Friday, July 14, 2023

सेनापती बापट मार्ग, दादर येथे अनधिकृत रित्या सरास घाऊक मासळी बाजार कायदेशीर बंद करण्याबाबत मुख्यमंत्री यांना पत्र.


मुंबई प्रतिनीधी: महेश कदम 


प्रभादेवी, एल्फिन्स्टन रोड येथील मच्छी मार्केटला अस्वच्छतेचा विळखा पसरलेले असतो. या बाबत अनेक तक्रारी करून सुद्धा जैसे तैसे आहे. या अगोदर सुद्धा प्रसार माध्यमातून बातमी करण्यात आली होती थोडे दिवस शांतमय होऊन पुन्हा तेच वातावरण. पालिका अधिकारी साफ सफाई करून सुद्धा अस्वच्छता, घाण दुर्गंधी पसरलेली असते, प्रशासनाचे दुर्लक्ष होत.

 असल्याने स्थानिकांच्या समस्या कायम आहे. गेली २० वर्ष हे त्रास लोकांना सहन करावे लागत आहे. कागदीपत्र कारवाई करून सुद्धा मच्छी मार्केट स्थलांतर होत नाही. स्थानिक नगरसेवक ह्यांनी सुद्धा कारवाई करून प्रशासन दिशाभूल करते.

 आंध्रप्रदेश मधुन विक्री साठी येणारे मासे हिथे रस्त्यावर काटा लावून सरस विकले जातात. मच्छीच्या घाण पाण्याने मलेरिया, डेंग्यू सारखे आजाराचे नाहक बळी गेले आहेत. टेम्पो, ट्रक, डबल पार्किंग मुळे वाहतूक कोंडी व अपघात होऊन सुध्दा ह्यांच्यावर पोलीस कारवाई होत नाहीत. स्वच्छ भारत अभियान च्या नावाखाली अस्वच्छता दिसते. स्वराज्य सोसायटी, हनुमान नगर, आंबेडकर नगर, ह्यांना अनेक त्रास सहन करावे लागते.

ह्या संदर्भात श्री. जितेंद्र कांबळे, वडाळा विधानसभा उपाध्यक्ष ह्यांनी माननीय मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री साहेब व बृहन्मुंबई महानगर पालिका यांना निवेदन पत्र दिले आहेत तर त्यांनी पहाटे सकाळी लवकर येऊन येथे लक्ष द्यावे व ह्यांच्यावर बेकायदेशीर धंधा करणाऱ्यावर कारवाई करून मच्छी मार्केट स्थलांतर करावे अशी मागणी स्थानिक लोकांनी केली आहे. नाहीतर आंदोलन करण्यात येईल असे आव्हान केले आहे.      

सेनापती बापट मार्ग, दादर येथील प्रभाग क्र १९२ मधील घाऊक मासळी बाजार सन २०२० साली ऐरोली येथे कायदेशीर प्रक्रियेने मनपा मार्फत स्थलांतरित होऊन सुद्धा त्या घाऊक मासळी बाजार रितसर चालू आहे. सदर मासळी बाजारावर सहाय्यक आयुक्त,जी/उत्तर यांच्या मार्फत कायदेशीर कारवाई करून सदर ठिकाणी पत्रे लावून जागा सील बंद करण्यात आली आहे.

परंतु काही बाहेरचे मासळी व्यापारी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, सेनापती बापट मार्ग येथील ब्रिज शेजारी रस्त्यावर खुलेआम काटा लावून मासळीचा व्यापार करत आहे. जेम तेम ४-५ मराठी माणूस तेथे धंधा करतो बाकीचे सर्व बाहेरचे येथे येऊन मच्छी चा व्यापार करतात. मासळीचे ट्रक, टेम्पो, टॅक्सी यांची तीन लेन मध्ये लावून रस्त्याच्या दुतारफा घेवाण देवाण चालू असते.

 विभागातील रहिवाशी जेष्ठ नागरिक, सकाळी शालेय विध्यार्त्यांना, महिलांना जाण्या येणास जागा नसते, अंगावर मच्छी चा पाणी पडते त्यामुळे स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावे लागत आहे सोबत घाण दुर्गंधीयुक्त पाणी व मासळीचे थर्माकोल चे बॉक्स चा खच रस्त्यावरच पडलेला असतो. याच्यामुळे सदर परिसरात मोटार सायकल घसरून अपघाताचे प्रकार दिवसेंदिवस वाढले आहेत. सदर मासळी बाजाराच्या वेळेत स्वराज्य सोसायटी, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ते आंबेडकर नगर इथपर्यंत पार्किंग मुळे सदरचा रस्ता घोक्याचा झाला आहे.

