Monday, July 10, 2023

पालखी मार्गावरील रोटी घाट येथे विठलं रूकमाई आणि न्यानोबा तुकोबांचे भव्य दिव्य शिल्प उभारावे, -: मोरे महाराज.




संपादक -: नितल शितोळे 


दौंड --- जगदगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा मार्गावर एकमेव रोटी घाट असून या  ठिकाणी विठलं रूकमाई आणि न्यानोबा - तुकोबा यांचे भव्य दिव्य शिल्प उभारावे . अशी मागणी संत तुकाराम पालखी सोहळा प्रमुख आणि देहू संस्थानचे विस्वस्त भानुदास  महाराज मोरे यांनी पत्रकार यांचेशी बोलतांना केली आहे.

एकादशी पंढरपूर येथील कार्यक्रम उरकून पालखी सोहळा 3 जुलै रोजी देहूकडे परतीच्या प्रवासात निघाला आहे,

हिंगणी गाडा येथे पालखी सोहळा मुक्कामी आला असता पत्रकारांशी मोरे महाराज बोलत होते,
मोरे महाराज पुढे म्हणाले, शासनाने पालखी सोहळा मार्ग चार पदरी प्रशस्त व चांगले बांधले  असून
यामुळे पालखी सोहळ्याचे प्रवास सुखकर होत आहे,

परन्तु रस्ते  बनविताना  या प्रशस्त रस्त्याचे दोन्ही कडेने झाडी लावण्याचे राहूनगेले आहे .यावर्षी पालखी सोहळा वाटचाल करताना प्रचंड उष्णता असल्याने वारकरी  बांधवांना थांबण्यासाठी व सावली साठी रस्त्याच्या कडेला झाडे नसल्याने वारकरी बांधवांचे खूपच हाल झाले आहेत,

शासनाने पालखी मार्गाच्या  दुतर्फा झाडे त्वरित लावावीत, त्याचे चांगले संगोपन करावे, आणि झाडे  वाढववीत,यासह या मार्गावर एकमेव रोटी घाट  आहे,
या ठिकाणी विठलं रूकमाई , आणि न्यानोबा  तुकोबा यांची शिल्प उभारावीत, या शिल्पा भोवतीचा परिसर प्रशस्त व सूंदर बनवावा , येथे वारकऱ्यांन बसण्यासाठी बाक व कट्टे यांची सोय करावी, अशी मागणीही मोरे महाराज यांनी केली आहे,

सदर मागण्याचे लेखी निवेदन शासनाकडे पाठवले असून पुढील पालखी सोहळ्याचे पूर्वी शासनरोटी  घाटात शिल्प उभा रून सोई सुविधा करतील , असा विश्वास मोरे महाराज यांनी व्यक्त केला आहे,

नवीन मार्गावर झाडे का लावली नाहीत?  शासनाने कोट्यवधी रुपये खर्चून पालखी मार्ग  चारपदरी व चांगल्या प्रकारे बांधले आहेत, या मार्गाने कामसुरु करताना या मार्गा कडेला असणारी झाडी तोडण्यात आली. परन्तु मार्ग बनवून आज किमान 10 ते 15 वर्षे झालीत,

यामार्गावर झाडे लावलीच गेली नाहीत मग या रस्याच्या आराखड्यात नवीन झाडे लावण्याचे प्रयोजन  नव्हते काय? असा सवाल या  मार्गावरून दैनं दिन प्रवास करणारे लोक गेल्या अनेक वर्षा पासून उपस्थित करीत आहेत, शासनाने याची त्वरित दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे

एट्टापल्ली तालुक्यातील जारावंडी साजा अंतर्गत अवैध्य रेतीची तस्करी...




संपादक -: नितल शितोळे 


प्रशासनाचे दुर्लक्ष , ग्रामपंचायत सदस्य आहे रेती तस्कर..


गडचिरोली :- गडचिरोली जिल्ह्यातील एट्टापल्ली तालुक्यातील जारावंडी साजा अंतर्गत अवैध्य रेतीची तस्करी गेली अनेक दिवसापासून सुरु असून ग्रामपंचायत कार्यालय चे सदस्य हेच रेती उत्खनन करून शासनाची परवानगी न घेता , अवैध्य रेतीची उत्खनन , वाहतूक करून शासनाची दिशाभूल केली आहे असा आरोप योगेश कुमरे यांनी जिल्हाधिकारी , उपविभागीय अधिकारी,यांना निवेदन देऊन हे आरोप केला आहे.

सदर ग्रामपंचायत कार्यालय जारावंडी येथील ग्रामपंचायतीचे सदस्य असलेले दिलीप जीवन दास हे गेली अनेक दिवसापासून जारावंडी साजा अंतर्गत येत असलेल्या सारखेडा - भापळा येथील बांडिया नदिमधून रेतीची अवैध्य वाहतूक करून शासनाची दिशाभूल करत होते. त्यामुळे सदर तक्रारकर्ते यांनी मोका चौकशी करून या विषयाची माहिती महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले त्याप्रमाणे त्यांच्यावर थातुर - मातुर कारवाही करून प्रकरण बंद करण्यात आला . 

याचाच फायदा घेत ग्राम. पंचायत सदस्य दिलीप जीवन दास यांनी पुन्हा एकदा रेती उत्खनन करून तस्करी सुरु केली त्यामुळे तक्रार दार योगेश कुमरे यांनी दिनांक ६/७/२०२३ ला बांडिया नदीवर जाऊन चौकशी केली असता त्यामध्ये गाडी मध्ये रेती उत्खनन करून भरताना रंगेहाथ पकडले. 

सदर प्रकरण गडचिरोली जिल्ह्यातील एट्टापल्ली तालुक्यातील जारावंडी येथील असून रेतीची वाहतूक करून शासनाची परवानगी न घेता , शासनाचा महसूल बुळवणाऱ्या , अवैध्य रेतीची वाहतूक करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्य दिलीप जीवन दास यांच्यावर योग्य कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी योगेश बाजीराव कुमरे यांनी जिल्हाधिकारी संजय मीना यांच्या कडे करण्यात आली आहे.

पोरला येथे अवैध्य दारू पुन्हा एकदा जोरात सुरु...-: सामाजिक कार्यकर्ते रवींद्र सेलोटे यांचा आरोप..पोलिस प्रशासन जागे व्हा...


          
          
                    - बारामती लाईव्ह -



संपादक -: नितल शितोळे 

गडचिरोली :- तालुक्यातील मौजा पोरला येथे अवैध्य दारू विक्रीला उत आला असून पोलिस प्रशासन जागे व्हा अशी म्हणायची वेळ आली आहे..

मागील काही वर्षांपासून गावात दारू बंद करून गावकऱ्यांनी दारू मुक्त गाव अशी ओळख निर्माण केली होती. परंतु काही आंबट शौकीन दारू विक्री करून गावात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु गावातील सामजिक कार्यकर्ते , नवजवान ,आणि उत्साही मंडळ मिळून गावातील दारू विकणाऱ्या विरुध्द रान उठवून दारू बंद करण्यात आली होती.

परंतु काही दिवस बंद असलेली दारू पुन्हा एकदा जोरात सुरु झाली आहे त्यामुळे गावातील शांतता भंग होण्याच्या मार्गावर आहे असा प्रश्न पडला आहे , त्यामुळे या दारू विक्री विरोधात पोलिस प्रशासन जागे व्हा अशी म्हणायची वेळ आली आहे.

पोरला येथील सुरू झालेली दारू विक्री बंद करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र सेलोटे , गावातील प्रतिष्ठित नागरिक यांनी पोलीस प्रशासनाला केली आहे.

महावितरण कंपनीने चोवीस तासाच्या आत बसवला ट्रांसफार्मर


मुख्यसंपादक -: अमित बगाडे 


वागजवाडी गावच्या सरपंच निकिता आवळे यांच्या पाठपुराव्या मुळे जलद गतीने बसला  ट्रांसफार्मर

 भोर : भोर तालुक्यातील वागजवाडी गावांमधील ट्रांसफार्मर रविवारी सकाळी नऊ वाजता जळाला असल्यामुळे .वागजवाडी. राऊतवाडी. गावाचा वीजपुरवठा खंडित झाला होता.

पण वागजवाडी गावच्या जनतेतून निवड झालेल्या सरपंच निकिता आवाळे यांनी पाठपुरावा करून 24 तासाच्या आत ट्रांसफार्मर बसवून घेतला आहे.


जनतेमधून सरपंच निवडीचा फायद वागजवाडी गावाला झालेला पहायला मिळाला आहे .

भोर तालुक्यातील वागजवाडी . राऊतवाडी . व गाव कुसा बाहेर वसलेल्या वस्तीवरील लोक पाठीवर सकाळ डोकीवर दुपार आणि समोर संध्याकाळ असे काळ चक्र करून जीवन जगताना पाहायला मिळत होते .

मोसमी पाऊस जरी कमी प्रमाणात पडत असला तरी गावामधील नागरिक शेती मध्ये पेरणी करण्यासाठी मग्न झाले होते . त्यात रविवारी अचानक गावाला विध्युत पुरवठा करणारा ट्रान्सफर्मर जळाला असल्याने गावामधील विध्युत पुरावठा खंडित झाला होता.

या मुळे गावाला भर पाऊसात पिण्याच्या पाण्याचा तुटवडा होऊन गाव अंधारात राहणार असा संपूर्ण गावातील जनतेचा ठाम विचार झाला होता .

पण गावच्या नवनिर्वाचित जनतेतून निवडून आलेल्या सरपंच निकिता आवाळे यांनी किकवी एम एस ई बी कार्यालयातील लायन मन कपील येवले वायरमन अमोल पाटणे यांच्या सहकार्यातून एम एस ई बी कार्यालय सासवड येथील कुलकर्णी साहेब भागवत साहेब यांच्या कडे जलद गतीने ट्रान्सफर्मर बसवण्याची मागणी केली.
आणि या मागणीला चोवीस तासाच्या आत एम एस ई बी कंपनीने ट्रान्सफर्मर बसवून गावचा विध्युत पुरवठा पूर्ववत केला.

या मुळे गावातील नागरिक सरपंच निकिता आवाळे यांचे कौतुक करत असून महावितरण कंपनीचे आभार मानले आहे.

Sunday, July 9, 2023

स्त्री रुग्णालयास मिळाले नवीन वैद्यकीय अधीक्षक -: डॉ.अशोक हुबेकर यांनी स्वीकारला पदभार



मुख्यसंपादक -: अमित बगाडे 

नेकनूर (प्रतिनिधी)जिल्ह्यातील स्त्री रुग्णालयाचा वैद्यकीय अधीक्षक पदाचा  पदभार हा कुटीर रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ अशिलक शिंदे यांच्या कडे होता.

त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या स्त्री रुग्णालयाला अखेर डॉ.अशोक हूबेकर यांच्या रूपाने  वैद्यकीय अधीक्षक लाभले असून त्यांनी काल पदभार स्वीकारला यावेळेस त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी उपस्थित युवा नेते रवी काळे,महादेव लोमटे,पत्रकार तुळजीराम शिंदे,अशोक शिंदे,सुरेश रोकडे,संभाजी भोसले, जगदीश शिंदे,महेश खाकरे,मयूर लोमटे , मोराळे मॅडम आदी उपस्थित होते.

Friday, July 7, 2023

बारामती शहर व एमआयडीसी परिसरामध्ये कमिशन एजंट चा सुळसुळाट !


 बारामती -: बारामती शहर व एमआयडीसी परिसरात शिक्षणासाठी तसेच नोकरीसाठी बारामती मध्ये वास्तव्य करण्यासाठी येतात त्या अनुषंगाने त्यांना राहण्यासाठी1bhk,2bhk, तसेच बंगलो, रोहाऊस रेंट वर  पाहिजे असता त्यांच्या या अडचणीचा फायदा घेत कमिशन एजंट त्या ग्राहकांची लूटमार करीत आहे ते फ्लॅट तर देतात परंतु पहिले भाडे पूर्ण कमिशन म्हणून घेतात.


त्या ग्राहकांचे असे म्हणणे आहे की तुम्ही तुमची एक रजिस्टर फी घ्या. या कमिशन एजंट चे कुठे रजिस्टर असते  का? आपण हॉटेलमध्ये गेलो तर जीएसटी भरतो यांना जीएसटी बसतो का? यांची कुठे नोंदणी आहे का?  परंतु अशाप्रकारे अडवणूक करतात  व ग्राहकांची लुटमार  होत आहे परंतु कमिशन एजंट हे जबरदस्ती त्यांच्याकडून पहिले भाडे घेतात अशा प्रकारच्या एक ना अनेक तक्रारी ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती यांना प्राप्त झालेला असून.ही ग्राहकांची लुटमार थांबवण्यासाठी संबंधित बारामती शहर पोलीस स्टेशन तसेच बारामती तालुका पोलीस स्टेशन तसेच पुणे ग्रामीण पोलीस कार्यालयास बारामती शहरातील व एमआयडीसी भागातील कमिशन एजंट वरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी  करण्यात आलेले असून  तसेच ऑनलाईन मेलद्वारे तक्रार दाखल केली आहे .

ज्या ग्राहकांची अशाप्रकारे कमिशन एजंट लूटमार करत असेल तर ती लुटमार थांबवण्यासाठी ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीशी संपर्क 7888127878 या नंबर वर संपर्क साधा असे आव्हान ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे पश्चिम महाराष्ट्र सचिव यांनी केले आहे. बारामती शहरात ग्राहकांची लूटमार होत असेल तर त्यांची लुटमार थांबवण्यासाठी ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती कटिबद्ध आहे.

Tuesday, June 7, 2022

आझादी का अमृत महोत्सव समारंभाचा भाग म्हणून उद्या देशातील सर्व जिल्हयात सर्व सार्वजनिक बँकांचा पतवितरण माहिती कार्यक्रम

 आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाचा भाग म्हणून देशभरातील सर्व सार्वजनिक बँका, सर्व जिल्हयात, उद्या म्हणजेच 8 जून 2022 रोजी व्यापक पत वितरण माहिती कार्यक्रम राबवणार आहेत. या अंतर्गत, सर्व ग्राहक आणि संबंधितांना पतविषयक सुविधांची माहिती देत, त्यांच्या शंकांचे निरसन केले जाणार आहे. तसेच विविढ सरकारी योजनांसाठी लाभार्थी नागरीकांची नोंदणीही केली जाईल. या जिल्हयास्तरीय कार्यक्रमाचे संयोजन सर्व सार्वजनिक बँका आणि राज्य स्तरीय बँकर्स समित्या करतील.


केंद्रीय वित्त मंत्रालय सध्या आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत, 6 ते


12 जून या काळात, आयकॉनिक वीक साजरा करत आहे. या सप्ताहाच शुभारंभ, नवी दिल्लीत विज्ञान भवन इथे पंतप्रधानांच्या उपस्थितीत झाला.



या राज्यस्तरीय कार्यक्रमाच्या माध्यमातून, आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रम देशाच्या सर्व भागात घेऊन जाण्याचा उद्देश आहे, जेणेकरुन जास्तीत जास्त कर्मचारी आणि ग्राहक यात सहभागी होऊ शकतील. सर्व राज्यस्तरीय बँक समित्या पतविषयक योजनांची माहिती देण्याविषयीचे कार्यक्रम आयोजित करतील. तसेच, प्रधानमंत्री जीवनज्योती बिमा योजना (PMJJBY), प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना (PMSBY)आणि अटल पेन्शन योजना (APY), अशा योजनांसाठी लाभार्थी नागरिकांची नोंदणी करतील. त्याशिवाय, ग्राहक जनजागृती आणि वित्तीय साक्षरता तसेच विविध बँकांच्या शाखांनी केलेले कार्य, याचा आढावाही यावेळी घेतला जाईल.

🔴 ब्लॅकमेल व मानसिक छळातून तरुणाची आत्महत्या; खडकवासला येथील तिघांविरुद्ध गुन्हा, आरोपी तरुणीचे वडील API – अटकेबाबत चर्चेला उधाण

बारामती तालुक्यातील मौजे रुई बयाजीनगर येथे घडलेल्या धक्कादायक घटनेत 23 वर्षीय तरुणाने मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची...