राजकारणात एक नवा चेहरा आणि नवा अध्याय उघड झाल्याचं निश्चित म्हणता येईल.

*नगरपालिका निवडणूक : पक्ष हरला, व्यक्ती जिंकली?*

 * बारामतीत पवारांच्या सत्तेला पहिली ठेच लागली का?*   * प्रतिनिधी-: भीमराव कांबळे*  बारामती -: लोकजागृती भूमी दि-:२५डिसेंबर २५-:...