 सदर पत्रानुसार नागरिकांच्या जीवाचा घोका लक्षात घेऊन अनधिकृत मासळी बाजार कायदेशीर कारवाई करून बंद करून विभागातील जेष्ठ नागरिक, शालेय विध्यार्थी व महिला यांना न्याय द्याल व वाहतूक कोंडी मुक्त करून द्यावी अशी विनंती करण्यात आली आहे.        
अन्यथा स्थानिक नागरिकांच्या रोष्याला सामोरे जाऊन कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाल्यास याची संपूर्ण जबाबदार म न पा आयुक्त असतील असा ईशारा स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

Thursday, July 13, 2023

महाराष्ट्रा मध्ये सर्प जनजागृती कार्यशाळा घेणे खूप आहे गरजेचे


संपादक -:नितल शितोळे 


नसरापूर :-आपण पाहतोय आता वरून राजाचे आगमन झाले आहे. सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. नदी, ओढे वाहू लागले आहेत. शेतकरी राजा आपल्या काळ्या आई च्या मशागतीच्या कामाला लागला आहे. पण हा काळ म्हणजे साप व अंड्यातून त्याची पिल्ले बाहेर येण्याचा काळ असतो.

 त्यामुळे सर्पदंशाचे प्रमाणही या दिवसांत जास्त असते . या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा वन्यप्राणी व सर्परक्षक असोसिएशन ची टीम पुणे जिल्ह्यात व तालुक्यातील विविध शाळा, कॉलेज, महाविद्यालय, अनाथ आश्रम, दुर्गम भागातील वाड्या वस्था अशा गावांत सर्प जनजागृती कार्यशाळा घेण्यात येत आहेत .

पुणे जिल्ह्यातील व तालुक्यातील डोंगराळ तालुक्यात तसेच की वेल्हे, भोर, पुरंदर, मुळशी, व हवेली तालुक्यातील काही भाग तसेच , दुर्गम वाड्या , वस्त्या , धनगरवाडे आदिवासी वाडे, कातकरी वस्थ्या याच्या भोवतली जंगल खूप प्रमाणात आहे. तसेच या ठिकाणी सर्पदंशाचे प्रमाण जास्त असते .

 पानशेत , मढेघाट  या भागा कडील त्यात पुरेशी माहिती नसल्याने बरेच सर्पदंश झालेले रुग्ण दगावतात व त्या भागात लगेच उपचार सोय लगेच मिळत नसल्याने माणूस दगावत आहे . रात्रदिवस रानात राबणाऱ्या शेतकरी कष्टकऱ्यांसाठी साप व सर्पदंश हे फार गंभीर विषय बनलेले असतात . बऱ्याच ठिकाणी माहिती अभावी व अज्ञानामुळे बिनविषारी साप चावला तरी फक्त भीतीने ती व्यक्ती दगावते जरी विषारी साप चावला तर गावातील मांत्रिक किव्हा साधू बाबा कडे जाऊन आपला जीव गमावत आहेत.

यासाठी महाराष्ट्र, पुणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यान मध्ये व  शाळे मध्ये,गावात कार्यशाळेद्वारे जनजागृती सुरू आहे . सर्प जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्यासाठी ग्रामपंचायत , शाळा , विविध संघटना, रोटरी क्लब, कंम्पनी यांनी पुढाकार घ्यावा व वन्यजीवरक्षक किव्हा सर्पमित्रांना  संपर्क करावा .

 पुणे जिल्हा वन्यप्राणी व सर्परक्षक असोसिएशन ची टीम प्रत्यक्ष येऊन कार्यशाळा घेईल , असे आवाहन पुणे जिल्हा वन्यप्राणी व सर्परक्षक असोसिएशन चे संस्थापक अध्यक्ष सुशील विभुते , उपअध्यक्ष शंकर वाडकर, सर्पमित्र विशाल शिंदे , रघुनाथ वाडकर, विलास धोंगडे, श्रीकांत खेडकर, सनी कडके, विनायक मोहिते, संतोष पाटील, दीपक जाधव यांनी केले आहे . कार्यशाळा घेण्या साठी संपर्क 94232 13283

योध्दा महिला मंच व पालवी लेडीज टेलर यांच्या वतीने "बाईपण भारी देवा" चित्रपटाचे मोफत आयोजन...


प्रतिनिधी -: सचिन वळमा 


प्रतिनिधी - सध्या महाराष्ट्रभर गाजत असलेल्या "बाईपण भारी देवा" हा मराठी चित्रपट महिला वर्गामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.  महिलांच्या कार्यकर्तुत्वावर भाष्य करणारा अनेक दिवसानंतर चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला महिलावर्गाने अक्षरशः डोक्यावर उचलून धरले आहे.

 याच पार्श्वभूमीवर बारामती आणि परिसरातील महिलांसाठी योद्धा महिला मंच आणि पालवी लेडीज टेलर यांच्या वतीने 150 महिलांना चित्रपटाचे मोफत आयोजन करण्यात आले होते.

   यावेळी रोजच्या दैनंदिन जीवनातले काम-धावपळ सोडून महिलावर्ग उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. बारामती मधील तारा थेटर मध्ये गुरुवार दिनांक 13 जुलै रोजी दुपारी एक च्या शोचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमासाठी पालवी लेडीज टेलर, संतोष शूज, हॉटेल सनलँड, यांच्यातर्फे विशेष सहकार्य करण्यात आले होते.  या उपक्रमाचे आयोजन  योद्धा प्रोडक्शन संचलित योद्धा महिला मंच च्या वतीने करण्यात आले होते.

Wednesday, July 12, 2023

भुंकणाऱ्या प्रत्येकाला दगड मारण्यात वेळ वाया नका घालवू .काहींना बिस्कीट देऊन पुढे चालायला शिका ......



मुख्यसंपादक -: अमित बगाडे 

आयुष्याची काही गणित आहेत,ज्याला ती सोडवता आली तो खरा यशस्वी. पण मग सगळीच गणित सोडवायची असतातच का ? तर त्यावर मी तर असेच सांगेल की काही गणित सोडून द्या मग ती आपोआप सुटतात व मनाचा गुंता ही वाढत नाही. आपल्या जन्मापासून अगदी मृत्यू पर्यत प्रत्येकजन हा स्पर्धेतच वाढत असतो. स्पर्धा असते शिक्षणाची, स्पर्धा असते नोकरीची,स्पर्धा असते व्यवहारांची ,स्पर्धा असते विचारांची,स्पर्धा असते सुखाची,सर्वच क्षेत्रात स्पर्धा अटळ आहे.


अशा स्पर्धेच्या युगात जेवढी लोक साथ  देतात तेवढीच लोक आपल्याला मागे खेचायला तयार असतात, मग खचून नाही जायचं आपण आपल्या वेगाने चालत राहायचं. दुःख याच नसते की परक्यांनी मागे खेचायचा प्रयत्न केलाय, दुःख याच जास्त होत की यामध्ये आपल्या जवळच किंवा ज्याला आपण खूप जवळचा मानतो त्याने खेचण्यासाठी प्रयत्न केलेला असतो.

 मित्रहो इतिहास साक्षी आहे की गद्दारी अथवा धोका हा नेहमी जवळचे करतात. पण असे असले तरी याला काही जवळचे अपवाद ही आहेत.मग विश्वास ठेवायचा नक्की कोणावर हा तर सगळ्या जगाला पडणारा प्रश्न आहे.

जीवनाच्या प्रवासात असंख्य प्रकारची  लोक तुम्हाला भेटतील, काही ओरडतील,काही धावतील,काही मारतील,काही सोबत तर काही विरोधी असतील पण यातून एक धडा नक्की घ्या प्रत्येकला उत्तर देण्यात वेळ वाया नका घालवू . काहींना बरोबर घ्या, काहींना हिशोबात ठेवा, काहींना बरोबर ठेवून दूर ठेवा, तर काहींना काहीही झालं तरी बरोबर घेऊ नका. आता माणसांचा अभ्यास करण्याची वेळ अली आहे.चेहरे पर मत जावो अपनी अकल लगावो.

 मनुष्य प्राणी जरी भावनांनी भरलेला  असेल तरी आता मात्र प्रॅक्टिकल राहून विचार करण्याची वेळ अली आहे. 
म्हणूनच भुंकनाऱ्या प्रत्येकाला दगड मारत बसलात तर मुक्कामी कधीच पोहचणार नाही, म्हणून काहींना द्या की बिस्कीट खायला आणि आपला जीवन प्रवास चालू ठेवा ...... 
बरोबर ना ?????????????

मा. संदेश आंबेडकरांच्या नेतृत्वात आंबेडकरी ऐक्य व्हावे. डॉ. राजन माकणीकर


प्रतिनिधी - रामचंद्र तावरे 


मुंबई दि (प्रतिनिधी) रिपब्लिकन आणी सर्व आंबेडकरी विचारांच्या पक्ष संघटना तसेच संस्थांनी मा. संदेश आंबेडकर यांच्या नेतृत्वात आंबेडकरी ऐक्य कराव असे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (संविधान) पक्षाचे राष्ट्रीय मुख्य सचिव डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केले आहे.

सेना, आघाड्या, पक्ष, संस्था व सर्व आंबेडकरी संघटनांनी वेगवेगळ्या गटा तटातून लढण्या ऐवजी मा. संदेश आंबेडकर साहेबां च्या नेतृत्वात आंबेडकरी ताकत दाखवावी व चाललेले गलिच्छ राजकारण सम्पुष्ठात आणून स्वाभिमानी व सत्तेचे राजकारण असेही तसेच मा. संदेश जिना कोणताही विकल्प न समजून आंबेडकरी मिशन व सत्तेचा संकल्प अस मानावे. असेही डॉ. माकणीकर म्हणाले.

डॉ. राजन माकणीकर असेही म्हणाले की, आप आपल्या गटांना घेऊन मर्यादित राजकारण करण्यापेक्षा सध्या आपसातील मतभेत हेवेदावे दूर करून कोणीही नेतृत्व न करता आपल्या अनुभवातुन राजकारणाला नवी दिशा द्यावी व मा. संदेश आंबेडकरांना ऐक्याचे नेतृत्व करू द्यावे.

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब यांचे पंतु असून मा. राजरत्न आंबेडकरांचे मोठे भाऊ आहेत. मा. संदेश आंबेडकर  यांना राजकारणातील आंबेडकरी नेतृत्वाची संधी दिली तर ते या संधीच नक्कीच सोन करून दाखवतील... 
आंबेडकरी संघटना व पक्ष प्रमुखांनां या संदर्भात पत्र देऊन राजकारणाला नवी कलाटणी देण्याचे काम अनुभवी राजकारण्यांनी करावे अशी विनंती आम्ही करनार असल्याचे डॉ. माकणीकर म्हणाले.

Monday, July 10, 2023

यवत ग्रामस्थांनी वन भोजनाचे जपली परंपरा, संपूर्ण गाव कडकडीत बंद, कुटुंबासह ग्रामस्थांचे गावाबाहेर भोजन,




मुख्यसंपादक -: अमित बगाडे 




दौंड - यवत ता दौंड  येथील, ग्रामस्थांनी पूर्वकालीन परंपरा जपण्याचा प्रयत्न केला, आखाड सप्ताहात पहिल्या रविवारी वन भोजनाचा पारंपारिक कार्यक्रम करण्यात आला होता,

या निमित्ताने गावातील सर्व ग्रामस्थ कुटुंबासह वन भोजनासाठी गावाबाहेर  नैसर्गिक स्थळी जाऊन वन भोजन करण्याची परंपरा आज ही कायम आहे, रविवार ९जुलै रोजी  वन भोजन कार्यक्रम करण्यात आला होता,

 या निमित्ताने यवत गावातील ग्रामस्थांच्या उपस्थितीत ग्रामदैवत  लक्ष्मी आई देवीचा पोतराज गोंधळी यांच्या पारंपरिक वाद्यांच्या गजरात ग्रामदैवत लक्ष्मी आई देवीचा छबिना  गाव प्रदक्षिणा करत देव पुजा आरती करुन, मोठ्या उत्साहात काढण्यात आला,

वन भोजनाच्या निमित्ताने संपूर्ण गावातील ग्रामस्थ कुटुंबासह घराला कुलूप लावून, सकाळीच घराबाहेर जाऊन  दुपारचे भोजन नैसर्गिक स्थळी घेण्याचा आनंद व्यक्त केला, तसेच गावातील सर्व व्यापारी वर्ग वन भोजनाच्या निमित्ताने उद्योग व्यवसाय दुकानदारी बंद करून पूर्वकालीन परंपरा जपण्याचा प्रयत्न केला,

वन भोजनाच्या दिवशी  गावातील बाजार पेठ व येशी मध्ये कोणतेही वाहन सायकल टु व्हीलर फोर व्हीलर फीरु नये याची दक्षता घेण्यात आली होती, यवत गावात पुर्वी मरीआईचा गाडा गावातुन फिरविण्याची परंपरा होती,असे बोलले जात आहे,

त्यामुळे गावातील रोग राई दुर करण्यासाठी व विविध आजार व  असलेल्या लोक कल्याणकारी सत्कर्म जोपासण्याचे अतिशय महत्त्वाची भूमिका घेऊन परंपरा कायम रुजविण्याचा पाईडा यवत गावातील नागरिक जपत आहे प्रसंगी श्री काळभैरवनाथ देवस्थान कमिटीचे अध्यक्ष मा सतीश दोरगे, यवत ग्रामपंचायतीचे मा उपसरपंच व विद्यमान सदस्य सदानंद दोरगे, कमिटीचे सदस्य कैलास आबा दोरगे, दत्तात्रय दोरगे, वि का सो मा चेअरमन आण्णा दोरगे, श्रीपतीराव दोरगे, कोंडीबा दोरगे, काळुराम शेंडगे, सागर शेंडगे, आदी मान्यवर उपस्थित होते,

पालखी मार्गावरील रोटी घाट येथे विठलं रूकमाई आणि न्यानोबा तुकोबांचे भव्य दिव्य शिल्प उभारावे, -: मोरे महाराज.




संपादक -: नितल शितोळे 


दौंड --- जगदगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा मार्गावर एकमेव रोटी घाट असून या  ठिकाणी विठलं रूकमाई आणि न्यानोबा - तुकोबा यांचे भव्य दिव्य शिल्प उभारावे . अशी मागणी संत तुकाराम पालखी सोहळा प्रमुख आणि देहू संस्थानचे विस्वस्त भानुदास  महाराज मोरे यांनी पत्रकार यांचेशी बोलतांना केली आहे.

एकादशी पंढरपूर येथील कार्यक्रम उरकून पालखी सोहळा 3 जुलै रोजी देहूकडे परतीच्या प्रवासात निघाला आहे,

हिंगणी गाडा येथे पालखी सोहळा मुक्कामी आला असता पत्रकारांशी मोरे महाराज बोलत होते,
मोरे महाराज पुढे म्हणाले, शासनाने पालखी सोहळा मार्ग चार पदरी प्रशस्त व चांगले बांधले  असून
यामुळे पालखी सोहळ्याचे प्रवास सुखकर होत आहे,

परन्तु रस्ते  बनविताना  या प्रशस्त रस्त्याचे दोन्ही कडेने झाडी लावण्याचे राहूनगेले आहे .यावर्षी पालखी सोहळा वाटचाल करताना प्रचंड उष्णता असल्याने वारकरी  बांधवांना थांबण्यासाठी व सावली साठी रस्त्याच्या कडेला झाडे नसल्याने वारकरी बांधवांचे खूपच हाल झाले आहेत,

शासनाने पालखी मार्गाच्या  दुतर्फा झाडे त्वरित लावावीत, त्याचे चांगले संगोपन करावे, आणि झाडे  वाढववीत,यासह या मार्गावर एकमेव रोटी घाट  आहे,
या ठिकाणी विठलं रूकमाई , आणि न्यानोबा  तुकोबा यांची शिल्प उभारावीत, या शिल्पा भोवतीचा परिसर प्रशस्त व सूंदर बनवावा , येथे वारकऱ्यांन बसण्यासाठी बाक व कट्टे यांची सोय करावी, अशी मागणीही मोरे महाराज यांनी केली आहे,

सदर मागण्याचे लेखी निवेदन शासनाकडे पाठवले असून पुढील पालखी सोहळ्याचे पूर्वी शासनरोटी  घाटात शिल्प उभा रून सोई सुविधा करतील , असा विश्वास मोरे महाराज यांनी व्यक्त केला आहे,

नवीन मार्गावर झाडे का लावली नाहीत?  शासनाने कोट्यवधी रुपये खर्चून पालखी मार्ग  चारपदरी व चांगल्या प्रकारे बांधले आहेत, या मार्गाने कामसुरु करताना या मार्गा कडेला असणारी झाडी तोडण्यात आली. परन्तु मार्ग बनवून आज किमान 10 ते 15 वर्षे झालीत,

यामार्गावर झाडे लावलीच गेली नाहीत मग या रस्याच्या आराखड्यात नवीन झाडे लावण्याचे प्रयोजन  नव्हते काय? असा सवाल या  मार्गावरून दैनं दिन प्रवास करणारे लोक गेल्या अनेक वर्षा पासून उपस्थित करीत आहेत, शासनाने याची त्वरित दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे

🔴 ब्लॅकमेल व मानसिक छळातून तरुणाची आत्महत्या; खडकवासला येथील तिघांविरुद्ध गुन्हा, आरोपी तरुणीचे वडील API – अटकेबाबत चर्चेला उधाण

बारामती तालुक्यातील मौजे रुई बयाजीनगर येथे घडलेल्या धक्कादायक घटनेत 23 वर्षीय तरुणाने मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची...