Friday, July 28, 2023

सहकारमंत्री वळसे पाटलांनी भेटण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या भेटीसाठी थेट खुर्ची सोडल



मुख्यसंपादक -: अमित बगाडे 


मंचर -: राज्याच्या मंत्री मंडळाचे खातेवाटप झाल्यानंतर सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील आंबेगाव तालुक्यात प्रथमच आले होते. नागरिकांना भेटण्यासाठी ते पारगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या अतिथीगृहात थांबले होते. यावेळी संपूर्ण आंबेगाव तालुका तसेच शिरूर तालुक्यातील असंख्य नागरिक तसेच कार्यकर्ते आपल्या कामांची निवेदन घेऊन वळसे पाटील यांना भेटण्यासाठी आले होते.

तर काहीजण वळसे पाटील यांची सहकारमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यासाठी आले होते
सर्वसामान्य नागरिकांना आपल्या भेटीसाठी बराच वेळ ताटकळत उभे राहावे लागले. त्या गर्दीत अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिला असल्याचे समजताच राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील हे स्वत : खुर्चीवरून उठून नागरिकांमध्ये येऊन उभे राहिले. त्यांनी नागरिकांचे प्रश्न समजून घेऊ लागल्याने उपस्थित सगळेजण आपला नेता आपल्यातच येऊन उभा राहिल्याचे पाहून भारावून गेले.

वळसे पाटील कार्यालयात बसून प्रत्येक नागरिकांचे व भेटीसाठी आलेल्या शिष्टमंडळाचे म्हणणे समजावून घेऊन जे काम फोनवर होत असेल तर लगेच स्वीय सहाय्यकाला संबधिताला फोन लावून लगेच प्रश्न मार्गी लावत होते तर काहींना पत्राची आवश्यकता आहे. त्यांच्यासाठी लगेच पत्र या वळसे पाटलांच्या वेगवान कामाच्या शैलीमुळे कृतीने भारावून गेले.

Thursday, July 27, 2023

शेतकर्याचा मुलगा मोठा झाला पाहिजे-: :सहकारमंत्री वळसेपाटील




मुख्यसंपादक -: अमित बगाडे 


मंचर -: कळंब  एकलहरे बायपास हॉटेल माऊलीच्या बाजूला श्री गंगाधर शेठ लक्ष्मण कानडे (मा. संचालक, भि. स. सा. कारखाना) यांच्या इंद्रा हॉटेलच्या उद्घाटनासाठी सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील तसेच भोसरीचे आमदार महेश दादा लांडगे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

त्यावेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष- बाळासाहेब बेंडे पाटील. परागसमूहाचे सर्वेसर्वा - देवेंद्र शेठ शहा. पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष - विवेक दादा वळसे पाटील, पंचायत समिती सदस्या - उषाताई कानडे. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक  रमेश कानडे, सुनील कानडे, भरत कानडे  याप्रसंगी उपस्थित होते. इंद्रा म्हणजे नाष्टाची उत्तम सोय  वळसे पाटील म्हणाले शेतकऱ्याचा मुलगा मोठा झाला पाहिजे.

तो उद्योजक झाला पाहिजे. गंगाधर शेठ ने काबाडकष्ट करून मुलांना चांगले शिक्षण दिले. सुनील कानडे  चांगल्या पोस्ट वरती काम करत आहे व दत्तात्रय कानडे शेती पाहून हॉटेल व्यवसाय करण्याचे ठरवले आहे तरी मराठी माणसाने अशीच प्रगती करत जावो. जगाचा पोशिंदा मोठा झाला पाहिजे व उद्योग धंद्यात नाव कमावले पाहिजे.

 सुनील कानडे म्हणाले एकदा हॉटेल इंद्राला भेट द्या मिसळ ची चव घ्या  एकदा याल तर बघतच राहाल हॉटेल इंद्रा

प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न मोठ्या ताकतीने मांडणार :-सचिन राव डिंबळे



संपादक -: नितल शितोळे 


 मुंबई  -: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची मुख्यमंत्री महोदयांसोबत ऐतिहासिक व यशस्वी बैठक संपन्न होऊन प्राथमिक शिक्षक संघाची अधिकृत वेबसाईट, यूट्यूब चॅनेल, फेसबुक पेज, इंस्टाग्राम, ट्विटरचे  मुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन  झाले, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या माध्यमातून आगामी काळात शिक्षकांचे सर्वतोपरी प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहो असे प्रतिपादन शिक्षक नेते सचिनराव डिंबळे यांनी केले.


 26/07 -  महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात तात्या यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे  यांच्या समवेत काल  त्यांच्या मुंबई येथील वर्षा निवासस्थानी विशेष बैठक संपन्न झाली असून या बैठकीत नेते संभाजीराव थोरात तात्यांनी राज्यातील शिक्षकांच्या विविध  मागण्या मांडल्या व या मागण्यांच्या सर्व निर्णयांच्या बाबतीत शासनाने सर्व स्तरावरून जी.आर. निर्गमित करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री यांनी  शिक्षण आयुक्त सूरज मांढरे व ग्रामविकास विभागास सूचित केले असल्याची माहिती  या बैठकीस सोलापूर जिल्हयातून उपस्थित असलेले नूतन जिल्हाध्यक्ष अनिरूध्द पवार व सरचिटणीस सुर्यकांत हत्तूरे- डोगे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.


राज्याध्यक्ष अंबादास वाजे, राष्ट्रीय  महासचिव बाळासाहेब झावरे, मधुकर काठोळे, राज्य सरचिटणीस आबासाहेब जगताप, उत्तमराव वायाळ , तात्यासाहेब यादव, राज्य नगरपालिका महानगरपालिका शिक्षक संघाचे राज्य कार्यकारी अध्यक्ष सचिन डिंबळे, सरचिटणीस संजय चेळेकर, राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, राज्य  व राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सह सोलापूरचे प्रतिनिधी म्हणून राज्य कार्यकारी अध्यक्ष म. ज. मोरे, नेते बब्रुवान काशीद व राज्य सल्लागार लहू कांबळे यांच्या मार्गदशनानुसार *जिल्हाध्यक्ष अध्यक्ष अनिरूध्द पवार व सरचिटणीस सुर्यकांत हत्तूरे- डोगे या बैठकीत उपस्थित होते.

विविध मागण्या मांडण्यापूर्वी यावेळी मुख्यमंत्री महोदयांच्या शुभहस्ते महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची अधिकृत वेबसाईट, युट्युब चॅनेल, फेसबुक पेज, ट्विटर, इंस्टाग्राम या सर्व  सोशल मीडिया अकाउंटचे उद्घाटन एका टच ने करण्यात आले.  

सभेचे प्रास्ताविक बाळासाहेब झावरे यांनी तर सूत्रसंचालन आबासाहेब जगताप यांनी केले. शिक्षक नेते  थोरात तात्या यांनी रत्नागिरी अधिवेशनातील काही मागण्या मान्य झाल्याचे सांगून शिंदे साहेबांचे आभार मानले व नेहमीच्या स्टाईलमध्ये शिक्षकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडले. राज्य अध्यक्ष अंबादास वाजे व सरचिटणीस आबासाहेब जगताप यांनीही जिल्हा परिषद व राज्यस्तरावरील विविध प्रश्न सोडविण्याची विनंती केली. पुढील  मागण्या मांडण्यात आल्या.
. मुख्यालय राहण्याची अट रद्द करण्यात यावी.
. नवीन भरतीपूर्व आंतरजिल्हा बदल्या कराव्यात.
लेडीज फॉर अनफिट, एकल शिक्षकाची  पूर्वीची अवघड क्षेत्रातील  शाळा सुगम झाल्यास ती अवघड  क्षेत्रात धरावी.

. अपवादात्मक परिस्थितीमध्ये जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया चालू ठेवून 2018-19 मध्ये व त्यानंतरही यावर्षी पर्यंत झालेल्या बदली प्रक्रियेमध्ये विस्थापित झालेल्यांना, गैरसोयीत बदली झालेल्यांना, पती-पत्नी गैरसोयीत असणाऱ्यांना, बदलीची संधी मिळावी.
. उच्च शैक्षणिक अहर्ता प्राप्त M.A ,M. Phil,Ph.D केलेल्या शिक्षकांना पदोन्नती दयावी.

. विभागीय स्पर्धा परीक्षा आणि सरळ सेवेकरिता पात्र होण्यासाठी जिल्हा परिषद, जिल्हा सेवा प्रवेश नियम 1967 च्या  नियमात सुधारणा करावी.

. प्राथमिक शिक्षकांमधून केंद्रप्रमुखांची पदे लवकरात लवकर शंभर टक्के शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेच्या आधीन राहून  भरण्यात यावी.

. केंद्रप्रमुख परीक्षेसाठी 50 वर्षे वयाची व 50 टक्के गुणांची अट शिथिल करावी. केंद्रप्रमुख पदोन्नती मध्ये विषयवार विचार न करता सर्व शिक्षकांना समान संधी मिळावी, विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षांसाठी व्यावसायिक व शैक्षणिक अर्हता पूर्ण करणाऱ्या सर्व शिक्षकांना परीक्षेसाठी संधी देण्यात यावी.

. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षकांना 10, 20, 30  वर्षाची आश्वासित प्रगती योजना लागू करावी.

. 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांना अंशदायी पेन्शन योजना रद्द करून सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करावी.
. वैद्यकीय उपचारासाठी कॅशलेस सुविधा उपलब्ध करून द्यावी.

. रँडमद्वारे विस्थापित झालेल्या शिक्षकांना प्राधान्य देण्यात यावी
. 6 ते 14 वयोगटातील सर्व शंभर टक्के विद्यार्थ्यांना शासनाने मोफत गणवेश द्यावा
. जिल्हा परिषद सेवेतील शिक्षकांच्या पदासाठी कायम संरक्षण देण्यात यावे

. जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी केलेल्या संपकालीन कालावधीत मंजूर असाधारण रजा अर्जित रजा म्हणून मंजूर करण्यात यावे.

. 24 वर्ष सेवा झालेल्या शिक्षकांना विनाअट निवड श्रेणी देण्यात यावी . शिक्षक आमदार निवडणुकीत प्राथमिक शिक्षकांना मतदानाचा अधिकार मिळावा.
. बारावी सायन्स पदवीधरांना पदावनत करण्यासाठीचे पत्र रद्द करून तीन वर्ष मुदत देऊन बी.एस.सी पदवी प्राप्त करण्याची संधी मिळावी.

. सातव्या वेतन आयोगाचा दुसरा, तिसरा, चौथा हप्ता तसेच जीपीएफ व मेडिकल बिले लवकरात लवकर मिळण्यासाठी अनुदान उपलब्ध करून द्यावी.
 सेवानिवृत्त शिक्षकांचे ग्रॅज्युटी, पेन्शन विक्री, मेडिकल बिले, वेतन आयोग हप्ते लवकरात लवकर मिळण्यासाठी प्राधान्याने अनुदान उपलब्ध करून द्यावे.

. 100% पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी मिळावी, त्यामध्ये भेदभाव करण्यात येऊ नये.
. एम एस सी आय टी बाबत शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा.

यावर या सर्व निर्णयांच्या बाबतीत शासनाने सर्व स्तरावरून जी.आर. निर्गमित करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री कार्यालयाने शिक्षण आयुक्त व ग्रामविकास विभागास सूचित केले.

या मागण्यांव्यतिरिक्त नगरपालिका महानगरपालिका कार्यकारी अध्यक्ष सचिन डिंबळे यांनी 
 नगरपरिषद, नगरपालिका व महानगरपालिका यामधील कार्यरत प्राथमिक शिक्षकांचे ब, क, ड नगरपालिका व ड वर्ग महानगरपालिकेतील प्राथमिक शिक्षकांचे शंभर टक्के वेतन राज्य शासनाद्वारे करावेत.

राज्यातील महानगरपालिका नगरपालिका व नगरपरिषदांमध्ये भ्रष्टाचार मुक्त कारभार होण्यासाठी, प्राथमिक शिक्षकांची कामे राज्य शासनाने आदेशित केलेल्या विहित कालावधीतच पूर्ण होण्यासाठी व ती न झाल्यास प्रशासनावर कारवाईचा बडगा उभारण्याची तरतूद असलेला सेवा हमी कायदा लागू करावा.

नगर विकास खात्याच्या 16 फेब्रुवारी 2021 च्या बदली जीआर मधील दहा नंबरची अट रद्द करणे
 पुणे महानगरपालिकेत कार्यरत 93 रजा मुदत शिक्षण सेवकांबाबत उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे तात्काळ कार्यवाही करावी.

5. महानगरपालिका नगरपालिका क्षेत्रातील शिक्षकेतर कर्मचारी व शिक्षकांचे पगार एक तारखेलाच होण्यासंबंधीचा आदेश निर्गमित करावेत
आदी मागण्या मांडल्या व याही मागण्यांची तात्काळ दखल घेत संबंधित विषयाचे राज्य शासनाचे जीआर काढण्यासाठी  संबंधित अधिकाऱ्याना आदेशित केले.

Wednesday, July 26, 2023

नगरपालिका पातळीवरील दक्षता समिती ब्रह्मपुरीच्या अध्यक्षपदी प्राचार्य सुयोग बाळबुधे यांची निवड





प्रतिनिधी -: सुभाष नागतोडे 



             सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत वितरण करण्यात येणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंवर देखरेख करण्याकरिता नगरपालिका पातळीवरील दक्षता समिती ब्रह्मपुरीच्या अध्यक्षपदी प्राचार्य सुयोग वामन बाळबुधे यांची निवड झालेली असून सदस्य पदी डॉ.हेमलता अरविंद नंदुरकर,मंजिरी मोहन राजनकर, रश्मी कैलास पेशने, नलिनी बगमारे, अरुण बनकर,अरविंद पंढरीनाथ कुंभारे, दिलीप शेंडे, साकेत भानारकर, रहेमान पठाण, अमित प्रभाकर रोकडे,मनोज राजेश्वर भोपाल इत्यादींची निवड महाराष्ट्र राज्याचे वने, सांस्कृतिक तथा मत्स्य व्यवसाय मंत्री मा.नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी  केलेली असून नवनियुक्त समिती पदाधिकाऱ्यांनी मा. नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार प्रा. अतुलभाऊ देशकर यांचे आभार मानले. 


 नवनयुक्त पदाधिकाऱ्यांचे प्राचार्य अरुण शेंडे तालुकाध्यक्ष भाजपा ब्रह्मपुरी, इंजिनियर अरविंद नंदुरकर शहराध्यक्ष भाजपा ब्रह्मपुरी शहर यांचे सह प्रा. रामलाल दोनाडकर, नामदेव लांजेवार महामंत्री,ज्ञानेश्वर दिवटे महामंत्री,प्रा डॉ. सालोटकर शहराध्यक्ष ओबीसी मोर्चा ब्रह्मपुरी,मनोज वटे नगरसेवक ब्रम्हपूरी,स्वप्नील अलगदेवे भाजयुमो शहर महामंत्री इ.नी अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

४३ बगळ्यांना वन्यजीव मवाळ रक्षक संस्थे काढून जीवदान





प्रतिनिधी -: ज्ञानेश्वर वाघमारे 



मावळ -: तळेगांव दाभाडे नगरपरिषद   ऊद्यान विभाग चे प्रमुख सिध्देश्वर महाजन यांचा फोन आला की जिजामाता चौका जवळ  जितेंद्र कदम यांच्या घरावर एक बाबळीचे झाड  पडले आहे त्या झाडावर बरेच पक्ष्यांची घरटी आहेत व ते झाड लाईट त्या तारांनवर पडलेले आहे व डोळसनाथ कॅालणीची संपूर्ण लाईट गेलेली आहे व त्या झाडावर बरेच पक्ष्यांची पिल्ले आहे तसा फोन त्यांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्था चे संस्थापक निलेश संपतराव गराडे यांना फोन केला.

 काही वेळातच संस्थेचे सदस्य जिगर सोळंकी तिथे पोचले व त्यांणी पाहीले की ही बगळे आहे व यांचे आधिवस. झाड पडल्याने त्यांचे घर झाले नष्ट. वन्यजीव रक्षक मावळ संस्थे चे संस्थापक निलेश गराडे यांना माहिती दिली व  लगेच  संस्थेचे  सहकारी किरण मोकाशी, श्रेयस कांबळे, प्रियांका शर्मा, जिगर सोलंकी, विकी दौंडकर गणेश निसाळ गणेश ढोरे  भास्कर माळी अनिश गराडे  हे लगेच त्या ठिकाणी. पोचले व बेधर झालेल्या बगळ्यांच्या पिल्लांना ऐक ऐक करुन पकडुन  बास्केट मध्ये ठेऊ लागले ऐक ऐक करत ४३ पिल्ले भेटली.

 तर तीन पिल्ले मरन पावली  सर्व पिल्ले हि पुणे वन विभाग पुणे ACF आशुतोष शेंडगे व वडगांव  मावळे  चे रेंज ॲाफीसर हनुमंत जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली पुणें येथील रेस्कु चारीटेबल ट्रस्ट यांना बोलावून पुढील ऊपचारा साठी रेस्कु सेंटर ला पाठवण्यात आले आहे.

  वनपाल  ऐन के हिरेमट वनरक्षक योगेश कोकाटे वन सेवक किसन गावडे व वन्यजीव रक्षक मावळ संस्थे सदस्य उपस्थित राहून सगळे पक्षी सुखरूप रेसॅकु  टीम यांच्या  ताब्यात देऊन पुढील उपचारा साठी रेसॅकु सेंटर भुगांव येथे पाठवण्यात आले हे कोणता ही वन्यप्राणी जखमी अवस्थेत अधळ्यास जवळ पास च्या प्राणीमित्र ला किंवा वनविभागला संपर्क (१९२६) करावा असे आव्हान वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे अध्यक्ष अनिल आंद्रे यांनी लोकांना केले आहे.

Tuesday, July 25, 2023

पुणे महानगरपालिका समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून महिलांना योजनांची माहिती



मुख्यसंपादक -: अमित बगाडे 


कोंढवा खुर्द -: महानगरपालिकेच्या योजना या बहुतांश लोकांना माहिती नसतात. या योजना लोकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून दिया फाउंडेशनच्या कार्यालयात महिलांना सर्व योजनांची माहिती देण्यात आली.


यावेळी शैक्षणिक अर्थसहाय्य योजना,  अपंग अर्थसहाय्य योजना, विधवा महिलांसाठी योजना, पेन्शन योजना, महिला सक्षमीकरण याबाबतीत पुणे महानगपालिकेच्या समाज कल्याण विभागाच्या पूजा अहिराव, समुपदेशक व मनीषा धावरे, समूह संघटिका यांनी सर्व महिलांना मार्गदर्शन केले. व सर्व उपस्थित महिलांच्या अडचणी देखील समजून घेतल्या व त्यावर मार्गही काढून दिले. 
 महिलांना यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.

समाज कल्याण विभाग, वानवडी क्षेत्रीय कार्यालय यांनी दिया फाउंडेशन वर विश्वास दाखवून योजना संबंधी महत्वाची मीटिंग घेतल्याबद्दल आणि मार्गदर्शन केल्याबद्दल महिला भगिनी अम्मी नसिम शेख यांचेआभार  मानले

दिया फाऊंडेशनच्या वतिने समाज कल्याणविभागाच्या विविध योजनांच्या माहिती प्रसंगी उपस्थित महिला* (छाया:संदिप डोके कोंढवा खुर्द)

केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा यांच्याशी नई दिल्ली येथे खासदार अशोकजी नेते यांची भेट...




मुख्यसंपादक -:  अमित बगाडे 


 गडचिरोली जिल्हातील विविध क्षेत्रांतील विकासात्मक समस्याबाबत चर्चा करून निवेदन  केले सादर ....


नई दिल्ली: -गडचिरोली जिल्ह्य हा आदिवासी बहुल नक्षलग्रस्त अविकसित आकांशीत जिल्हा,  म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात हिरा,पन्ना, सोना, मॅग्नेट,लोहा मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती आहे.त्याचबरोबर मोठ- मोठे उद्योगधंदे, कारखाने, नाहित,उद्योग विरहित जिल्हा आहे. जिल्ह्याचा सार्वभौम भौगोलिक विकास नसल्याने मोठ्या प्रमाणे बेरोजगारी सुद्धा आहे.


गडचिरोली जिल्हा जंगलाने मोठ्या प्रमाणात व्यापलेला असल्यामुळे येतील रस्ते,रोड लाईन, रेल्वे या संबंधित अनेक समस्या येत असतात,गडचिरोली जिल्हा मोठ्या प्रमाणात नक्षलग्रस्त असून या जिल्ह्यामध्ये भौगोलिक सोयी सुविधा चांगल्या प्रकारे व्हावे यासाठी  मोठ्या प्रमाणात निधि उपलब्ध करावा.जेणेकरून या क्षेत्राचं नक्की यांचा फायदा होईल.

असा विश्वास खासदार अशोक नेते यांनी व्यक्त करत त्याचप्रमाणे जिल्हातील रेल्वे लाईन ही वडसा (देसाईगंज) येथे एकमेव असुन वडसा (देसाईगंज) गडचिरोली हा रेल्वे मार्ग (₹:३२२) तिनशे बाविस कोटी चा  सर्वे टेंडर झालेला आहे

लवकरच या रेल्वे मार्गाच्या कामाला गती येणार तसेच  या रेल्वे मार्गाच्या उदघाटनाला  केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा व केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे सुद्धा गडचिरोली ला येणार याबरोबरच गडचिरोली जिल्हातील वैनगंगा नदिच्या तिरावर एकुण पाच बँरेजेस मंजूर झाले आहेत.

त्यापैकी चिचडोह यांचे काम पुर्ण झाले असुन कोटगल बँरेजेसचे काम चालू आहे. तिन वर iकऊ बँरेजेसचे काम लवकरच चालू होणार,कोनसरी प्रोजेक्ट व बँरेजेसच्या उद्घाटनाला यावे. यासंबंधित खासदार अशोक नेते यांनी येण्याची विनंती केली आहे.

गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्रांतील तसेच गडचिरोली जिल्हाच्या विविध क्षेत्रातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री मान.अमित शहा याच्याशी भेटी दरम्यान खासदार अशोक नेते यांनी चर्चा करून निवेदन सादर केले.

ॲट्रॉसिटीच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अंतर्गत राज्यस्तरीय उच्चाधिकार दक्षता व नियंत्रण समितीची स्थापना -:वैभवजी गीते यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला ऐतिहासिक यश





मुख्यसंपादक -: अमित बगाडे 



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभारी  आहोत...ऍड.डॉ.केवल उके

मुबंई-: ॲट्रॉसिटी  ॲक्टच्या  अंमलबजावणीसाठी मा.मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय उच्चाधिकार दक्षता व नियंत्रण समितीची स्थापना करण्यासाठी नॅशनल दलीत मुव्हमेंट फॉर जस्टिस या संघटनेचे राज्य सचिव वैभव गिते यांनी मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा करून निवेदन दिले होते.

राज्य महासचिव ऍड.डॉ. केवल उके यांच्या नेतृत्वात ऍड.अनिल कांबळे,विनोद जाधव,पी.एस.खंदारे, पंचशीला कुंभारकर,शरद शेळके,बंदिश सोनवणे,शशिकांत खंडागळे यांनी महामहीम राज्यपाल यांना भेटून निवेदन दिले होते.

तसेच जंक्शन ता.इंदापूर जी.पुणे येथे दलीत पँथरच्या वर्धापन दिनी वैभव गिते यांनी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्याचा ठराव मांडला होता.

मुंबई मराठी पत्रकार संघात परिषदेत बोलताना ही समिती नसल्याने शासनाच्या कारभाराचा खरपूस समाचार घेतला.

पुणे येथे जाती तोडो समाज जोडो या मॅक्स महाराष्ट्र आयोजीत कार्यक्रमात बोलताना वैभव गिते यांनी या समितीची स्थापना नसल्याने अन्याय अत्याचाराचे प्रमाण वाढल्याचे सांगून सरकारला घेरले होते.

मावळ जी.पुणे येथील जाती तोडो समाज जोडो या परिषदेत मुख्यमंत्र्यांच्या अंतर्गत समिती नसल्याने कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याचे उदाहरणांसह सांगीतले.महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पत्रकार परिषदा घेत ही समिती स्थापन करून बैठक आयोजित करण्याची मागणी केली होती.
याची दखल घेऊन शासनाच्या सामाजीक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक 24 जुलै 2023 च्या शासन निर्णयान्वये मुख्यमंत्री महोदयांच्या अंतर्गत शासनाने राज्यस्तरीय उच्चाधिकार दक्षता व नियंत्रण समितीची स्थापना केली आहे.

या समितीची कार्ये खालील प्रमाणे 

1) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ (सुधारित अधिनिमय,२०१५) व सुधारित नियम, २०१६ ची अंमलबजावणी राज्यात योग्य रितीने व काटेकोरपणे होते किंवा कसे याचा आढावा घेणे तसेच या संदर्भातील प्रकरणांचा आढावा घेणे.

 2) अत्याचारग्रस्त,अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या व्यक्तींना देण्यात येणारे आर्थिक सहाय्य / मदत नियमांनुसार देण्यात येते किंवा कसे, याबाबतच्या प्रकरणांचा आढावा घेणे.

3) अत्याचारग्रस्त अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व्यक्तींचे पुनर्वसन इ. नियमानुसार व तात्काळ करण्यात येत आहे किंवा कसे, या संदर्भातील प्रकरणांचा आढावा घेणे.

4) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ (सुधारित अधिनिमय, २०१५) व सुधारित नियम, २०१६ अंतर्गत पोलिसात दाखल करण्यात आलेले गुन्हे/न्यायालयात दाखल करण्यात आलेली प्रकरणे यांचा आढावा घेणे. या अधिनियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी संबंधित संस्था / अधिकारी/
कार्यालयाकडून होते आहे किंवा कसे याचा आढावा घेणे. 

5) या अधिनियमांतर्गत नियमांचे उल्लंघन अथवा अंमलबजावणीसंबंधी शासनास प्राप्त अहवालांवर कार्यवाही करणे 

समितीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या अंतर्गत उपमुख्यमंत्री,अनुसूचित जातीतील खासदार,आमदार व सर्व वरिष्ठ अधिकारी असे एकूण 25 जन आहेत.
या समितीच्या एका कॅलेंडर वर्षात जानेवारी व जुलै या महिन्यांत १-१ अशा २ बैठका आयोजित कराव्यात.
यापूर्वी दि. ८ जानेवारी, २०१५ च्या शासन निर्णयान्वये राज्यस्तरीय उच्चाधिकार दक्षता व नियंत्रण समितीचे पुनर्गठण करण्यात आले होते.याची बैठक मुख्यमंत्री महोदयांच्या अंतर्गत दिनांक.   झाली होती.

तेव्हापासून आजतागायत या कायद्याच्या  अंमलजावणीसाठी मुख्यमत्र्यांनी एकही बैठक घेतलेली नाही.

सध्या समिती स्थापन झाल्याने तात्काळ बैठक आयोजित करून कार्यवाही करावी अशी मुख्यमंत्री यांच्या कडून अपेक्षा आहे.

यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले व त्यांचे स्वीय सहाय्यक प्रवीण मोरे,संविधान प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी सनदी अधिकारी ई.झेड.खोब्रागडे,व एन.डी.एम.जे संघटनेच्या सर्व पदाधिकारी व पत्रकार बांधवांचे सहकार्य व मार्गर्शन मिळाल्याची माहिती प्रसार माध्यमांशी बोलताना वैभव गिते यांनी दिली.

मणिपूरमधील अत्याचारात बळी गेलेल्यांना वानवडीत काँग्रेसच्या वतीने श्रद्धांजली



मुख्यसंपादक -: अमित बगाडे 



वानवडी -: केयादारीनगर येथील संविधान चौक येथे       काँग्रेसच्या वतीने मणिपूरमधील अत्याचारात बळी गेलेल्या भारतीय बांधवांना तसेच महिला भगिनींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

       मानवतेला काळिमा फासणार्‍या घटना रोजच घडत आहेत. भारतातील एक राज्य अत्याचाराने पेटले आहे. सत्ताधाऱ्यांनी 'राजधर्म' निभावणे गरजेचे असताना मौन धारण करून बसले आहेत अशी प्रतिक्रिया काँग्रेस ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष साहिल केदारी यांनी व्यक्त केली .
 
या प्रसंगी संपतराव साबळे, सुदाम जांभुळकर, किसन केदारी, सतीश गवळी, प्रदीप परदेशी, धर्मराज गायकवाड, अरविंद पिल्ले, नॉइला कांबळी, आस्मा खान, अजय परदेशी, प्रशांत मकवाना, प्रविण माने, अमोघ गायकवाड, विनय कदम, मिलिंद अहिरे, अमोल वाघमारे, संतोष सुपेकर, सूर्यकांत देडगे, मनोज खंडेलवाल, सुनील चौधरी, अनिल जांभुळकर, सुरेश गव्हाणे, अनिल रोकडे, ओंकार जगताप, चेतन पडवळ, प्रसाद चौघुले, देवदास लोणकर, स्टॅनली नॅथन, रवीबाग सिंग, अजय जगताप, स्वप्निल शिंदे, अनुप दीक्षित, विक्रांत करंडे, किशोर जांभुळकर, जमीर सय्यद, स्वरुप केदारी, प्रणव परदेशी, रोहित पाटोळे, प्रणय जठार, सागरuy जगताप, शोएब कुरेशी, अक्षय जाधव व वानवडी मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 वानवडी येथे ईरर्शळवाडी येथील नैसर्गिक आपत्तीत मृत पावलेल्यांना श्रध्दंजली वहाताना कॉंग्रेस पदाधिकारी

Sunday, July 23, 2023

नगरपरिषद,नगरपंचायत,नगरपालीका,अ,ब,क,वर्गामध्ये हा भ्रष्टाचार घाेटाळा सण 2007 ते आजतागायत सुरूच -भाउसाहेब कांबळे.





मुख्यसंपादक -: अमित बगाडे 



पुरोगामी महाराष्ट्राला व माणुसकीला काळी मा फासणारा हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार घोटाळा राज्यातील एकूण 387 नगरपरिषद, नगरपंचायत, नगरपालिका अ,ब,क, वर्ग मध्ये हा भ्रष्टाचार घोटाळा सण 2007 ते आजतागायत बिन बोबट पणे चालू आहे

रोजंदारी-कंत्राटी मुजरांकडून सर्व विभागांमध्ये कामे करून घेतली जातात मजूर पुरवठा करणारे व करारानुसार काम करून देणारे हे सर्व ठेकेदार मक्तेदार अपात्र आहेत त्यांच्याकडे मनुष्यबळ पुरविण्याचा तसेच मनुष्यबळाकडून काम करून घेण्याचा संबंधित मा सहाय्यक कामगार आयुक्त साहेब यांचा परवाना, प्रमाणपत्र नाही.


  तरीदेखील या अपात्र ठेकेदार मक्तेदारांच्या नावे दरमहा लाखो रुपयांची बिले काढून हा हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार घोटाळा केलेला आहे हे अपात्र ठेकेदार मक्तेदार रोजंदारी-कंत्राटी मुजरांना अत्यंत अल्प तुटपुंजा पगार देऊन त्यांचे शोषण केलेले आहे व हे शोषण आजही चालू आहे.

 अकुशल कामगार-14500 परंतु हे ठेकेदार गटार नाली साफसफाई करणाऱ्या महिला मजुरांना रोज 230 रुपये प्रमाणे त्यांना 26 दिवसाचा पेमेंट 5980 रुपये देऊन त्यांच्या पगारातून8520 रुपये ठेकेदार व मुख्याधिकारी संबंधित विभाग प्रमुख यांनी हडप केले आहे तसेच पुरुष मजुरांना दरमहा 8000 रुपये पेमेंट देऊन त्यांच्याही पेमेंट मधून 6500 रुपये हडप केलेले आहेत.

 तसेच घंटागाडी ड्रायव्हर, संगणक चालक, वायरमन, यांना 9000 रुपये पेमेंट देऊन त्यांच्या पेमेंट मधून 7500 रुपये हडप केले आहे (16500 कुशल कामगार) तसेच सुपरवायझर अभियंता-अति कुशल कामगार-25000 रुपये यांना बारा ते पंधरा हजार रुपये पेमेंट देऊन त्यांच्या पगारातून दहा हजार ते 13000 पर्यंत रुपये हडप केले आहेत.

 याबाबत भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने मी स्वतः दिनांक 14/7/2023 रोजी मा शासन दरबारी सर्व संबंधितांना पुराव्यासह रजिस्टर पोस्टाने तक्रार पाठविली आहे तसेच सायंकाळी सहा वाजून सहा मिनिटांनी 36 जिल्ह्या च्या मा जिल्हाधिकारी साहेब व मा उपजिल्हाधिकारी साहेब तसेच शासन दरबारी ई-मेल आयडी द्वारे पुराव्यासह ऑनलाइन तक्रार दाखल केली आहे या पत्रासह भाउसाहेब कांबळे यांनी दाखल केलेली तक्रार पीडीएफ फाईल द्वारे आपणास पाठवीत आहे.

 हा सर्व भ्रष्टाचार गेले सोळा वर्षे झाले अदृश्य पणे चालू आहे हा संपूर्ण भ्रष्टाचार हा टारगेट भ्रष्टाचार असून हा भ्रष्टाचार मा प्रधान सचिव साहेब नगर विकास विभाग-2 मंत्रालय मुंबई व मा आयुक्त तथा संचालक साहेब नगरपरिषद प्रशासन संचालनालय बेलापूर नवी मुंबई यांचे हात भ्रष्टाचार घोटाळे केलेल्या मुख्याधिकाऱ्यांच्या डोक्यावर आहेत वास्तविक पाहता अधिकाऱ्यांना दीड दोन लाख रुपयेपगार असूनही गटार नाली साफ करणाऱ्या दलित बहुजन समाजातील माता बहिणीच्या व बांधवांच्या व शेतकऱ्यांच्या मुला मुलींच्या पेमेंट मधून 8500/6500/7500/13 रुपये हडप करणे ही माणुसकीला काळी मा फासणारी बाब आहे बेट बिगारांचे, रोजंदारी-कंत्राटी मजुरांचे पेमेंट हडप करणे व सरकारी पदाचा अधिकाराचा गैरवापर करून कष्टकरी मजुरांचे शोषण करणे हा फौजदारी स्वरूपाचा दखलपात्र गुन्हा आहे तो या भ्रष्ट साखळीने केलेला आहे

288 विधानसभा मतदारसंघात या 387 नगरपरिषदा आहेत परंतु याबाबत आजपर्यंत एकाही माननीय आमदार महोदय साहेबांनी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केलेला नाही म्हणून आजही मजुरांचे शोषण बेधडक चालू आहे संघटनेच्या वतीने मी आपणा सर्वांना विनंती करतो की ही शोषित मजुरांची ची व्यथा व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध करून हा संपूर्ण घोटाळा महाराष्ट्रातील तमाम जनतेसमोर मांडवा ही विनंती
ज्येष्ठ नागरिक तक्रारदार भाऊसाहेब रघुनाथ कांबळे तथा संस्थापक अध्यक्ष भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य यांनी केली आहे.

वनविभागाच्या जमिनीच्या निर्वणीकरणासाठीचे प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवणार .






मुख्यसंपादक -: अमित बगाडे 


दौंड -  पावसाळी अधिवेशन २०२३ मध्ये सन १९८० पूर्वीच्या विविध सिंचन प्रकल्पांचे प्रकल्पग्रस्त, ग्रोमोअर योजना, भूमिहीन तसेच अल्पभूधारक शेतकऱ्यांनच्या उपजिविकेसाठी शासनाद्वारे वाटप करण्यात आलेल्या जमिनींचे निर्वनीकरण करावे.

याबाबत स्वतंत्र एजन्सीची नेमणुक करावी यासाठी *आमदार कुल* यांनी विधानसभा सभागृहात अर्धातास चर्चेच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केले होते त्यावेळी ते बोलत होते. 

 
पुनर्वसन तसेच शासनाच्या विविध योजना, भूमिहीन व अल्प भूधारक शेतकरी आदींसाठी शासकीय जमिनींचे वाटप करण्यात आले होते. १९२७ च्या वन अधिनियमाच्या नुसार जिल्हाधिकारी यांना निर्वणीकरण करण्याचे अधिकार होते परंतु वन संवर्धन कायदा १९८० लागू झाल्यानंतर पूर्वी वाटप करण्यात आलेल्या जमिनीच्या कायदेशीरते बाबत पेच निर्माण झाला आहे.

२ डिसेंबर २०१६ रोजी शासन निर्णय महसूल व वन विभागाच्या मार्फत काढण्यात आला, या शासन निर्णयानुसार प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते.  


सदर प्रस्ताव सादर करणे शेतकरी व नागरिकांसाठी अवघड गोष्ट असल्याने त्यासाठी महसूल व वन विभागाने स्वतंत्र एजन्सीची नेमणूक करावी, शेतकऱ्यांच्या मालकीच्या जमिनीवर लागलेला राखीव वने हा शेरा काढण्यासाठी सर्व समावेशक धोरण ठरवावे,

१३ वेगवेगळ्या सुविधा करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना व सार्वजनिक स्वरूपाच्या योजनांच्या पाईप लाईनसाठी वन विभागाने परवानगी जिल्हा स्तरावरून देण्याची व्यवस्था करावी अशा मागण्या यावेळी *आमदार राहुल कुल* यांनी केल्या आहेत.  


राज्यातील झुडपी वने व राखीव वनक्षेत्राच्याबाबत केंद्र सरकारच्या व मा.सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार योग्य ती कार्यवाही केली जात आहे. या क्षेत्रावर शेतीसाठी कोणत्याही प्रकारची बंधने नाही.

या क्षेत्रात कृषी उत्पादने संबंधित शेतकरी घेऊ शकतात. निर्वनीकरण करण्याच्या संदर्भात महसूल विभागाकडून प्रस्ताव प्राप्त झाले तर वनविभागामार्फत संबंधित प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवून या संदर्भात केंद्र सरकार पाठवून पाठपुरावा केला जाईल.

 तसेच पाईप लाईनबाबत परवानगी देण्यासाठी जिल्हाधिकारी यांना अधिकार देण्यात येतील असे आश्वासन यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहे.

Friday, July 21, 2023

बारामतीमध्ये मा.ना.अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती मध्ये पहिल्यांदाच लहान मुलांचे / बाळांचे तपासणी व उपचार शिबीर



मुख्यसंपादक -: अमित बगाडे 


मा.किरणदादा गुजर साहेब यांच्या हस्ते व मा.गणेश इंगळे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी आणि मा.दिनेश तायडे पोलीस निरीक्षक बारामती शहर यांच्या प्रमुख उपस्तिथीत पार पडले.


बारामती : दिनांक २१ जुलै २०२३
सन २०२२ मध्ये आदरणीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोहेल शेख आणि शाहीन सोहेल शेख यांनी बारामती मध्ये गिरीराज हॉस्पिटल येथे एक मा.किरणदादा गुजर साहेब आणि आमदार मा.अमोल जी मिटकरी साहेब यांच्या हस्ते ५०० श्रावणयंत्रणा व ईसीजी मशीन वाटप केले होते.

ह्या यशस्वी उपक्रमाला पुढच्या पातळीवर घेऊन आज बारामती मध्ये नटराज नाट्य कला मंदिर येथे मा.ना.अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती मध्ये पहिल्यांदाच लहान मुलांचे / बाळांचे तपासणी व उपचार शिबीर मा.किरणदादा गुजर साहेब यांच्या शुभहस्ते व मा.गणेश इंगळे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी आणि मा.दिनेश तायडे पोलीस निरीक्षक बारामती शहर, मा.धनंजय जामदार चेअरमन एमआयडीसी, मा.तैनुरभाई शेख - पत्रकार, मा.शहानूर भाई शेख वकील साहेब, मा.कामरुद्दीनभाई सय्यद - जेष्ठ समाजकर्ते, मा.असलम सय्यद उद्योजक माळेगाव,मा.इफतहेखार शेख (नटराज चिकन), मा.सलीमभाई दस्तगीर बागवान उद्योजक,मा.रोझम बागवान, मा.अली बागवान, मा.मुस्तकीम बागवान यांच्या उपस्तिथीत पार पडले.

मा.किरणदादा गुजर साहेब आणि मा.गणेश इंगळे साहेब यांनी मुलांना आणि इतर उपस्थित सर्वांना मार्गदर्शन दिले.

ह्या उपक्रमामध्ये बारामती मधील नामांकित चिरायु हॉस्पिटल - साई इंपिरियल, मार्केट यार्ड रोड,बारामती चे बाळ रोग तज्ञ् डॉ.अनुप धोभाडा, डॉ.अमित कोकरे, डॉ. धनंजय धायगुडे, डॉ.शैलेश दोषी, डॉ. गणेश श्रीरामे, डॉ. तात्यासाहेब कोकरे, डॉ.संकेत नाळे व त्यांचे सर्व सहकारी (स्टाफ)यांनी उपक्रमाचा लाभ घेण्याकरिता आलेल्या सर्व लहान मुलांचे / बाळांचे उपचार व तपासणी केले.

चिरायु हॉस्पिटल हे एक मल्टीस्पेसिऍलिस्ट हॉस्पिटल असून येथे लहान मुलांसाठी अतिदक्षता विभाग आणि हृदयाचा आजारावरील विभाग २४ तास सुरु असते. उपक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात बारामती नगर परिषद शाळा क्रमांक १ ते ८ व इतर नागरिकांनी लाभ घेतला. 
उपक्रमामध्ये १२८१ लहान बाळांची / मुलांची तपासणी करण्यात आली व इतर २२ सेन्सेटिव्ह केसेस च्या मुलांना देखील पुढील मोफत उपचारासाठी बोलावले गेले आहे.

बाकी उपक्रमामध्ये आलेले काही मुले व त्यांच्या पालकांना ज्यांना अडचणीमुळे थांबता आले नाही असे ४१४ लोकांना देखील त्यांच्या लहान मुलांसाठी / बाळांसाठी मोफत तपासणीचे (मोफत ओपीडी चे ) कुपन दिले गेले आहे व कधी अडचणीच्या काळात जर लहान मुले ऍडमिट झाली तर त्यांना देखील बीला मध्ये सवलतीचे कुपन देण्यात आले.  

मागच्या वर्षा सारखा हा उपक्रम देखील मोठ्याप्रमाणात यशस्विरित्याने पार पडला व मोठ्याप्रमाणात शिक्षकांकडून व पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. शाहीन सोहेल शेख आणि सोहेल शेख म्हणाले - " भविष्यात देखील आदरणीय किरणदादा गुजर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली असेच उपक्रम लोकांच्या हितासाठी घेत राहणार व बारामती मधील नागरिकांना असेच आरोग्यच्या दृष्टीने लाभ द्याचा प्रयत्न करत राहू आणि आजच्या ह्या उपक्रमाला यशस्वी बनवण्याकरिता आमच्या विनंती ला मान दिल्याबद्दल चिरायु हॉस्पिटल चे सर्व डॉक्टर्स आणि त्यांच्या स्टाफ चे आभार.

Thursday, July 20, 2023

बारामती(झारगडवाडी)झारगडवाडीतील गणेशनगर भूमिगत गटारीला अखेर मुहूर्त मिळाला



मुख्यसंपादक -: अमित बगाडे 

गणेशनगर रखडलेल्या गटर कामाची निविदा ओपन-काम कधी होणार स्थानिक नागरिकांचा सवाल?


बारामती (प्रतिनिधी) - "गाव तसं चांगलं, पण राजकीय भानगडींमुळे वेशीला टांगलं" अशी अवस्था बारामती तालुक्यातील झारगडवाडी या गावची झाली आहे. मागील तीन वर्षांपूर्वी गावातील गणेशनगर परिसरातील नागरी लोकवस्ती शेजारी अवैध उत्खनन झाले आहे. पंचायत समितीच्या अखत्यारीत येत असलेल्या या गायरान गटाचे भोगवटादार स्वतः गटविकास अधिकारी असूनही गौण खनिज चोरीसारख्या घटनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.

स्थानिक रहिवासी नागरिकांनी वारंवार विरोध करूनही ग्रामपंचायत प्रशासनाने याच उत्खननामध्ये मैला मिश्रित सांडपाणी सोडले आहे. आज अखेरीस या अवैध उत्खननामध्ये पडून दोन नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मागील वर्षी १५ ऑगस्ट रोजी संपूर्ण देश स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना येथील सामाजिक कार्यकर्ते योगेश नाळे आणि स्थानिक नागरिकांनी पंचायत समिती बारामती येथे आमरण उपोषण केले होते. त्यावेळी सखोल चौकशी अंति संबंधित दोषी इसमांवर योग्य कार्यवाही करण्याच्या आश्वासनावर उपोषण सोडण्यात आले होते.

सदर अवैध उत्खनन मध्ये सोडलेल्या मैला मिश्रित सांडपाण्यामुळे आसपासच्या परिसरात मागील तीन वर्षांपासून साथीच्या रोगराईने तांडव तर घातलेच आहे. त्यासोबत आसपासच्या पिण्याच्या पाण्याचे जल्लस्त्रोतही खराब झाले आहेत. शेतमजुरी करून जगणाऱ्या स्थानिक नागरिकांचे अशा अनपेक्षित आजारांनी अक्षरशः संसार उध्वस्त होण्याची वेळ आली आहे. या परिस्थितीमधून मार्ग काढण्यासाठी गाव पुढाऱ्यांची मनीषा नसतानाही केवळ सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्यावर या सांडपाणी व्यवस्थापनासाठी आज अखेरीस ५० लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

त्यापैकी २० लक्ष रुपयांचे काम करण्यात आले असून उर्वरित ३० लक्ष रुपयांचे कामास जानेवारी महिन्यात प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती परंतु प्रशासनातील बदलामुळे रखडलेले होते. अनेक अडचणींचा सामना करत तब्बल ६ महिन्याच्या कालावधीनंतर कामाची निविधा खुली केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. सद्यस्थितीला "काम मंजूर झाल्यानंतर राजकीय लोक स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कामास अडचणी आणून विलंब लावत होते. आता निविधा खुली झाल्याने काम गुणवत्तापूर्वक, पारदर्शक कामे करून गावाचा विकास करावा आणि तडजोडीच्या राजकारणातून आम्हावर लाजलेल्या मैला मिश्रित सांडपाण्याच्या भस्मासुरापासून आम्हाला त्रासमुक्त करावं. अशी भावना नागरिकानी व्यक्त केली आहे.

Tuesday, July 18, 2023

*साठेनगर कसबा बारामती याठिकाणी साहीत्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन




मुख्यसंपादक -: अमित बगाडे 



बारामती -:  दिनांक १८ जुलै २०२३ रोजी साहीत्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना साठेनगर,कसबा बारामती याठिकाणी विविध संघटनांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.


 या निमित्ताने साठेनगर अंगणवाडी या ठिकाणी सकाळी १०:३० वाजता पुजा पाठाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, बारामती शहर पोलिस निरीक्षक दिनेश तायडे  बारामती सहकारी बॅंकेचे संचालक सचिनशेठ सातव,अॕड.सुधीर पाटसकर, यांच्या हस्ते पुष्पहार हार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले यावेळी मा.नगरसेवक सुरजशेठ सातव,नवनाथ बल्लाळ, दिनेश जगताप , विशेष सरकारी वकील अॕड बापु शिलवंत, विशेष सरकारी वकील अॕड.अमोल सोनवणे पत्रकार शुभम अहीवळे,तानाजी पाथरकर,अमित बगाडे, भीमराव कांबळे,सामाजिक कार्यकर्ते,टी.वी मोरे,मनोज लालबीगे, चंद्रकांत खंडाळे इ.मान्यवर उपस्थित होते.

सदरील कार्यक्रम विजयराव खरात मा उपनगराध्यक्ष बा.न.प यांच्या मार्गदर्शनाखाली आण्णाभाऊ साठे तरुण मंडळ,लहुजी प्रतिष्ठान पाॕंईट,जय लहुजी फ्रेंड सर्कल, अण्णाभाऊ साठे मित्र मंडळ, लहुजी शक्ती सेना बारामती, क्रांतीवीर लहुजी शक्ती सेना बारामती, स्वाभिमानी लहुजी शक्ती सेना बारामती,या संघटनेच्या वतीने साजरा केला

Monday, July 17, 2023

पदाचा दिलेला राजिनामा नामंजूर करण्यात येत आहे!

मुख्यसंपादक -: अमित बगाडे 



  बारामती -: रोहित जी बनकर यांनीं प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजिनामा ओबीसी विभाग प्रदेश कार्यालयाकडे पाठवला होता परंतू सदर राजिनामा बाबत ओबीसी विभाग प्रदेश अध्यक्ष श्री.भानुदासजी माळी साहेब यांनी प्रांताध्यक्ष आ. श्री.नानाभाऊ पटोले यांच्याशी चर्चा केली.आपण बारामती सारख्या शहरात उत्तम प्रकारे काँग्रेस पक्षाचे काम करीत आहात.

त्या कामाची दखल घेऊन प्रांताध्यक्ष आ.श्री.नानाभाऊ पटोले यांनी राजिनामा नामंजूर करण्यात यावा असे आदेश श्री.भानुदासजी माळी साहेब यांना दिले.

नानाभाऊ पटोले यांनी दिलेल्या आदेशाची श्री.भानुदासजी माळी साहेब यांनी अंमलबजावणी केली असून आपला राजिनामा नामंजूर करण्यात येत आहे याची नोंद घेऊन आपण पुन्हा एकदा ओबीसींना न्याय देण्यासाठी व काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करण्याकरिता पुन्हा एकदा जोमाने काम कराल हीच अपेक्षा !

*श्री.धैर्यशील सुपले - प्रदेश सरचिटणीस*
*महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग*

*श्री.शैलेश राऊत - प्रदेश प्रसिध्दी प्रमुख*
*महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग*

पिण्याच्या पाण्यासाठी मुळा मुठा उजव्या कालव्यास पाणी सोडण्यात यावे, जनतेची मागणी,

संपादक -: नितल शितोळे 


दौंड - हवेली दौंड आणि पुढे इंदापूर ला जाणारा मुळा मुठा उजवा कालवा गेला एक महिना पूर्णपणे बंद असल्याने या कालव्यावर आधारित पिण्याच्या पाणी योजना अडचणीत आल्या आहेत,

किमान पिण्याच्या पाण्यासाठी तरी मुळा मुठा उजव्या कालव्यास पाणी सोडण्यात यावे, अशी  मागणी गावो गावचे नागरिक करू लागले आहे,

दरवषी 7 जूनला सुरू होणार पावसाळा लांबला आहे, आज 15 जून जवळजवळ सव्वा महिना पाऊस अजिबातच झाला नाही ,त्यातच मुळा मुठा  कालवा 15 जूनला बंद करण्यात आला आहे, अद्याप पाऊस न झाल्याने आणि कालवा बंद असल्याने या कालव्यावर अवलंबून असणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या योजना या बंदपडण्याच्या मार्गावर आल्या आहेत ,यामुळे लोकांना पाणी प्रश्न भेडसावू लागला आहे,

मुळा मुठा नव्या कालव्यावर लोणी काळभोर, उरुळी कांचन , यवत , केडगाव पाट्स आणि दौंड या मोठया गावा सह अनेक लहान लहान गावाच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना अवलंबून आहेत,

 कला कालवा बंद झाल्यास आठ पंधरा दिवस पिण्याच्या पाण्याच्या योजना चालतात, नंतर कालव्या लगत असणाऱ्या योजनांच्या विहिरी तळ गाठू लागतात,तर काही पूर्णपणे आटतात, सध्या पूर्णपणे एक महिना पाऊसही नाही आणि कालवा महिनाभरबंद यामुळे पाणी टंचाईचे भीषण संकट पुढे आले आहे,

संबधीत खाते आणि शासनाने याबाबत दखल घेऊन जनतेच्याया पिण्याच्या पाण्यासाठी तरी मुळा मुठा कालव्यास अंशतः तरी पाणी सोडावे, अशी मागणी कालवा लगत पाणी योजनांचे ग्रामस्थ, कार्यकर्ते आणि सरपंच मंडळी करू लागली आहेत,

Friday, July 14, 2023

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची वारस....* बारामतीची भिमकन्या निकिता खरात झाली पोलीस उपनिरीक्षक...


संपादक -: नितल शितोळे 


माझे मित्र खुशबू फर्निचर मॉल ,फलटण रोड (बारामती) चे मालक जावेद मजलापुरे यांचा फोन आला... 
की उद्या माझ्या मॉलमध्ये माझ्या मॉल शेजारी राहणाऱ्या एका अत्यंत गरीब कुटुंबातील होतकरू मुलीची पोलिस उपनिरीक्षक पदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार आयोजित करण्यात आला आहे. तरी या कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे.‌‌

मी कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर मी आवर्जून माहिती घेतली की निकिता खरात ही अत्यंत कष्टकरी मोलमजुरी करून उपजीविका करणाऱ्या आणि एक गुंठाही शेतजमीन नसणाऱ्या व दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करणाऱ्या आई-वडिलांची मुलगी आहे. घरची परिस्थिती अत्यंत हलाक्याची परंतु निकिता खरात यांच्या वडिलांचे स्वप्न होते की माझी मुलगी खूप शिकावी शिकून तिने अधिकारी व्हावे, हे स्वप्न  घेऊनच ते निकिताचे वडील तिच्या पाठीशी उभे राहिले...

त्यांनी निकिताला स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारी पुस्तक उपलब्ध करून दिली, निकिता स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी ती सकाळी अभ्यासिकेत जायची ती संध्याकाळी परत यायची याच काळात समाजातील तथाकथित कमी बुद्धीच्या, कोत्या मनाच्या टीकाकार मंडळींनी ज्यांनी समाजाचे कुटाळ करण्याचे काम हाती घेतलेले असते अश्या लोकांकडून निकिताच्या वडिलांवर टीका होऊ लागली की हा आपल्या मुलीला का शिकवतोय..?

 ही मुलगी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठे जाते शिकून काय करायचे शेवटी लग्न करून धुणी भांडीच करायची आहेत ना, वय वाढत चालले आहे लग्न का करत नाही..? अशा अनेक प्रश्नांनी निकिता आणि तिच्या कुटुंबियांवर चौफेर हल्ला होत होता.

परंतु या हल्ल्याला भीक न घालता निकिताने आपल्या  परिस्थितीची, गरीबीची जाण ठेवत आपले प्रयत्न चालू ठेवले आणि तिला यश आले. निकिता स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन पोलीस उपनिरीक्षक या पदावर तिची नियुक्ती झाली..

जेव्हा खुशबू फर्निचर मॉलमध्ये तिचा सत्कार केला त्या सत्काराला उत्तर देताना तिने तिच्याबरोबर घडलेल्या प्रसंगाचं व आपल्या आई वडिलांनी दिलेल्या साथी बद्दल कथन करत असताना अक्षरशः तिच्या डोळ्यातील अश्रू अनावर होऊन धारा वाहत होत्या...

हा प्रसंग तिथे उपस्थित असलेल्या सर्व उपस्थितांचे डोळे ओले करणार होता. आणि अंगावर शहारे आणणारा होता. ही मुलगी कुठलीही संसाधने, ट्युशन, पोलीस भरती अँकॅडमी अशी साधने न वापरता फक्त आपल्या आई-वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेऊन आपल्या गरीबीची जाण आणि आपल्या महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तिने कष्ट करत आई-वडिलांच्या स्वप्नांना साकार करते...

आणि खरंच निकिता खरात सारख्या तरुणी या खऱ्या अर्थाने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब  आंबेडकर यांची वैचारिक दृष्ट्या मुलगी (लेक) म्हणूनच समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण करते...

 आणि जगाला सांगते कि जेव्हा आपले लक्ष्य आपल्या ध्येयाकडे असते त्या वेळेस तुमची परिस्थिती सुध्दा तुम्हाला थांबवू शकत नाही.

खरंच निकिता सारख्या ध्येयवेड्या  मुली आजच्या तरुण पिढीला, विद्यार्थ्यांना लक्ष्य गाठण्यासाठी नेहमीच  प्रेरणा देत राहतील...

बारामती लोकसभा निवडणूक 2024 पुरंदर इंदापूर तालुक्यामध्ये मुलगी व सून निवडून आणण्यासाठी केला जातोय का नोटांचा वर्षाव?

 बारामती -: बारामती लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे असू...